TAIT Exam Result 2023 : शिक्षक भरती ‘टेट’ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. राज्यातील 2 लाख 16 हजार 443 विद्यार्थ्यांचा निकाल (TAIT Exam Result) जाहीर झाला असून, आता शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यामध्ये शिक्षक भरती TAIT परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात आली त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून 186 गुण मिळवणारा विद्यार्थी प्रथम आला आहे.
शिक्षक भरतीचा निकाल जाहीर - TAIT Exam Result 2023
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) 2023 निकाल जाहीर
- TAIT परीक्षा राज्यातील 2 लाख 39 हजार विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 16 हजार 443 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
- TAIT परीक्षा निकालामध्ये 186 गुण मिळवणारा विद्यार्थी राज्यात प्रथम (200 पैकी)
- TAIT परीक्षा निकालामुळे आता राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, एप्रिल अखेर पर्यंत 30 हजार शिक्षकांची भरती होणार आहे.
राज्यातील शिक्षक भरतीसाठी 'TAIT' Exam बंधनकारक करण्यात आली आहे. 2019 च्या (GR) शासन निर्णयानुसार ठरवलेल्या अभ्यासक्रमावर आधारित 'TAIT' चा Question Paper काढण्यात आला होता. प्रश्नपत्रिका खूपच कठीण होती, असे विद्यार्थ्यांचे मत होते. IPBS संस्थेच्या माध्यमातून राज्यातील विविध केंद्रांवर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडली.
टेट परीक्षेत 1 पेक्षा अधिक गुण मिळवलेला विद्यार्थी देखील उत्तीर्ण असणार आहे. परंतु शिक्षक भरती करताना मात्र मेरिट (Merit List - Cutoff) यादीवरूनच होणार आहे.
जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्याला निश्चितपणे शिक्षक होण्याची संधी मिळणार आहे. 100 पेक्षा कमी गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, त्यासंबंधीचा आढावा दोन-तीन दिवसांत घेतला जाणार आहे. त्यानंतर हा निकाल शालेय शिक्षण विभागाकडे पाठवला जाणार आहे. त्यांनतर स्थानिक स्वराज्य संस्थांची पदभरती व खासगी संस्थांमधील शिक्षक भरती पार पडेल.