अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास अर्थ विभागाची मान्यता

Finance Department Approves Increase in Salary of Teachers on Hourly Basis : तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. 

Salary of Teachers on Hourly Basis

तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता

राज्यातील शासकीय महाविद्यालये, संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालयामध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती व इतर अन्य कारणामुळे रिक्त आहेत.  मात्र विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये यासाठी रिक्त पदांवर तासिका तत्वावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात येते. तासिका तत्त्वावरील (Hourly Basis) अध्यापकांच्या मानधनात वाढ (Salary of Teachers on Hourly Basis)  करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

  1. उच्च शिक्षण संचालनालय अंतर्गत मानधन वाढ
  2. तंत्र शिक्षण संचालनालय अंतर्गत मानधन वाढ
  3. कला संचालनालय अंतर्गत मानधन वाढ

उच्च शिक्षण संचालनालय अंतर्गत मानधन वाढ

कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमाकरिता रु.625 इतके मानधन देण्यात येत होते, आता त्यामध्ये वाढ करून 1000 रु. प्रति तास व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता रु.750 वरुन 1000 हजार रु प्रति तास करण्यात आले आहे.

शिक्षणशास्त्र / शारीरिक शिक्षण / विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमांकरिता 750 वरुन रु.1000 हजार रु प्रति तास करण्यात आले आहे.

RTE 25 टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

तंत्र शिक्षण संचालनालय अंतर्गत मानधन वाढ

उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ अभियंता यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी 1000 वरुन 1500 रुपये प्रति तास करण्यात आले आहे.

पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मानधन दर प्रति तास 600 वरुन रु.1000 प्रति तास करण्यात आले.

पदविका अभ्याक्रमांसाठी मानधन दर रु. 500 वरुन रु.800 प्रति तास.

कला संचालनालय अंतर्गत मानधन वाढ

उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ व्यवस्थापक यांचे व्याख्यान मानधन दर रु. 750 वरुन रु.1 हजार 500 प्रति तास. तर

कला शिक्षण पदविका तसेच पदवी/पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्याक्रम मानधन दर रु. 625 वरुन रु.1 हजार प्रति तासाप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्या

गुढीपाडव्याच्या जनतेला शुभेछ्या देत मुख्यमंत्र्यांनी सांगितला नव्या वर्षाचा संकल्प
प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू होणार - ग्रामविकास मंत्री
मुख्यमंत्र्यांसोबत यशस्वी चर्चा - जुनी पेन्शन योजना
कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत ? आरोग्य मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री, असा करा ऑनलाईन अर्ज

प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now