NRHM Maharashtra Latest News : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (National Rural Health Mission) ही केंद्र सरकारची महत्वपर्ण योजना असून, या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात राज्य स्तरापासून ते गावपातळी पर्यंत विविध पदांवर कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहे. एकीकडे नियमित कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांचे कामाचे स्वरूप एकाच प्रकारचे असताना, हे कर्मचारी गेल्या 12 ते 15 वर्षापासून अल्प मानधनावर काम करत आहे, दरम्यान NRHM कर्मचाऱ्यांनी कोव्हिड काळात देखील महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या संघटनांनी कित्येकदा शासन दरबारी नियमित सेवेत कायम करण्याबाबत आंदोलन, मोर्चे काढले आहेत व वारंवार सरकारकडे सातव्या वेतन आयोगानुसार पगार आणि सेवेत कायम करण्याची मागणी करण्यात येत आहे, याच धर्तीवर विधानसभेमध्ये या कर्मचाऱ्यांच्या कायम बाबत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता त्यावर आरोग्यमत्र्यांनी महत्वाची (NRHM Maharashtra Latest News) माहिती दिली आहे.
NRHM : कंत्राटी कर्मचऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय ? आरोग्य मंत्री यांचे मोठे विधान
देशातील ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य (NRHM) अभियान अंतर्गत लक्ष केंद्रित केले जात आहे. NRMH ही योजना सन 2005 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांवर राज्य, विभाग, जिल्हा, तालुका तसेच ग्रामीण भागातील PAC अंतर्गत गेल्या 12 ते 15 वर्षापासून कंत्राटी पद्धतीने अल्प मानधनावर काम करत आहेत, एकीकडे नियमित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांच्या कामाचे स्वरूप सारखेच आहे, मात्र या कर्मचाऱ्यांकडून अल्प मानधनावर काम करून घेतले जात आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजनाबाबत अभ्यासगट समिती नेमून अहवालानंतर धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल – मंत्री डॉ.तानाजी सावंत{alertInfo}
शासन सेवेत कायम करण्याचा धोरणात्मक निर्णय केंव्हा घेणार?
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित शासन सेवेतील समायोजन कसे करता येईल याबाबत एक अभ्यासगट (समिती) 31 मार्चपूर्वी तयार करण्यात येईल. अशी महत्वाची माहिती आरोग्यमत्र्यांनी दिली.
स्थापन केल्या जाणाऱ्या अभ्यासगटाने दिलेल्या अहवालानंतर याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.
इतर राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कसे कायम केले यासाठी अभ्यासगट काम करेल
राजस्थान,ओडिसा,मणिपूर , पंजाब आणि हरियाणा या राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी कसा निर्णय घेतला किंवा कोणते धोरण अवलंबले या धर्तीवर महाराष्ट्र राज्य या राज्याच्या धोरणाचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट तयार करून यावर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री यांनी विधानसभेत दिली.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
NRHM कंत्राटी कर्मचारी यांचे महत्वपूर्ण योगदानाची दखल
मंत्री डॉ. सावंत म्हणाले, कोविड महामारीच्या कालावधीमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवाप्रवेश नियमात विहित पद्धतीने बदल करुन या कर्मचाऱ्यांना नियमित शासन सेवेत तातडीने समायोजित करण्याबाबत शासन सकारात्मक आहे.
गेल्या काही दिवसांपासून याबाबत अभियानातील काही कंत्राटी कर्मचारी आंदोलन करीत असून त्यांच्याशी आज समक्ष भेटून आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती करण्यात येईल. असेही यावेळी सांगण्यात आले.