पवित्र पोर्टल 2023 : शिक्षक भरतीसाठी तयार ठेवा ही कागदपत्रे

Maha Teacher Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांची भरती पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणाली द्वारे करण्यात येते, यासाठी उमेदवार टीईटी (TET Exam) परीक्षा पास असलेले उमेदवारांना  शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच (TAIT Exam 2023) परीक्षा द्यावी लागते, टेट या परीक्षेचा निकाल  24 मार्च 2023 रोजी जाहीर करण्यात आला, TAIT परीक्षा 2023 पास उमेदवारांना आता पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे त्यानंतर कागदपत्रे पडताळणी साठी शासनाने ठरवून दिलेले Maha Teacher Recruitment 2023 Documents सादर करावी लागेल, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी कोणती कागपत्रे लागणार ? याची माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

शिक्षक भरतीसाठी आवश्यक पात्रता - Maha Teacher Recruitment 2023 

Maha Teacher Recruitment 2023
Maha Teacher Recruitment 2023

महाराष्ट्र राज्यातील  रिक्त असलेली शिक्षकांची पदे शिक्षक भरती एप्रिल 2023 अखेरपर्यंत 30 हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री यांनी नुकतीच विधानपरिषदेत दिली, त्यानुसार आता राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक महाविद्यालयात शिक्षक पदांसाठी शासनाने वेळोवेळी शैक्षणिक व व्यावसाईक अहर्ता (पात्रता) जाहीर केलेली आहे. 

शिक्षक पदासाठी पवित्र पोर्टल द्वारे निवड होण्यासाठी आवश्यक पात्रता

  • शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) पास असणे आवश्यक आहे.
  • शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) 2023 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पवित्र पोर्टल द्वारे Pavitra Portal Registration 2023 मध्ये नोंदणी केलेली कागदपत्रे सादर करणे आवश्यक
TET Full Form - Teacher Eligibility Test महारष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 
TAIT Full Form - TEACHERS APTITUDE AND INTELLIGENCE TEST (TAIT) शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी{alertInfo}

राज्यातील प्राथमिक , माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालयात शिक्षक हे पद भरती साठी सरकारने पवित्र पोर्टल ही एक संगणकीय प्रणाली 2018 पासून सुरू केली आहे, याचा प्रमुख उद्देश म्हणजे राज्यातील शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सारख्या प्रमाणत संधी देऊन शिक्षक भरती मध्ये पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक नेमणूक करण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.

पवित्र पोर्टल 2023 : शिक्षक भरतीसाठी तयार ठेवा ही कागदपत्रे

प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावयाची कागदपत्रे - Pavitra Portal Documents List 2023

शिक्षक भरती साठी अर्ज केल्यानुसार उमेदवाराची गुणवत्ता, प्रवर्ग, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा व अन्य पात्रतेच्या अटी त्यामध्ये नमूद केलेले कागदपत्रे पडताळणी तपासण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीप्रमाणे तयार ठेवावी

