स्वामी विवेकानंद यांची संपूर्ण मराठी माहिती - Swami Vivekananda Information Marathi

स्वामी विवेकानंद हे भारतातील थोर पुरुष आणि महान विचारवंत आहे. स्वामी विवेकानंद यांची जयंती दरवर्षी दिनांक १२ जानेवारी रोजी साजरी केली जाते. हा दिवस देशभरात 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा केला जातो. 

हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणण्यासाठी आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे महान कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले. भारतातील हिंदू सुधारणा चळवळींमध्ये ते प्रमुख होते. 

स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या थोर संस्कृतीचा व उदात्त मानवतावादी तत्त्वज्ञानाचा जगाला परिचय करून देण्याचे महान कार्य केले आहे. 

त्यांनी १८९३ मध्ये शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय दिला. आणि या परिषदेस संबोधित करताना त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात  'प्रिय बंधु भगिनींनो'  या शब्दांनी सुरु केल्यामुळे त्यांचे हे शब्द खूप प्रसिद्ध झाले आहे. स्वामी विवेकानंदांचे अतिशय साधे जीवन आणि त्यांचे महान कार्य आणि विचार आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायक आहेत. असे महान विचारवंत स्वामी विवेकानंद यांच्या विषयीची संपूर्ण मराठी माहिती (Swami Vivekananda Information Marathi)आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

स्वामी विवेकानंद यांची संपूर्ण मराठी माहिती - Swami Vivekananda Information Marathi

स्वामी विवेकानंद यांची संपूर्ण मराठी माहिती

स्वामी विवेकानंद यांचे बालपण व शिक्षण

स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता (सिमलापल्ली) येथे झाला. त्या दिवशी मकर संक्रातीचा सण होता. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते. विवेकानंद यांचे आजोबा संस्कृत आणि पर्शियन भाषेचे अभ्यासक होते. घरातील अशा प्रकारच्या धार्मिक आणि सुशिक्षित वातावरणामुळे स्वामी विवेकानंद यांच्यावर चांगला प्रभाव पडला व ते त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले. 

स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. आणि त्या धार्मिक गृहिणी होत्या. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त होते. विवेकानंद हे बंगाली कुटुंबातील होते. त्यांचे वडील कोलकत्ता उच्च न्यायालयात प्रसिद्ध वकिल होते. ते धार्मिक आणि सामाजिक बाबतीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते.

स्वामी विवेकानंद यांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. पुढे त्यांनी १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. शालेय जीवनात स्वामी विवेकानंद यांच्यावर पाश्चात्त्य विचारांचा प्रभाव होता.

काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्टची आणि १८८४ मध्ये बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले.  

नोव्हेंबर, १८८१ मध्ये विवेकानंदांचा रामकृष्ण परमहंस यांच्याशी परिचय झाला. ही घटना विवेकानंदांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. योगसाधनेच्या मार्गाने मोक्षप्राप्ती करून घेता येते असा रामकृष्णांचा विश्वास होता. त्यांच्या या विचारांचा विवेकानंद यांच्यावर मोठाच प्रभाव पडला व ते रामकृष्णांचे शिष्य बनले.

बंगालमधील ब्राह्मो समाजाच्या प्रभावामुळे ते मूर्तिपूजा व बहुदेवतावाद यांच्या विरोधी होते. परंतु रामकृष्ण परमहंसांच्या सहवासात विवेकानंदांच्या विचारांत बदल घडून आणि ते सनातन हिंदू धर्म व तत्त्वज्ञान यांचे समर्थक बनले. सहा वर्षे त्यांनी एकांतात योगसाधना केली. पुढे त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानभर भ्रमंती केली.

प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. १८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हेस्टी यांनी म्हटले आहे की, 
नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही.

स्वामी विवेकानंद यांचे कार्य

'शिकागो' ची सर्वधर्म परिषद 

शिकागो येथे सर्व धर्मीय परिषद कधी भरली होती?

११ सप्टेंबर १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो या शहरात जागतिक सर्व धर्मीय परिषद भरली होती. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी हिंदू धर्माची बाजू अतिशय प्रभावीपणे मांडली. आपल्या भाषणाची 'प्रिय बंधु भगिनींनो' अशी करून त्यांनी तेथील उपस्थित श्रोत्यांच्या हृदयास हात घातला. आपल्या ओघवत्या शैलीत हिंदू धर्माची श्रेष्ठता व उदात्तता त्यांनी सर्वांना सुरुवात पटवून दिली.

अमेरिकेत महत्वाचे योगदान

अमेरिकेतही हिंदू धर्माचा महान संदेश स्वामी विवेकानंदांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे आणि त्यांच्या विद्वत्तेमुळे अमेरिकेतील अनेक लोक त्यांच्या भजनी लागले. त्यांच्या चाहत्यांनी अमेरिकेत त्यांची अनेक व्याख्याने घडवून आणली. विवेकानंदांनी दोन वर्षे अमेरिकेत वास्तव्य केले आणि हिंदू धर्माचा महान संदेश तेथील लोकांपर्यंत पोहोचविला. इंग्लंडमध्येही अनुयायी त्यानंतर स्वामीजी इंग्लंडला गेले. तेथेही त्यांनी आपले व्यक्तिमत्त्व व विचार यांनी लोकांना प्रभावित केले. इंग्लंडमध्ये त्यांना अनेक अनुयायी मिळाले. तेथील कु.मार्गारिट नोबेल या त्यांच्या शिष्या बनल्या. पुढे कु. नोबेल यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला व त्या भगिनी निवेदिता म्हणून प्रसिद्धीस आल्या. 
हिंदू अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रसार स्वामी विवेकानंद यांनी पाश्चात्त्य देशांतील भौतिकवादाचा हिंदुस्थानातील अध्यात्मवादाशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक पाश्चात्त्य देशांना भेटी दिल्या आणि त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रचार- प्रसार करून त्याचे श्रेष्ठत्व लोकांना पटवून दिले. 

