आंतरराष्ट्रीय महिला दिन : आंतरराष्ट्रीय महिला दिन हा संपूर्ण जगभरामध्ये ८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. २१ व्या शतकामध्ये महिला प्रत्येक क्षेत्रात यशस्वी योगदान देत आहे, यावर्षीची International Womens Day Theme 2023 ही डीजी ऑल : संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर लिंगभाव समानतेसाठी' अशी आहे.
जागतिक महिला दिवस इतिहास
आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा व्हावा अशी कल्पना सर्वप्रथम क्लारा झेटकिन या अमेरिकेच्या साम्यवादी विचारसरणीच्या महिलेला सुचली, त्या महिलांच्या हक्कासाठी पुढाकार घेत असत. त्यांनी 1908 मध्ये न्यूयॉर्क येथे 12 ते 15 हजार महिलांचा मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये विविध मागण्या मांडण्यात आल्या त्यामध्ये महिला ज्या ठिकाणी नोकरी करत तिथे त्यांची पिळवणूक होत असे, त्यांना चांगला पगार मिळावा, मतदानाचा अधिकार मिळावा अशा विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांनी या रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने पहिल्यांदा राष्ट्रीय महिला दिनाची घोषणा केली होती. पुढे 1911 मध्ये डेन्मार्क, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.
खऱ्या अर्थाने सन 1975 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने अधिकृतपणे 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास मान्यता दिली. तेव्हापासून संपूर्ण जगभरामध्ये दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो?
जागतिक महिला दिवस दरवर्षी ८ मार्च रोजी संपूर्ण जगभरामध्ये साजरा करण्यात येतो.
जागतिक महिला दिन थीम - International Womens Day Theme 2023
आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च रोजी संपूर्ण जगभरामध्ये साजरा होतो. यावर्षी २०२३ मध्ये साजरा होणाऱ्या महिला दिनाची थीम “DigitALL: Innovation and technology for gender equality,” म्हणजेच डीजी ऑल : संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर लिंगभाव समानतेसाठी' अशी आहे.
जागतिक महिला दिन थीमचा उद्देश
डीजी ऑल : संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर लिंगभाव समानतेसाठी' यावर्षीच्या थीमचा उद्देश हा असा आहे की, जगभरातील ज्या महिला आणि मुली तंत्रज्ञान व ऑनलाईन शिक्षणात महत्वपूर्ण योगदान देत आहेत, ते ओळखून त्यांचा सन्मान करणे असा जागतिक महिला दिन थीमचा उद्देश आहे.
जागतिक महिला दिन का साजरा केला जातो?
जागतिक महिला दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना सर्व क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीने सर्व हक्क मिळावे, समाजातील लिंगभेद नष्ट व्हावा आणि स्रीयांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने दरवर्षी महिलांसाठी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो.
या दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांचा सन्मान करूया, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छ्या !
महत्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण Whatsapp Group ला जॉईन व्हा.