Samagra Shiksha Tablet Scheme for Cluster Head : राज्यातील शालेय शिक्षण विभाग अंतर्गत तालुक्यातील केंद्रस्तरावर केंद्राचे काम पाहणारे केंद्रप्रमुख यांना केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजनेतून प्रत्येक केंद्राला एक Tablet देण्यात येणार आहे. (Samagra Shiksha Tablet Scheme for Cluster Head) तसे परिपत्रक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (MPSP) मुंबई यांच्या वतीने काढण्यात आले आहे. जिल्हानिहाय टॅबलेट संख्या माहिती लेखामध्ये दिलेली आहे.
समग्र शिक्षा योजनेतून केंद्रप्रमुखांना मिळणार टॅबलेट
सरकारी सेवा कामकाज अधिक जलद गतीने होणार
Digital India अंतर्गत सर्व सरकारी सेवा ह्या ऑनलाईन पद्धतीने मिळत आहे, काळानुरूप बदलांना सामोरे जाण्यासाठी केंद्राप्रमुखाना आपल्या केंद्राचे सनियंत्रण करण्यासाठी वेळोवेळी डिजिटल साधनांची आवश्यकता भासत होती, सरकारी सेवा कामकाज अधिक जलद गतीने व्हावे यासाठी आता केंद्रप्रमुखांना Tablet मिळणार आहे.
समग्र शिक्षा योजनेतून मिळणार केंद्र प्रमुखांना टॅबलेट
समग्र शिक्षा या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत Monitoring Information System (MIS) मधून राज्यातील 6170 केंद्र प्रमुखांना संनियंत्रण करण्यासाठी टॅबलेट देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
केंद्र प्रमुख जिल्हानिहाय टॅबलेट संख्या
केंद्र प्रमुखांना संनियंत्रण करण्यासाठी टॅबलेट उपलब्ध होणार असून, जिल्हानिहाय टॅबलेट संख्या पुढीलप्रमाणे
- DYD मुंबई -39
- MC मुंबई - 146
- ठाणे - 198
- पालघर - 171
- रायगड - 228
- रत्नागिरी - 251
- सिंधुदुर्ग - 144
- अहमदनगर - 290
- नाशिक - 313
- पुणे - 375
- सोलापूर -280
- सांगली - 165
- सातारा - 232
- कोल्हापूर - 217
- औरंगाबाद - 210
- जालना - 142
- लातूर - 163
- हिंगोली - 85
- नांदेड - 233
- बीड - 203
- परभणी - 114
- उस्मानाबाद 115
- भंडारा - 80
- चंद्रपूर - 150
- गडचिरोली - 132
- गोंदिया - 101
- जळगाव - 184
- नंदुरबार - 114
- धुळे - 108
- बुलढाणा - 142
- अकोला - 97
- अमरावती -175
- नागपूर - 199
- वर्धा - 88
- वाशीम - 78
- यवतमाळ - 208
एकूण - 6170
मुख्यमंत्र्यांसोबत यशस्वी चर्चा - जुनी पेन्शन योजना