  1. SSC परीक्षेचे प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला (TC)
  2.  शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता कागदपत्र
  3. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) किंवा समकक्ष परीक्षेच्या बाबतीत संबंधित मंडळाचे गुणपत्रक / प्रमाणपत्र. 
  4. उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (HSC) किंवा तत्सम समकक्ष परीक्षेचे गुणपत्रक / प्रमाणपत्र. 
  5. पदवी किंवा पदविका परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र. 
  6. पदव्युत्तर पदवी परीक्षेचे गुणपत्रक / प्रमाणपत्र.
  7. राज्य व केंद्र शासनाने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (TET किंवा CTET) पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र. 
  8.  शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे गुणपत्रक.
  9. महाराष्ट्र राज्यात अधिवास असल्याचे प्रमाणपत्र (Domicile Certificate )
  10. उमेदवारांचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स (यापैकी कोणतेही एक ओळखपत्र) 
  11. मागासवर्गीय उमेदवार असल्याबाबतचा पुरावा (फक्त मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  12. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग, सामाजिक 
  13. आर्थिकदृष्टया मागासवर्ग (SEBC) म्हणून संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या प्रमाणपत्राची प्रत.
  14. विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग तसेच सामाजिक व आर्थिकदृष्टया मागासवर्ग प्रवर्गातील तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील उमेदवारास सक्षम प्राधिकान्याने प्रदान केलेले उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) प्रमाणपत्र 
  15. दिव्यांग उमेदवार असल्यास - दिव्यांग (अपंग) व्यक्ती अधिकार अधिनियम (RPED Act) 2016 नुसार दिव्यांग 21 प्रकारातील दिव्यांग प्रमाणपत्र किमान 40 टक्के असणे आवश्यक आहे. - दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन असे काढा
  16. माजी सैनिक असल्यास - माजी सैनिकांसाठी असलेल्या वयोमर्यादेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यात (लागू असेल त्याप्रमाणे ) सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  17. अमागास महिला आरक्षणासाठी पात्र असल्यास - महिलांसाठी आरक्षित पदाकरिता उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domicile ) असल्याबाबत तसेच उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याबाबत (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती पेसा वगळून) स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (non creamy layer certificate) 
  18. खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरिता - अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंसाठी आरक्षित पदावर दावा करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यात (लागू असेल त्याप्रमाणे) सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रदान केलेले प्रमाणपत्र
  19. विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा - विवाहित स्त्रियांना विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला किंवा नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र
  20. इ. १ ली ते ५ वी साठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता उच्च माध्यमिक उत्तीर्ण (खुल्या प्रवर्गासाठी- ४५ टक्के गुणांसह व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४० टक्के गुणांसह) व व्यावसायिक अर्हता - D.ED/D.EL.Ed / DT.Ed./D.Ed (Special Education)/TCH आणि TET Paper 1 or TET Paper -2 or CTET Paper 1 or CTET Paper 2 PASS (अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीपूर्वी उत्तीर्ण आवश्यक )
  21. इ. ६ वी ते ८ वी साठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता संबंधित विषयातील पदवी (पदवीच्या अंतिम वर्षी खुल्या प्रवर्गासाठी ४५ टक्के गुणांसह व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४० टक्के गुणांसह) व व्यावसायिक अर्हता D.ED/D.El.Ed./D.T.Ed / D.Ed (Special Education ) /TCH OR B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed आणि TET Paper 2 OR CTET Paper 2 (अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीपूर्वी उत्तीर्ण आवश्यक )
  22. इ. ९ वी ते १० वी साठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता- संबंधित विषयातील (पदवीच्या अंतिम वर्षी खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के गुणांसह व मागासवर्गीय प्रवर्गासाठी- ४५ टक्के गुणांसह) व व्यावसायिक अर्हता -B.Ed./B.P.Ed/B.A.Ed./B.Sc. Ed
  23. इ. ११ वी ते १२ वी साठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता- संबंधित विषयातील पदव्युतर पदवी ( खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के गुणांसह व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४५ टक्के गुणांसह) व व्यावसायिक अर्हता B.Ed. / BA.Ed. / Bsc Ed
  24. पदवीधर/ पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी आरक्षण प्रमाणपत्र 
  25. प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण प्रमाणपत्र 
  26. अपत्य प्रतिज्ञापत्र (अपत्यांची संख्या दोन पेक्षा अधिक असेल तर दि. २८ मार्च २००६ व तद्नंतर जन्माला आलेल्या अपत्यामुळे उमेदवार शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अपात्र ठरविण्यात येईल.)
  27. संगणक हाताळणी वापराबाबतचे ज्ञान प्रमाणपत्र

शिक्षक भरती 2023 शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आणि निवड प्रक्रिया -  शासन निर्णय 

महत्वपूर्ण बातम्या


प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now