RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023 24
आरटीई 25 टक्के अंतर्गत 1 लाखाहून अधिक मुलांना मिळणार मोफत प्रवेश
दरवर्षी राज्यामध्ये खाजगी शाळातील 25% प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. सन 2023-24 च्या शैक्षणिक वर्षांमध्ये आरटीई अंतर्गत राज्यातील 8 हजार 820 शाळांमध्ये एकुण 1 लाख 1 हजार 881 बालकांना मोफत प्रवेश मिळणार आहे.
RTE प्रवेश प्रक्रियेसाठी का होत आहे विलंब?
RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिये मध्ये बालकांचे कागदपत्र म्हणून आधार कार्ड स्वीकारण्याच्या निर्णयावर शिक्षण विभागाकडून राज्य सरकारचे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे, हे मार्गदर्शन आल्यानंतर प्रवेश प्रक्रियेतील अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे कागदपत्र आता अनिवार्य केले आहे त्यानुसार आरटीई अंतर्गत 25% राखीव जागा वरील प्रवेश प्रक्रिया ही देखील सरकारी योजना आहे.
त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलांचे आधार कार्ड लागण्याची शक्यता आहे, मात्र काही शाळा प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यात अनेक मुलांकडे आधार कार्ड नसते. या पार्श्वभूमीवर मुलांकडे आधार कार्ड नसल्यास प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल का? किंवा आधार कार्ड काढल्यानंतर मिळणाऱ्या पावतीच्या आधारे प्रवेश देता येईल का? याबाबत राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे.
केव्हा सुरू होणार RTE प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन अर्ज?
यासंदर्भात लवकरच राज्य सरकारकडून आरटीई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया संदर्भातील सविस्तर मार्गदर्शन सूचना प्राप्त होणार आहे. त्यानुसार राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सुरू होणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक यांच्याकडून सांगितले जात आहे.
नवनविन अपडेट साठी समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.