SARATHI Scholarship for Maratha 2023 : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव संसाधन विकास संस्थेच्या (SARATHI) वतीने संशोधन अधिछात्रवृत्तीची SARATHI Scholarship 2023 ची प्रक्रिया घोषित केली आहे. SARATHI च्या वतीने 31 हजार ते 35 हजार रु. प्रति महिना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. M.Phil. आणि Ph.D.च्या विद्यार्थ्यांना Chhatrapati Shahu Maharaj National Research Fellowship (CSMNRF - 2023) देणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2023 आहे. आजच्या लेखामध्ये सविस्तर माहिती पाहूया.
SARATHI Scholarship 2023 : सारथी शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन अर्ज
SARATHI Scholarship 2023 |
सारथी शिष्यवृत्ती योजना काय आहे? - SARATHI Scholarship
सारथी SARATHI चा पूर्ण Full Form Shahu Research and Training Institute असा आहे तर छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती CSMNRF 2023 चा Full Form Chhatrapati Shahu Maharaj National Research Fellowship असा आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा परिचय आपणा सर्वाना आहे, त्यांचे संपूर्ण जीवन समता, सामाजिक न्याय, बंधुत्व, एकात्मता, जातीय दुर्भावानांचा विध्वंस इ. माध्यमातून लोक कल्याणासाठी राहिले.
शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात शिक्षणासाठी स्वतंत्र खाते सुरु करून शिक्षणाचा प्रसार केला, मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजामधून उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती व हुशार विद्यार्थ्यांना या (Scholarship) अधिछात्रवृत्तीच्या माध्यमाने विशेष प्रोत्साहन दिले.
त्या निमित्ताने राजर्षी छत्रपती शाहू महाराज या महामानवास व थोर समाजसुधारकास कृतज्ञता म्हणून त्यांच्या स्मरणार्थ SARATHI ने लक्षित गटातील पात्र उमेदवारांसाठी सन 2019 वर्षापासून 'छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती' (SARATHI Scholarship for Maratha) सुरु केली आहे.
सारथी शिष्यवृत्ती योजना कोणासाठी आहे? - SARATHI Scholarship
सारथी Fellowship योजना ही मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समजातील नॉन क्रिमिलेयर उमेदवारांसाठी आहे. सारथी शिष्यवृती ही M.Phil. आणि Ph.D.च्या विद्यार्थ्यांना देण्यात येते.
सारथी शिष्यवृत्ती योजने अंतर्गत किती शिष्यवृत्ती मिळते? - SARATHI Fellowship for phd amount
मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समजातील नॉन क्रिमिलेयर उमेदवारांना, M.Phil. आणि Ph.D.च्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती (sarthi fellowship for phd amount) रक्कम दरमहा 31 हजार ते 35 हजार रुपये मिळते.
सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी कोण अर्ज करू शकते? - Scholarship Eligibility Criteria
- SARATHI Scholarship ही फक्त महाराष्ट्राचे मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नॉन क्रिमीलेयर उमेदवारांकरीता लागू आहे. (Fellowship is open only for the Maratha, Kunbi, Kunbi-Maratha, Maratha - Kunbi Non-Creamy Layer Candidates of State of Maharashtra)
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे M.Phil. आणि Ph.D. करीता आवश्यक कायम नोंदणी दिनांक 25 मार्च 2022 ला किंवा त्या तारखेनंतरच आवश्यक आहे. (Candidate applying MUST have their M.Phil. / Ph.D. Confirm Registration on or after 25 March, 2022 ).
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 8 लाखापेक्षा कमीअसावे. (Non-Creamy Layer Certificate issued by the Competent authority is MUST)
- (Family Income from all the sources should be less than Rs. 8 lakhs per annum.) (Non-Creamy layer Certificate is necessary)
- अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी Chhatrapati Shahu Maharaj National Research Fellowship (CSMNRF - 2023) च्या संदर्भात असलेल्या मार्गदर्शन सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
मार्गदर्शक सविस्तर माहिती येथे वाचा
सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करावा? - Sarthi PHD Fellowship 2023 Application Form
- सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हा https://eform.sarthi-maharashtragov.in/ या वेबसाईटवर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज
- ऑनलाईन अर्जात भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी सर्व आवश्यक कागदपत्रे 'सारथी' कडे रजिस्ट्रड पोस्टाने / स्पीड पोस्टाने किंवा प्रत्यक्षपणे पुढील पत्त्यावर 25 मे 2023 पर्यंत पाठवायचे आहे.
पत्ता - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण, आणि मानव विकास संस्था (सारथी), बालचित्रवाणी. सी. टी सर्वे नं. 173. गोपाल गणेश आगरकर रोड, पुणे पाठवावी. 411004
अधिकृत माहिती येथे पहा - मार्गदर्शक सविस्तर माहिती येथे वाचा
‘सारथी’च्या शैक्षणिक सवलती, सुविधांसंदर्भात लवकरच सर्वंकष समान धोरण ठरवणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. ‘सारथी’मार्फत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती आणि सुविधाबाबत सर्वंकष समान धोरण ठरविण्याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), या संस्थांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.