प्रतीक्षा संपली ! 'आरटीई' प्रवेशाची सोडत या तारखेला होणार जाहीर - RTE Lottery Result date 2023 24

RTE Lottery Result date 2023-24 : शिक्षण हक्क (RTE Act 2009) च्या कायद्यानुसार राज्यातील खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागांवर इंग्रजी माध्यमाच्या नामांकित खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो, पुढील शैक्षणिक वर्ष 2023 24 च्या प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्यात आली आहे. RTE Lottery ची पहिली List कधी जाहीर होणार याबाबत पालक सातत्याने विचारत आहे, आता प्रतीक्षा संपली असून, RTE Lottery Result date 2023 24 जाहीर करण्यात आली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती येथे वाचा

आरटीई' प्रवेशाची सोडत या तारखेला होणार जाहीर - RTE Lottery Result date 2023 24

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार आरटीई 25 टक्के राखीव जागांसाठी नामाकीत खाजगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी 25 टक्के जागा राखीव असतात.

RTE Lottery Result date 2023 24
RTE Lottery Result date 2023 24

प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क मिळावा, या उद्देशाने या राखीव जागांवर इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेत मोफत प्रवेश दिला जातो.

एक लाख 1 हजार 969 विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश

RTE अंतर्गत पुढील शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने यावर्षी लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरु केलेली आहे, त्यामध्ये पहिल्या टप्यामध्ये राज्यातील शाळांना RTE साठी नोंदणी करण्यासाठी सांगितले होते, त्यानंतर 1 मार्च पासून पालकांना आरटीई साठी बालकांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी (RTE Admission 2023-24 Maharashtra Last Date) 25 मार्च 2023 ही अंतिम तारीख दिली होती. 

यावर्षी राज्यभरातून RTE राखीव जागांसाठी 3 लाख 54 हजार 463 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे, मात्र महाराष्ट्र राज्यात आरटीई अंतर्गत 1 लाख 1 हजार 969 राखीव जागा आहे, या जागांवर राज्यातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे.

'आरटीई' प्रवेशाची सोडत या तारखेला होणार जाहीर - RTE Lottery Result date 2023 24

RTE  योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज केलेल्या पालकांना आता RTE Lottery च्या पहिल्या (RTE List) यादीची प्रतीक्षा लागलेली आहे, (RTE Lottery Result date 2023 24) ची पहिली यादी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रवेशाची लॉटरी काढली जाणार आहे. 

साधारणपणे 5 एप्रिल 2023 रोजी पर्यंत 'आरटीई' प्रवेशाची सोडत निघणार आहे, त्यानंतर किती जणांनी घेतले प्रवेश घेतले हे पाहून प्रतीक्षा यादीतील (RTE Lottery Wating List) च्या मुलांना संधी दिली जाणार आहे. अशी माहिती राज्य संचालक, प्राथमिक शिक्षण पुणे यांनी दिली आहे.

ऑनलाईन अर्ज ते लॉटरी पद्धतीने निवड संपूर्ण माहिती

लॉटरीत नंबर लागल्यानंतर, अर्जातील माहितीची पडताळणी

RTE Lottery जाहीर झाल्यानंतर प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकांना त्यांनी अर्जात नमूद केलेले सर्व कागदपत्रे त्यामध्ये जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, मुलाचे आधारकार्ड, आर्थिक उत्पन्न गटातील पालकांना  एक लाखाच्या आतील उत्पन प्रमाणपत्र, दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र अशी सर्व कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. प्रवेश निश्चित झालेल्या म्हणजेच लॉटरीत नंबर लागलेल्या मुलांच्या पालकांच्या मोबाईलवर मेसेज प्राप्त होईल.

हे सुद्धा वाचा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                              
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now