Career In Teaching : 'D.ED' होणार कायमचे बंद ? शिक्षक होण्यासाठी आता 'बीएड' करावे लागणार

Career In Teaching NEP : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) धोरणाची राज्यात येणाऱ्या शैक्षणिक वर्षात अंमलबजावणी सुरू होणार आहे, New Education Policy 2020 नुसार शिक्षण क्षेत्रातील प्रचलित पद्धती मध्ये बदल सुचवलेले आहेत, त्यानुसार आता शिक्षक होण्यासाठी पदवी नंतर Bed चा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे, म्हणजेच पूर्वी बारावी नंतर Ded करून शिक्षक होता येत होते, नक्की काय आहे? यामगील तथ्य वाचा सविस्तर

Career In Teaching NEP News

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी

'नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020' राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व अकृषिक विद्यापीठांमध्ये जून 2023-24 या शैक्षणिक वर्षात New Education Policy 2020 धोरणाची अंमलबजावणी सुरु होणार आहे. 

राज्यातील अकृषिक विद्यापीठांनी Course Structure तयार केले असून, Academic Council ने देखील त्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राध्यापक (Professors) यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. लवकरच नवीन शैक्षणिक धोरणावर शिक्कामोर्तब होणार आहे. बारावीनंतर नव्याने पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा हा पॅटर्न लागू असणार आहे. सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना हा पॅटर्न लागू असणार नाही.

कसे असेल नवीन शैक्षणिक धोरण

  1. एका वर्षानंतर Certificate मिळेल, 2 वर्षानंतर Diploma Certificate तर तीन वर्षानंतर Degree Certificate मिळेल.
  2. विषय निवडीचे स्वातंत्र - विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार विषय घेता येईल, म्हणजे एखाद्या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी दुसरा विषय घेऊ शकतो.
  3. प्रचलित 3 वर्षाची पदवी आता 4 वर्षांची होणार आणि त्यानंतर थेट ‘PHD’ करता येईल.
  4. 4 वर्षे झाल्यावर Degree with Honors किंवा Degree with Research मिळणार, ‘Research’ घेतले तरच ‘पीएचडी’ करता येईल.
  5. 5 वर्षे पूर्ण केल्यावर पदव्युत्तर पदवी मिळेल आणि गॅप पडला तरीदेखील दोन-तीन वर्षांनी प्रवेश घेता येईल.
  6. परीक्षेची सत्र पद्धती कायम असणार, पण ‘CBCS पॅटर्ननुसार टक्केवारी नव्हे, तर ग्रेडेशन Gradation (Score Credit) पद्धती असणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी आता बीएड करावे लागणार

सध्याच्या शैक्षणिक पद्धतीनुसार 3 वर्षाची पदवी मिळवण्यासाठी 5 वर्ष लागतात, तर नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 7 वर्ष लागणार आहे.

त्यामुळे PG पूर्ण झाल्यानंतर एक वर्षात B.ed करता येईल, तर पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना 2 वर्ष आणि बारावीनंतर B.ed साठी 4 वर्ष लागणार आहे. नवीन धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी D.ed नाही, तर प्राथमिक व माध्यमिक शिक्षक होण्यासाठी B.ed करावे लागणार आहे. पण विषय निवडताना कोणता शिक्षक (प्राथ/माध्य) व्हायचा आहे, त्यानुसार विषय घेता येणार आहेत.

संबंधित लेख

महत्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                            

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now