TAIT Exam 2023 : शिक्षक अभियोग्यता चाचणीचे गुणपत्रक आले, 'डाउनलोड' वेबलिंक येथे पहा

TAIT Exam Result Download Link 2023 : शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. राज्यातील 2 लाख 16 हजार 443 विद्यार्थ्यांचा निकाल (TAIT Exam Result) जाहीर झाला असून, आता शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यामध्ये शिक्षक भरती TAIT परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात आली त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून 186 गुण मिळवणारा विद्यार्थी प्रथम आला आहे. विद्यार्थ्यांना आता गुणपत्रक TAIT Exam Result Download Link 2023 उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

TAIT Exam 2023 : शिक्षक अभियोग्यता चाचणीचे गुणपत्रक आले, 'डाउनलोड' वेबलिंक येथे पहा

TAIT Exam Result Download Link 2023

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती 2023 करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT Exam) परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले होते. 

TAIT Exam परीक्षेचा निकाल 24 मार्च 2023 रोजी जाहीर करण्यात आला, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर गुणांकयादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

TAIT Exam Result Download Link 2023

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक (SCORE CARD) आयबीपीयस (IBPS) च्या (TAIT Exam Result Download Link 2023)  https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/scda_mar23/login.php?appid=307b76e19820efd6b5d48229f13cce69 या वेबलिंकव्दारे उपलब्ध करून देण्यात आले आहे.  

सदर वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी त्यांचे गुणपत्रक 20 एप्रिल 2023 पर्यंत डाऊनलोड करुन घ्यावे व त्याची प्रत जपून ठेवावी. 

शिक्षक भरती च्या संपुर्ण प्रक्रिये दरम्यान तुम्हाला या गुणपत्रिकेची आवश्यकता असणार आहे. 20 एप्रिल 2023 रोजी सदरची वेब लिंक बंद करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्या

प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now