अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय ! प्रस्ताव अर्थ विभागाकडे सादर - शिक्षणमंत्री
अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ नियुक्ती
राज्यातील विद्यार्थी संख्येच्या प्रमाणातील अटीनुसार अतिरिक्त ठरलेल्या पूर्णवेळ ग्रंथपालांचे समायोजन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय व अर्धवेळ ग्रंथपालांची पूर्णवेळ ग्रंथपालपदी नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव अर्थ विभागाकडे सादर करण्यात आला आहे.
यासंदर्भात निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
ज्या ठिकाणी शाळांची पटसंख्या कमी आहे, अशा शाळा एकत्रित करुन तिथे पूर्णवेळ ग्रंथपाल उपलब्ध करुन देता येईल अगर कसे? यासंदर्भात विचार सुरु आहे.
तसा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला असून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी विधानपिषदेत दिली.
पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये ई- ग्रंथालय
राज्यातील शालेय शिक्षण विभागा अंतर्गत अनेक विद्यार्थी हिताचे निर्णय, योजना, शासन राबवित आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये ई- ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्येक शाळेत पुस्तकपेटी योजना आणि डिजीटल लायब्ररीचा उपक्रम राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यामुळे शालेय शिक्षणात गुणात्मक फरक पडेल, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.