DA for Central Government Employees News Latest Update : केंद्र सरकारने देशातील 1 कोटीपेक्षा अधिक कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना दिलासा देत महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये DA (महागाई भत्ता) चार टक्क्यांनी वाढ (7th Pay Commission DA Increase) करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, बऱ्याच दिवसापासून महागाई भत्ता वाढच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचार्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. देशभरातील केंद्र सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना हा लाभ मिळणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्के वाढ - 7th Pay Commission DA Increase
7th Pay Commission DA Increase |
7th Pay Commission DA Increase : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारने DA महागाई भत्ता हा 38 टक्क्यावरून 42 टक्के केला आहे. या महत्वपूर्ण निर्णायामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. दरवर्षी मार्च महिन्यामध्ये केंद्र सरकार कर्मचार्यांचे DA महागाई भत्यामध्ये मध्ये वाढ करत असते. त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी देखील महागाई भत्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
महागाई भत्ता लाभ 1 जानेवारी 2023 पासून मिळणार
महागाई भत्ता हा 38 टक्क्यांवरून 42 टक्के करण्यात आला असून, तो 1 जानेवारी 2023 पासून मिळेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. यासाठी सरकारचे 12 हजार 815 कोटी रुपये खर्च होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. वाढत्या महागाईच्या काळात डीए वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये देखील वाढ होईल, या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
कसा वाढत गेला डीए 4 वर्षात ? - 7th Pay Commission DA Increase
- 2019 - 7th Pay Commission नुसार वेतन घेणाऱ्या सर्व कर्मचार्यांना 17 टक्के महागाई भत्ता लागू
- 2020 - कोरोना महामारीमुळे महागाई भत्त्यात कोणतीही वाढ झाली नाही.
- 2021 - महागाई भत्ता 11 टक्केंनी वाढ पुन्हा याच वर्षी 4 टक्के वाढ अशी एकूण 15 टक्के वाढ करण्यात आली, म्हणजे मागील 17 आणि हे 15 एकूण 31 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता.
- 2022 - यावर्षी DA मध्ये 7 टक्के वाढ करण्यात आली, म्हणजेच मागील 31 आणि हे 7 मिळून एकूण 38 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता.
- 2023 - आता यामध्ये 4 टक्यांनी पुन्हा वाढ म्हणजे एकूण 42 टक्यांनी महागाई भत्ता मिळणार
किती वाढणार पगार 42 टक्के DA नुसार ?
महागाई भत्ता वाढ केल्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार असून, पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे. पगारात किती पैसे वाढणार हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया
समजा एखाद्या कर्मचारांचा बेसिक पगार 25 हजार 500 रुपये आहे. सध्या मिळणाऱ्या 38 टक्के DA नुसार त्यांना 9 हजार 690 रु. मिळतात.
DA 42 टक्के झाला म्हणजे महागाई भत्ता 10710 रुपये होईल. म्हणजे प्रत्येक महिन्याला 1020 रु. पगारात वाढ होईल.
आनंदाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू
महत्वपूर्ण बातम्या
कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत ? आरोग्य मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय