विद्यार्थ्यांना श्रीहरिकोटा येथे विमानाने जाण्याची सुवर्ण संधी - निवडीसाठी तीन टप्पे

मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी, शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची ओळख निर्माण होऊन शास्त्रज्ञ निर्मितीस हातभार लागावा यासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा येथे काढली जाणार आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षांचे तीन टप्पे पार करावे लागणार आहेत. त्यातूनच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची या सहली साठी निवड केली जाणार आहे. यासंदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या लेखात घेणार आहोत.

विद्यार्थ्यांना श्रीहरिकोटा येथे विमानाने जाण्याची सुवर्ण संधी - निवडीसाठी तीन टप्पे 

shaikshanik sahal

मुख्य उद्देश

मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी, शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची ओळख निर्माण होऊन शास्त्रज्ञ निर्मितीस हातभार लागावा हा या शैक्षणिक सहलीचा मुख्य उद्देश आहे.

या ठिकाणांना देणार भेटी

जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्तीचा विकास व्हावा, शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची ओळख निर्माण होऊन राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी यासाठी विद्यार्थ्यांची अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा, थुंबा स्पेस म्युझियम तिरुवनंतपुरम (केरळ), विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्निकल म्युझियम बंगलोर येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या आहेत. 

त्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षांचे तीन टप्पे पार करावे लागणार आहेत. त्यातूनच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यासहली साठी निवड केली जाणार आहे.

मराठवाड्यात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांची माहिती व्हावी तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी अशा सुमारे १७ हजार शाळांमधून शास्त्रज्ञांची जयंती साजरी केली जात आहे.  

या वेळी कार्यक्रमात शास्त्रज्ञांची नावे, शिक्षण, त्यांनी लावलेला शोध याची माहिती दिली जात आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड

परीक्षेचे तीन टप्पे

टप्पा - १

सर्वप्रथम केंद्रस्तरावर इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची २७ फेब्रुवारी रोजी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ५० प्रश्नांसाठी १०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे.

टप्पा - २

केंद्रस्तरावरील भाग घेतलेल्या परीक्षेतील गुणांच्या आधारे पहिल्या १०  विद्यार्थ्यांची निवड तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी करण्यात येईल. ३ मार्च रोजी तालुकास्तरावर ७५ प्रश्नांसाठी ७५ गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा व २५ गुणांची निबंध स्पर्धा होईल.

टप्पा - ३

त्यानंतर १० मार्च रोजी जिल्हास्तरावर ७५ गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा व २५ गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा होईल. त्यानंतर अंतिम विद्यार्थी या शैक्षणिक सहलीसाठी निवडले जातील. 

अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा शैक्षणिक सहल मोफत

ही शैक्षणिक सहल हवाईमार्गे काढली जाणार असून, विद्यार्थ्यांची अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा, थुंबा स्पेस म्युझियम तिरुवनंतपुरम (केरळ), विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्निकल म्युझियम बंगलोर येथे विद्यार्थ्यांना जाण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.

अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा येथील सहलीसाठी निवड झालेल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसोबत एक महिला वैद्यकीय अधिकारी व एका शिक्षिकेची नियुक्ती केली जाणार आहे. 

सहल हवाईमार्गे काढली जाणार असून प्रवास, व्हावा, भोजन, निवास याचा सर्व खर्च निश्चित करून जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक सहल मोफत असणार आहे.

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                     

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now