Bal Sangopan Yojana 2024 : राज्यामध्ये बालकांच्या संगोपनासाठी बाल संगोपन ही सरकारी योजना राबविली जाते, यामध्ये वय वर्ष 0 ते 18 वर्षातील बालकांचा समावेश होतो, बाल संगोपन योजने अंतर्गत परिपोषण अनुदाना मध्ये राज्य शासनाने वाढ केलेली आहे, आता दरमहा कुटुंबाला 2 हजार 500 रुपये इतके अनुदान बालकांच्या संगोपनासाठी देण्यात येते, Bal Sangopan Yojana 2024 चा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पद्धत याविषयीची संपूर्ण माहिती पाहूया..
बालसंगोपन योजना काय आहे ? | Bal Sangopan Yojana 2024
महाराष्ट्र राज्य सरकारने सन 2005 मध्ये बालसंगोपन योजना राज्यामध्ये राबविण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेंतर्गत बालकांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे, यासाठी बाल संगोपन योजना (Bal Sangopan Yojana 2024) राबविण्यात येते.
सध्या राज्यातील पन्नास हजार पेक्षा अधिक बालकांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या सरकारी योजनेची पात्र लाभार्थ्यांना पाहिजे ती आवश्यक माहिती पोहचत नसल्यामुळे अजून बरेच लाभार्थी यापासून वंचित आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेची माहिती संबंधित कुटुंबाला अवश्य देऊन या योजनेचे लाभ मिळवून देऊ शकता.
बालसंगोपन योजने अंतर्गत मिळणारा लाभ किती आहे?
बालसंगोपन योजनेअंतर्गत यापूर्वी देण्यात येणाऱ्या लाभार्थी अनुदानामध्ये महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार आता बालसंगोपन योजनेअंतर्गत बालकांच्या संगोपनासाठी पालकास देण्यात येणाऱ्या परिपोषण अनुदानात दरमहा 1 हजार 100 वरून 2 हजार 250 रुपये वाढ करण्यात आली आहे.
बालसंगोपन योजने अंतर्गत मिळणारा लाभ कसा दिला जातो?
संबंधित पात्र लाभार्थ्यांना रोख स्वरुपात (Cash) मदत देण्याची पध्दत बंद करून आता फक्त धनादेशाद्वारे त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला सदर रक्कम जमा करण्यात येते.
बालसंगोपन योजनेमध्ये 'या' बालकांना समावेश
ज्या मुलांचे वय वर्ष 0 ते 18 वर्ष आहे, त्या वयोगटातील पुढील बालकांना या योजनेचा लाभ मिळतो.
- अनाथ बालके
- ज्या मुलांच्या पालकांचा शोध लागत नाही अशी बालके
- असे बालक जे दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके
- कोविड कालावधीमध्ये दोन अथवा एक पालक गमावलेले बालके
- एक पालक असलेली व family Crisis मध्ये असलेली बालके
- मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग (Abandonment), अविवाहीत मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे इ. कारणांमुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके
- कुष्ठरुग्ण व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके
- एच.आय.व्ही. (HIV) ग्रस्त/बाधित बालके
- तीव्र मतिमंद बालके
- बहुविकलांग (Multiple disability) बालके
- ज्यांची दोन्ही पालक (आई/वडील) दिव्यांग (अपंग) आहेत अशी बालके
- पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव, अती हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील (Crisis situation मधील) बालके
- शाळेत न जाणारे बाल कामगार (कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेले)
योजनेचे लाभार्थी आणि निवडीचे निकष
तुरुंगात असलेले पालक, एच. आय. व्ही. ग्रस्त व कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने बाधित असलेले पालक, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात गुंतलेल्या आई/ वडील अशा दोन्ही पालक हयात असलेल्या बालकांना लाभ दिला जातो. मात्र याव्यतिरिक्त असणारे बालक यांना हा निकष लागू नाही.
बाल संगोपन योजना परिपोषण अनुदानात भरीव वाढ
महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेअंतर्गत बालकांच्या संगोपनासाठी देण्यात येणाऱ्या परिपोषण अनुदानात भरीव वाढ करण्याचा निर्णय 31 जानेवारी 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयामुळे बाल संगोपन योजनेचे 31 हजार 182 लाभार्थी तसेच कोविड कालावधीमध्ये दोन अथवा एक पालक गमावलेले 23 हजार 535 लाभार्थी अशा एकूण 54 हजार 717 लाभार्थींना अनुदान वाढीचा लाभ मिळणार आहे.
बालसंगोपन योजनेअंतर्गत बालकांच्या संगोपनासाठी पालकास देण्यात येणाऱ्या परिपोषण अनुदानात 1 हजार 100 वरून 2 हजार 250 रुपये वाढ करण्यात आली आहे.
बालसंगोपन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रे बालसंगोपन अर्जाच्या फाईल सोबत साक्षांकित करून जोडावी. अर्ज नमुना पुढे दिला आहे.
- पालकांचे आधार कार्ड
- बालकांचे आधार कार्ड / जन्मदाखला / बोनाफाईड
- रहिवाशी पुरावा
- आई/वडील मृत असल्यास मृत्यू चे प्रमाणपत्र
- उत्पनाचा दाखला
- कुटुंबाचा एकत्रित फोटो
- बालक दिव्यांग (मतीमंद,बहुविकलांग) असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र
- दिव्यांग बालकाचा पूर्ण फोटो
- पालकांचे बँक किंवा पोस्टाचे पासबुक झेरॉक्स
- निकषानुसार इतर कागदपत्रे उदा. आजर पण असेल तर वैद्यकीय प्रमाणपत्र, HIV प्रमाणपत्र इ.
बाल संगोपन योजना कागदपत्रे बाबत इतर सूचना
बाल न्याय अधिनियमातील तरतूदीतील मुलांची व्याख्येनुसार ज्यांनी वयाची १८ वर्षे पुर्ण केलेली नाहीत ती मुले म्हणजे बालक आहेत म्हणून बाल संगोपन योजना १८ वर्षापर्यतची (१८ वर्षेखालील) मुले यासाठी पात्र समजण्यात येतील.
- लाभार्थ्यांच्या निवासी पुराव्याबाबत रेशन कार्डाव्यतिरिक्त निवासासंबंधीचे इतर पुरावेही ग्राह्य धरण्यात यावेत.
- रेशनकार्ड/ विजेचे देयक / पाण्याचे देयक/ घरपट्टी/ नगरपालिका दाखला / नगरसेवकाचा दाखला इ.
- तहसिलदाराच्या उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी उत्पन्नाचे इतर पुरावेही ग्राह्य धरण्यात यावेत. उदा. पगार बिल
- चिठ्ठी (Slip), पालकांच्या कार्यालयाचा दाखला, पालक कोणते काम करतात याचा स्पष्ट उल्लेख करावा.
- याशिवाय लाभार्थ्यांच्या घराचा व कुटुंबाचा फोटोही संबंधित (Case file) मध्ये जोडावा.
बालसंगोपन योजना अर्ज नमुना (Form ) PDF Marathi
{getButton} $text={Download} $icon={download}
बालसंगोपन योजनेसाठी अर्ज कोठे करावा ?
बालसंगोपन योजनेचा अर्ज (Form) तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (ICDS) या कार्यालयात जमा करावा. त्यानंतर बाल सरंक्षण समिती तुमचा अर्ज पडताळणी झाल्यांनतर अंतिम मंजुरी देईल त्यांनतर तुमच्या बँकेत दरमहा परिपोषण अनुदान होईल.
संपर्क - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (ICDS)
बालसंगोपन ऑनलाईन अर्ज | Bal Sangopan Yojana Maharashtra apply Online
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या व येथून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता.