नामांकित शाळा प्रवेश मिळवण्यासाठी पालकाची धडपड | RTE Admission Last Date 2023

RTE Admission Last Date : आरटीई 25 टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश मिळवण्यासाठी पालक ऑनलाईन अर्ज करतात, सन 2023-24 मध्ये नवीन प्रवेश घेण्यासाठी RTE Admission Last Date 17 मार्च आहे. पालक आपल्या घराजवळील नामांकित शाळेत बालकांचा प्रवेश घेऊ इच्छितात, मात्र ज्या शाळेची गुणवत्ता, सोयी सुविधा चांगल्या आहेत, तेथील शैक्षणिक फी ही खूप मोठ्या प्रमाणात असते, तरीदेखील या शाळेत माझा मुलगा शिकला पाहिजे अशी अनेक पालकांची इच्छा असते. त्यासाठी बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा (RTE Act 2009) नुसार राज्यातील खाजगी शाळांमध्ये 25% जागा ह्या राखीव असतात, या जागांवर मोफत प्रवेश मिळण्यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. या प्रवेश प्रक्रियेचा लाभ राज्यातील आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना मिळतो.

नामांकित शाळा प्रवेश मिळवण्यासाठी पालकाची धडपड | RTE Admission Last Date 2023

RTE आर्थिक दुर्बल आणि वंचित घटक यामध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो? येथे वाचा

RTE Admission Last Date

आरटीई साठी 1 लाखाहून अधिक अर्ज

यंदा आरटीई 25 टक्के योजनेअंतर्गत मोफत प्रवेशासाठी राज्यातील 8 हजार 828 शाळांनी RTE साठी नोंदणी केली असून, त्याअंतर्गत 1 लाख, 1 हजार 969 बालकांना प्रवेश मिळणार आहे. आतापर्यंत राज्यातील पालकांनी RTE मोफत प्रवेशासाठी 1 लाख, 68 हजार 69 बालकांचे प्रवेश अर्ज भरले आहेत. आरटीई साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (RTE Admission Last Date) 17 मार्च 2023 आहे.

आरटीई लॉटरी लिस्ट प्रतीक्षा

राज्यभरातून आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी एक लाखाहून अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे. पालकांच्या आवडत्या शाळेत मुलांना खाजगी शाळेत मोफत प्रवेश मिळेल अशी सर्व पालकांना आशा आहे. यासाठी 17 मार्च नंतर आरटीई प्रवेश लॉटरी लिस्ट जाहीर होईल, त्यानंतर कोणत्या बालकांचा प्रवेश कोणत्या शाळेत निश्चित झाला ? याची माहिती मिळेल यासाठी पालकांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, तेव्हा आरटीई संदर्भातील संपूर्ण महत्त्वाच्या अपडेट साठी 'समावेशित शिक्षण' या शैक्षणिक वेबसाईटला भेट देत रहा.

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                             

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now