Influenza Virus H3N2 Flu Symptoms : राज्यात इन्फ्लुएंझा (Influenza virus H3N2) या आजाराने सध्या डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस Influenza रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याबाबत सतर्कता म्हणून आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत, राज्यस्तरावरून नियमितपणे Influenza virus H3N2 संदर्भात सनियंत्रण करण्यात येत आहे. H3N2 या आजाराची लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत, दिरंगाई करु नये, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे. इन्फ्लुएंझा H3N2 फ्ल्यू ची (फ्लू) लक्षणे काय आहेत? (Influenza virus H3N2 Symptoms) आणि खबरदारीचे उपाय व कोणती काळजी घ्यावी? याबाबत आजच्या लेखामध्ये सविस्तर जाणून घेऊयात.
H3N2 Influenza Virus : काळजी घ्या! इन्फ्लुएंझा काय आहे? लक्षणे व उपाय? | Influenza virus H3N2 Flu Symptoms
Influenza Virus H3N2 Flu Symptoms |
Influenza virus H3N2 Flu या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अहमदनगर आणि नागपूरमध्ये एका व्यक्तीचा H3H2 ने मृत्यू झाला आहे.
इन्फ्लुएंझा (Influenza A) काय आहे? Influenza meaning in Marathi
Influenza A हा (व्हायरस) आजार श्वसनाशी संबंधित आहे. #इन्फ्लुएंझा ची लागण ही आपल्याला नाक, डोळे तसेच तोंडातून हे विषाणू शरीरात प्रवेश करतात, त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी कोव्हिड 19 च्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
इन्फ्लुएंझा ए (Influenza A) हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. Influenza A चे वेगवेगळे उपप्रकार आहेत. उदा. H1N1 H3N2 इ. या आजाराची सर्वसाधारण लक्षणे ताप, खोकला, घशात खवखव होणे, धाप लागणे, न्यूमोनिया अशी विविध लक्षणे आढळून येतात.
इन्फ्लुएंझा ए (Influenza A) रुग्ण राज्यातील स्थिती
इन्फ्लुएंझा ए बाबत रुग्ण सर्वेक्षण मुख्यतः लक्षणाधारीत करण्यात येत आहे. याबाबत सर्व आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी करण्यात येते व मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार करण्यात येतात. १३ मार्च २०२३ अखेर H1N1 बाधित ३०३ रुग्ण आणि H3N2 बाधित असलेले ५८ रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात इन्फ्लुएंझा या आजाराचे रुग्ण पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील शहरी भागात दिसून येत आहेत.
Influenza A या आजाराची लक्षणे तसेच उपचार पद्धती करण्याकरिता याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. राज्यातील रुग्णालयात संशयीत रुग्णांवर आवश्यकतेनुसार विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत असून, आरोग्य केंद्रात आजारावरील उपचारासाठी लागणारी औषधे उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
इन्फ्लुएंझा फ्लू ची लक्षणे कोणती आहेत? | Influenza virus H3N2 Flu Symptoms
Influenza H3N2 flu चे Symptoms (लक्षणे) आढळून आल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. आणि रुग्णांचे लवकरात लवकर निदान करून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू करावे.
इन्फ्लुएंझा (फ्लू) ची प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे दिसून येतात
- ताप
- डोकेदुखी
- खोकला, नाक गळणे
- अंगदुखी
- घसादुखी
- घशाला खवखव
- धाप लागणे
- न्युमोनिया
- भूक न लागणे
- जुलाब
- मळमळ होणे
इन्फ्लूएंझा आजार टाळण्यासाठी काय करावे? | Influenza Virus
- वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा.
- पौष्टिक आहार घ्या.
- धुम्रपान टाळा.
- पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.
- भरपूर पाणी प्या.
- लिंबु, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा.
इन्फ्लूएंझा आजार टाळण्यासाठी हे करू नका?
- हस्तांदोलन.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
- डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नका.
- आपल्याला फ्लू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
इन्फ्लूएंझा रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?
- रुग्णाने शक्यतो बैठकीच्या खोलीत, ज्या ठिकाणी सर्व कुटुंबीय असतील तेथे येणे टाळावे.
- रुग्णाने घरात जर कोणी अति जोखमीचे आजार असणारे असतील तर त्यांच्या निकट सहवासात जाऊ नये.
- घटात ब्लिच द्रावण तयार करावे. याचा उपयोग रुग्णाचा टेबल, खुर्ची, रुग्णाचा स्पर्श होतील असे पृष्ठभाग पुसण्यासाठी करावा.
- दिवसातून किमान दोनवेळा गरम पाण्यात मीठ हळद टाकून गुळण्या कराव्यात, तसेच गरम पाण्याची वाफ घ्यावी.
- रुग्णाने वापरलेले रुमाल गरम पाण्यात, ब्लिच द्रावणात अर्धा तास भिजवून नंतर स्वच्छ धुवावेत.
- रुग्णाचे अंथरूण पांघरूण, टॉवेल हाताळल्यास हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत.
- ताप आणि फल्यूची इतर लक्षणे संपल्यानंतर किमान 24 तासापर्यंत घरी रहावे..
- रुग्णाने वापरलेले टिश्यू पेपर अथवा मास्क कुठेही टाकू नयेत.
- रुग्णाची सेवा शक्यतो कुटुंबातील एकाच व्यक्तीने करावी.
- रुग्णाने भरपूर विश्रांती घ्यावी आणि द्रव पदार्थ घ्यावेत.
- रुग्णाकरिता वेगळी खोली निश्चित करावी.
- रुग्णाने स्वतः नाकावर रुमाल बांधावा.
- रुग्णाने धुम्रपान करू नये.
- डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
आरोग्यविषयक मोफत माहितीसाठी टोल फ्री क्रमांक
आरोग्यविषयक सल्ला, आरोग्यविषयक योजनांची माहिती, रक्ताच्या उपलब्धतेबाबत माहिती यासह आरोग्याशी संबंधित सर्वच माहिती जाणून घ्या. डायल करा टोल फ्री क्रमांक १०४. आपल्या सेवेसाठी आणि सोयीसाठी आहे.
हेल्थ टीप - हाताची स्वच्छता ही अत्यंत महत्वाची असून ती न ठेवल्यास यामार्फत अनेक आजार आपल्याला होऊ शकतात. त्यामुळे हाताची स्वच्छता ठेवणे महत्वाचे आहे.{alertInfo}
ऋतूनुसार फळे खा अन् निरोगी राहा
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे ताण-तणाव व्यवस्थापनावर विशेष व्याख्यान
आनंदी व निरोगी दीर्घ आयुष्यसाठी दररोज 10 मिनिटं तरी चालायलाच हवं
चष्मा लागण्याचे लक्षणे येथे पहा
महत्वाच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण Whatsapp Group ला जॉईन व्हा.