आनंदाची बातमी ! 'रोहयो' अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरघोस वाढ, EC च्या बैठकीमध्ये मानधन वाढीचा प्रस्ताव येथे पहा..

MGNREGA Contract Employees Increase Salary : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) या योजनेअंतर्गत राज्यामध्ये सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक तसेच क्लार्क कम डाटा एंट्री ऑपरेटर हे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने गेल्या 10 ते 12 वर्षापासून अल्प मानधनावर कार्यरत आहेत, त्यांच्या मानधनात गेल्या तीन ते चार वर्षापासून कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती, याबाबत मनरेगा संघनेच्या वतीने जानेवारी महिन्यात निदर्शने करून आपल्या मागण्या शासन दरबारी मांडल्या होत्या, आता सरकारने याची दखल घेत या कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरघोस (Increase Salary) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, सविस्तर माहिती पाहूया..

रोहयो अंतर्गत राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात केली वाढ

MGNREGA Contract Employees Increase Salary

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राज्यात कार्यरत राज्य स्तर ते गावपातळीपर्यंत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा मार्ग मोकळा झाला असून, नुकत्याच संपन्न झालेल्या राज्य निधी असोसिएशनच्या कार्यकारी समिती (EC) च्या  बैठकीमध्ये मानधन वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा MIS समन्वयक यांच्या मानधनात 12 हजार तर कार्यक्रम व्यवस्थापक (PM) यांच्या मानधनात 10 हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.

तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक तसेच क्लार्क कम डाटा एंट्री ऑपरेटर यांच्या मानधनात 8 हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. तसेच तांत्रिक सहाय्यक या कंत्राटी कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय दौरा करण्यासाठी दरमहा 3000 रुपये फिरती भत्ता देखील मंजूर करण्यात आला आहे. 

सदरची मानधन वाढ ही 1 जुलै 2022 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. त्यामुळे राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

MSRLM : कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

महत्वपूर्ण बातम्या

अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                            



Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now