रामकृष्ण मिशनची स्थापना

स्वामी विवेकानंद यांनी दिनांक १ मे १८९७ रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. जगातील सर्वच धर्म सत्य असून ते एकाच ध्येयाप्रत जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहे. आत्मसाक्षात्कार घडवून आणण्यास मूर्तिपूजा साहाय्यभूत ठरते. अशी रामकृष्ण मिशनची शिकवण होती. ठिकठिकाणी शाखा व कार्य स्वामी विवेकानंदांनी जगात ठिकठिकाणी रामकृष्ण मिशनच्या शाखा स्थापन केल्या. सनातन हिंदू धर्माच्या आधारे व्यापक विश्वधर्माचा संदेश जगाला देणे, हिंदू धर्मातील अद्वैत तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठत्व लोकांना पटवून देणे, हिंदू धर्माच्या खऱ्या तत्त्वज्ञानाची त्यांना ओळख करून देणे इत्यादी कामे रामकृष्ण मिशनने केली.

लोकसेवेचे कार्य

रामकृष्ण मिशनने ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्तीवर लोकसेवेचे कार्यही केले. धार्मिक सुधारणेबरोबर सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी या मिशनने बरेच प्रयत्न केले. याशिवाय मिशनच्या वतीने ठिकठिकाणी अनाथाश्रम, रुग्णालये, वसतिगृहे यांची स्थापना करण्यात आली. नैसर्गिक आपत्तींच्या काळात संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्यातही रामकृष्ण मिशनने पुढाकार घेतला.
स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती व स्वदेशाभिमान यांची भारतीयांना ओळख करून देण्याचे आणि त्यांना कार्यप्रवण बनविण्याचे कार्यही केले. ४ जुलै, १९०२ रोजी स्वामीजींनी या जगाचा निरोप घेतला.

स्वामी विवेकानंद विचार मराठी | Swami Vivekananda Thoughts in Marathi

स्वामी विवेकानंद यांचे युवकांना संदेश देणारे प्रेरणादायी विचार


उठा, जागे व्हा आणि यश प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका…!

स्वतःला कमजोर समजणे, हे सर्वात मोठे पाप आहे.

तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही, कोणीही अध्यात्मिक बनवू शकत नाही.

सत्याला हजार पद्धतीने सांगितले, तरी ते सत्येच राहते.

बाहेरील स्वभाव हा आतील स्वभावाचे मोठे रूप आहे.

विश्वातील सर्व शक्ती आधीपासूनच आपल्या आहेत. आणि आपणच ते आहोत जे डोळ्यावर हात झाकून, अंधार आहे म्हणून रडतो.

विश्व ही एक विशाल व्यायाम शाळा आहे.
जेथे आपण स्वत:ला मजबूत करण्यासाठी येतो.

हृदय व मेंदूतील संघर्षात हृदयाचेच ऐका.

ज्या दिवशी तुम्हाला एकही समस्या आली नाही,
तेव्हा तुम्ही समजू शकता की, तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात.

एका वेळी एकच काम करा,
आणि ते काम करीत असताना
आपले संपूर्ण लक्ष त्यावर केंद्रित असू द्या.

जोपर्यंत जिवंत आहात, तोपर्यंत शिकत रहा,
कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे.

जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास राहणार नाही,
तोपर्यंत तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवू शकणार नाही.

Swami Vivekananda FAQ

प्रश्न - स्वामी विवेकानंद यांचे नाव काय आहे?
उत्तर - स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त आहे.
प्रश्न - स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते?
उत्तर - स्वामी विवेकानंद यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस होते.
प्रश्न - स्वामी विवेकानंद यांचा जन्म कुठे झाला?
उत्तर - स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोलकत्ता (सिमलापल्ली) येथे दिनांक १२ जानेवारी १८६३ रोजी झाला.
प्रश्न - स्वामी विवेकानंद किती वर्षे जगले?
उत्तर - स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिनांक १२ जानेवारी १८६३ रोजी झाला,
दिनांक ४ जुलै, १९०२ रोजी स्वामीजींनी या जगाचा निरोप घेतला.स्वामी विवेकानंद ३९ वर्षे जगले.
प्रश्न - स्वामी विवेकानंदाचे मूळ नांव काय होते?
उत्तर - स्वामी विवेकानंद यांचे मूळ नांव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त होते.
प्रश्न - जागतिक सर्वधर्म परिषद कुठे आयोजित झाली होती?
उत्तर - अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे जागतिक सर्वधर्म परिषद आयोजित करण्यात आली होती?
प्रश्न - शिकागो येथे सर्व धर्मीय परिषद कधी भरली होती?
उत्तर - शिकागो येथे दिनांक ११ सप्टेंबर १८९३ रोजी सर्व धर्मीय परिषद भरली होती.

हे सुद्धा वाचा 
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now