8th Pay Commission News : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट अशी आहे, की सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा (7th Pay Commission DA Increase) महागाई भत्ता हा 38 टक्क्यावरून 42 टक्के पर्यंत वाढवण्यात आला असून, पुढील DA हा जुलै महिन्यात वाढण्यात येणार आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे, एकीकडे 8th Pay Commission वेतन आयोगावर चर्चा होत असताना आता सरकारने संसदेत दिली माहिती याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया..
आठवा वेतन आयोग कधी होणार लागू ?
केंद्र सरकारी कर्मचारी संघटनेकडून नवीन वेतन आयोग लागू करण्याविषयी मागणी होत असताना, पश्चिम बंगालसह व इतर राज्यात 8th Pay Commission वर मोठी चर्चा सुरु होती. मात्र आता सरकारने याबाबत कोणतीही चर्चा नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) वर सध्यातरी सरकारकडून कोणतीही चर्चा नसल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीनंतरच चर्चा होण्याचे संकेत असून, 2025 26 मध्ये तो लागूही होऊ शकतो. तेव्हा 7 व्या वेतन आयोगाच्या तुलनेत 8 व्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठ्या फरकानं वाढ होऊ शकते. तसेच 8th Pay Commission मध्ये काही महत्त्वाचे बदलही केले जाऊ शकतात.
आठवा वेतन आयोगात किती असेल पगार ?
7th Pay Commission वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) नुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ झाली होती. 8th Pay Commission मध्ये याच Fitment Factor चा आधार घेतला गेला, तर कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन (Basic Salary) हे 26 हजार रु इतके असेल.
सातव्या वेतन आयोगात पगार किती वाढला होता ?
- Fitment Factor - 2.57 पट
- वेतनातील वाढ - 14.29 टक्के
- किमान पगार - 18 हजार रुपये
आठव्या वेतन आयोगात किती वाढेल पगार
- Fitment Factor - 3.68 पट
- वेतनातील वाढ - 44.44 टक्के
- किमान पगार - 26 हजार रुपये होण्याची शक्यता.
8th Pay Commission वेतन आयोगामध्ये Fitment Factor आधार म्हणून ठेवला, तर यानुसार कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर 3.68 पटीने वाढवले जाऊ शकते. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात 44.44 टक्के वाढ होऊ शकते. कर्मचार्यांचे किमान वेतन 26,000 रुपये किंवा त्याहून अधिक होण्याची शक्यता आहे.
आठवा वेतन आयोग लागू होणार ?
आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारने संसदेत माहिती देताना सांगितलं की, सध्या आर्थिक स्थिती पाहता सध्या याची कोणतीही चर्चा नाही. अर्थ राज्य मंत्री यांनी लोकसभेत या गोष्टीला स्पष्ट नकार दिला आहे, त्यामुळे आता आठवा वेतन आयोगाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 4 टक्के वाढ
केंद्र सरकारने देशातील जवळपास 1 कोटीपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी (Central government employees) आणि निवृत्तिवेतन धारकांना दिलासा देत महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय नुकताच मार्च महिन्यामध्ये घेण्यात आला. त्यानुसार आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता (DA Hike) 42 टक्के करण्यात आला आहे.