ऋतूनुसार फळे खा अन् निरोगी राहा - Seasonal Fruits in India

आरोग्य धनसंपदा ! आरोग्य चांगले असेल तर आयुष्यातील सर्व स्वप्न साकार करता येतात. कोणतेही काम करण्यासाठी आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. कोव्हीड-19 पासून तर प्रत्येकजण आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देत आहे. निरोगी राहण्यासाठी आपण घेत असलेला आहार आणि तो आहार पचवण्यासाठी ची आपली शक्ती खर्च करण्याची आवश्यकता म्हणजे व्यायाम या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच आहारात फळ-भाज्यांचे सेवन तेवढेच गरजेचे आहे. प्रत्येक पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूमध्ये येणारी फळे ही शरीरास लागणारे जीवनसत्वे देत रोगप्रतिकारक शक्ती वाढवित असतात. त्याचबरोबर विविध आजारांपासून बचाव करतात. यामुळे प्रत्येक ऋतूनुसार येणारे फळांची चव चाखायलाच पाहिजे. म्हणूनच फळे खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. आज आपण ऋतूनुसार (हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा) या ऋतूत कोणते फळे आवर्जून खायला हवीत याबद्दलची माहिती पाहणार आहोत.

{tocify} $title={हायलाईट्स}

ऋतूनुसार फळे खा अन् निरोगी राहा - Seasonal Fruits in India

ऋतूनुसार फळे खा अन् निरोगी राहा
Seasonal Fruits in India

उन्हाळ्यात येणारी फळे - Summer Season Fruits in india

उन्हाळ्यातील फळे - उष्णतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा असे आजारही होतात. यामध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी कलिंगड, खरबूज, अंबा, स्ट्रॉबेरी, उसाचा रस. लिची, द्राक्षे, डाळिंब, करवंदे, रसदार फळे खावीत.

  • कलिंगडाच्या बियांमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, जस्त, नेशिअम, पोटॅशियमसारखे पोषक घटक आहेत. 
  • कलिंगडच्या बिया खाल्ल्याने मुरूम, कोरडेपणा आणि वृद्धत्व त्वचेवर दिसत नाही, विपन्ये ऑटऑक्सिडंट्स असतात. 
  • कलिंगडात लोह, कॅल्शिअम, शिम, तांबे, पोटेशियम, व्हिटॅमिन सी, बी १ ते बी-६ यासारखे बरेच पोषक घटक असतात. 
  • तर खरबुजामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असो. यात ऑक्सिडेंट कोलन से कैन्सर, ल्युकेमिया आणि प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करते. 
  • डोळ्यासाठी चांगले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत त्वचेसाठी फायदेशीर चेहरा चमकदार करते, पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

पावसाळ्यात येणारी फळे - Monsoon Season Fruits in india

पावसाळा सुरू झाल्यानंतर विविध व्हायरल आजार येतात. या काळात पचनशक्ती मंदावते. यामुळे पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी व विविध व्हायरसपासून वाचण्यासाठी डाळिंब खावे. हे फळ वर्षभर उपलब्ध असते. पचनशक्ती आणि रक्तवाढीसाठी उपयुक्त असलेले हे फळ आहे. 

यासह जांभूळही पावसाळ्यात मिळते. हे फळ खाल्ल्यानंतर मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आणि आजार कमी होतात, यासाह युटीक अॅसिड समस्या दूर होत इन्फेक्शन कमी करण्यास मदत होते. मधुमेहीसाठी हे फळ उपयुक्त आहे. या काळात सडलेली आणि खराब होण्याच्या मार्गावर असलेली फळे खाऊ नयेत.

हिवाळ्यात येणारी फळे - Winter Season Fruits in india

सध्या हिवाळा हा ऋतू सुरू आहे. त्यातही दरवर्षी हवामानामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहे. निसर्ग आपल्याला त्या-त्या ऋतूत फळे देत असतो. आपण आरोग्याची अतिकाळजी नावाखाली या फळांपासून दूर राहतो. आवर्जून त्या-त्या ऋतूतील फळे खायला हवेत. हिवाळ्यातील फळे कोणती आहेत वाचा पुढे

हिवाळ्यात शरीरातील ऊर्जा कमी होते, पाणी कमी होत असल्याने ओठ फाटण्यासारखे प्रकार होतात. यामुळे या काळात ऊर्जा, उष्णता देणारी फळे खाल्ली जातात. वर्षभरातील हिवाळा हा असा ऋतू आहे की, या ऋतूत कोणताही जड असलेला आहार सहज पचवून जातो. तेवढी शक्ती ऊर्जा निर्माण झालेली असते.

आपल्या आरोग्य संबंधित काही तक्रारी असल्यास ही फळे खाण्यापूर्वी आपण डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

हिवाळ्यात प्रामुख्याने पेरू, पपई, चेरी, रामबेरी, बोर, कच्चे अंजीर, चिंच, स्ट्रॉबेरी, आवळा, सफरचंद हे खावेत. 

  • पेरूतून फायबर्स आणि व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात मिळते. 
  • तसेच आवळ्यातून व्हिटॅमिन्स सी आणि फायबर्स मिळते. 
  • सीताफळातून आयर्न, मॅग्नेशिअम, सोडियम आणि पॉटॅशियम मिळते. 
  • पपई हे उष्ण असून यातून भरपूर प्रमाणात फायबर मिळते. 
  • बोर- प्रथिने कार्बोदके, पॉटॅशियम व्हिटॅमिन ए आणि सी यातून मिळते. 
  • कच्चे अंजीर आर्द्रता पिष्टमय प्रथिने, कार्बोहायड्राइट कॅल्शिअम, व्हिटॅमिन ए व सी मिळते.
ऋतूनुसार उपलब्ध असलेली फळे खायला पाहिजे. त्यातही आपण ज्या परिसरात राहता तेथे पिकणारे फळ आवर्जून खावे. यामुळे फळातून अँटिऑक्सिडंट्स मिळतात. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे विविध जीवनसत्त्वे मिळतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. फायबर इंटेक्ट वाढतो. ऋतूनुसार त्या काळात ते फळ खाल्ल्यानंतर शरीरास आवश्यक असलेले घटक मिळतात. 
जसे की हिवाळ्यात पेरू, आवळा ही फळात सी जीवनसत्त्व आहे. हिवाळ्यात ऊर्जाची आवश्यकता आहे. भूक वाढते त्यामुळे ही फळे खात्यास ती मदत होते. पावसाळ्यात उपलब्ध असलेली फळे खावीत, फक्त ताजी असावीत. त्या-त्या ऋतूमधील स्थानिक उपलब्ध असलेली फळे स्वस्त आणि चांगले असते.

हे ही वाचा


Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now