RTE प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उरले शेवटचे 2 दिवस | RTE Admission Date 2023-24

RTE Admission Date 2023-24 : आरटीई 25% प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्याची 17 मार्च शेवटची तारीख आहे, पुढील शैक्षणिक वर्षात 25 टक्के प्रवेश योजनेअंतर्गत राज्यातील 1 लाख 1 हजार 969 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. राज्यातील खाजगी शाळांमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांसाठी 25 टक्के प्रवेश प्रक्रिया दरवर्षी ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. 

RTE addmission maharashtra date

दरवर्षी या प्रवेश प्रक्रियेला विलंब होतो. मात्र येणाऱ्या शैक्षणिक वर्षात बालकांना वेळेत प्रवेश मिळावा यासाठी यंदा जानेवारी 2023 मध्येच RTE प्रक्रियेला सुरुवात केली आहे. RTE प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील खाजगी शाळांची नोंदणी करण्यात आली, यामध्ये राज्यभरातून 8 हजार 828 शाळांनी RTE साठी नोंदणी केली आहे. यांतर्गत बालकांना मोफत प्रवेश मिळणार असून, RTE Act 2009 नुसार प्राथमिक शिक्षण पूर्णतः मोफत मिळणार आहे.

RTE प्रवेश ऑनलाईन अर्ज कधी पर्यंत भरता येणार? | RTE Admission Date 2023-24

RTE addmission date

RTE प्रवेश 2023-24 RTE प्रवेशा साठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात 1 मार्च दुपारी 3 पासून सुरुवात झालेली आहे. तर अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 17 मार्च आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी या शैक्षणिक वर्षात सुरू होणार आहे.

यासंदर्भात केंद्र सरकारने नवीन प्रवेशित बालकांचे वय 6 वर्ष पूर्ण असणे आवश्यक असल्याचे कळविले आहे, तसेच यासंदर्भात नेमके बालकांच्या प्रवेशाचे निकष कसे पाळायचे? तसेच सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असते, यासाठी नवीन प्रवेशित बालकांचे आधार कार्ड नसलेल्या बालकांसाठी कोणते कागदपत्र ग्राह्य धरावे? आणि कोरोनामुळे गमावलेल्या पालकांच्या संदर्भात बालकांच्या प्रवेशासाठी कोणते कागदपत्रे ग्राह्य धरावे? यासंदर्भात प्राथमिक संचनालय कार्यालयाकडून राज्य शासनाकडे याबाबत मार्गर्शन मागवले होते. 

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय

आर टी ई प्रवेशासाठी आता पर्यंत अडीच लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहे. ऑनलाईन अर्ज भरताना पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र अजूनही शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. ज्या बालकांचे अर्ज भरणे बाकी आहे, त्यांनी 17 मार्च रात्री 12 वाजे पर्यंत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुर्ण करून घ्यावी, व अर्ज केल्याची पावती जपून ठेवावी, लवकरच RTE प्रवेशासाठी लॉटरी पद्धतीने (निवड यादी) जाहीर होणार आहे. तेव्हा प्रत्येक अपडेट साठी 'samaveshit shikshan या वेसाइटला भेट देत रहा.

रटीई प्रवेश प्रक्रिया संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न येथे पहा 

आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज कोठे व कसा भरावा?

प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             



Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now