दिव्यांग व्यक्तींसाठी राजभवनात कार्यक्रमाचे आयोजन

Viklang Yojana : दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे विविध दिव्यांग योजना राबवल्या जातात, नुकतेच महाराष्ट्र राज्याने स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्याचा महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेतला, राजभवन येथे संपन्न कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. रमेश बैस यांनी दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नको, तर सहकार्य मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारतर्फे या कार्यक्रमात मोफत साहित्य वाटप करण्यात आले.

दिव्यांग व्यक्तींसाठी राजभवनात कार्यक्रमाचे आयोजन 

Viklang Yojana

दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नको, सहकार्य करा राज्यपाल यांचे प्रतिपादन

दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने दिव्यांग कायदा २०१६ अमलात आणला, पूर्वी केवळ ७ अपंगत्वांचा समावेश होता, परंतू नव्या विधेयकामध्ये मधुमेहासह २१ दिव्यांगत्वांचा समावेश केला गेला. मात्र आज देखील दिव्यांग व्यक्तींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. IAS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका नेत्रहीन अंध अधिकाऱ्याला पदस्थापना मिळण्यासाठी ७ वर्षे लढावे लागले होते. दिव्यांग लोकांना सहानुभूती नको, परंतू समाजाकडून सहकार्य मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी एका कार्यक्रमात केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ७५ दिव्यांग गरजू व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने शिलाई मशीन व पिठाची गिरणी साहित्य भेट देण्याचा कार्यक्रम राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. 

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मानवाधिकार अयोग्य, हेतू चॅरिटेबल ट्रस्ट, जिल्हा न्यायिक सेवा प्राधिकरण - मुंबई उपनगर व 'सक्षम' कोकण प्रांत या संस्केथांनी केला होता.

ऐतिहासिक निर्णय ! राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन

जगभरात ८ व्यक्तीमागे १ व्यक्ती दिव्यांग

जगभरात आठ व्यक्तीमागे एक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिव्यांग आहे, तर भारतात जवळ जवळ २ टक्के लोक दिव्यांग आहेत. दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, रोजगार प्रशिक्षण, सामान संधी व सुरक्षित वातावरण देणे समाजाचे कर्तव्य आहे असे सांगून अनुकूल वातावरण मिळाल्यास दिव्यांग लोक उत्कृष्ट कार्य करू शकतात असे राज्यपालांनी बोलताना सांगितले.

दिव्यांगत्वावर मात करीत मिळविले यश

अष्टावक्र मुनी, संत सूरदास, वैज्ञानिक  थॉमस अल्वा एडिसन व शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग दिव्यांग असून देखील त्यांची प्रतिभा पूर्णपणे उदयास आली होती असे सांगून दिव्यांग व्यक्तींसाठी शासकीय व खासगी कार्यालये, संकेतस्थळे व वाहतुकीची साधने सुलभ असली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.  यावेळी दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी कार्य करणाऱ्या हेतू चॅरिटेबल ट्रस्टला राज्यपालांनी ५ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास, पर्यटन व महिला आणि बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती ए. ए. सय्यद, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमलकिशोर तातेड (नि.), 'सक्षम' कोकण प्रांताचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश सावंत, हेतू चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सचिव रिखबचंद जैन, मणी लक्ष्मी तीर्थचे विश्वस्त दिनेश मणिलाल शाह, राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य एम ए सईद व भगवंत मोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उपनगरचे सचिव न्या. सतीश हिवाळे  तसेच दिव्यांग व्यक्ती व समाजसेवक उपस्थित होते.

त्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now