RTE प्रवेशासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा 2023 | RTE Admission age Limit

RTE Admission age Limit : आरटीई प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी शासनाने शाळा प्रवेश वयोमर्यादा निश्चित केली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार आता शालेय प्रवेशाच्या वयोमर्यादेत बदल करण्यात आला आहे. आर टी ई २५ % अंतर्गत प्ले ग्रुप/नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी आणि इयत्ता १ ली मध्ये प्रवेश घेण्यासाठी शासनाने गतवर्षी एक परिपत्रक जारी केले होते. त्या अनुषंगाने सन 2023-24 च्या प्रवेशासाठी त्या परिपत्रकाच्या आधारे शाळा प्रवेश वय असणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबद्दलचे परिपत्रक येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जारी होणार आहे. तत्पूर्वी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी २०२३ मध्ये आवश्यक असणारी किमान संभाव्य वयोमर्यादा  (RTE Admission age Limit ) कशा पद्धतीने असणार आहे? याबद्दलची माहिती या आर्टिकल मध्ये जाणून घेऊया.

{tocify} $title={हायलाइट्स}

RTE प्रवेशासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा 2023 -  RTE Admission age Limit

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे, परंतू कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा माहे ३१ डिसेंबर २०२३ अखेर पुढील प्रमाणे वय असणे आवश्यक आहे. 

RTE Admission age Limit in marathi
RTE Admission age Limit

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी शासनाने किमान म्हणजेच कमीत कमी वय निश्चित केली आहे. त्यामध्ये दिनांक ३१ डिसेंबर हा मानीव दिनांक निश्चित केला आहे.  

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी 2023 मध्ये आवश्यक असणारी किमान वयोमर्यादा पुढीलप्रमाणे

RTE addmission age criteria

  • प्ले ग्रुप आणि नर्सरी साठी बालकाचे किमान वय दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी ४ वर्ष असणे आवश्यक आहे.
  • ज्युनियर केजी साठी बालकाचे किमान वय दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी ५ वर्ष असणे आवश्यक आहे.
  • सिनियर केजी साठी बालकाचे किमान वय दिनांक ३१ डिसेंबर २०२२ रोजी ६ वर्ष असणे आवश्यक आहे.
  • इयत्ता १ ली साठी बालकाचे किमान वय दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी ७ वर्ष असणे आवश्यक आहे.{alertInfo}

RTE प्रवेशासाठी बालकाचा जन्म या तारखेदरम्यान  झालेला असावा?

  • प्ले ग्रुप आणि नर्सरी साठी बालकाचा जन्म दिनांक १ जुलै २०१९ ते दिनांक ३१ डिसेंबर  २०२० यादरम्यान झालेला असावा.
  • ज्युनियर केजी साठी  बालकाचा जन्म दिनांक १ जुलै २०१८ ते दिनांक ३१ डिसेंबर  २०१९ यादरम्यान झालेला असावा.
  • सिनियर केजी साठी  बालकाचा जन्म दिनांक १ जुलै २०१७ ते दिनांक ३१ डिसेंबर  २०१८ यादरम्यान झालेला असावा.
  • इयत्ता १ ली साठी  बालकाचा जन्म दिनांक १ जुलै २०१६ ते दिनांक ३१ डिसेंबर  २०१७ यादरम्यान झालेला असावा.

RTE प्रवेशासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा 2023 निश्चिती -  RTE Admission age Limit

प्रवेश वर्ग वयोमर्यादा दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजीचे कमाल वय
प्ले ग्रुप / नर्सरी १ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० ४ वर्ष ५ महिने ३० दिवस
ज्युनियर केजी १ जुलै २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ ५ वर्ष ५ महिने ३० दिवस
सिनियर केजी १ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ ६ वर्ष ५ महिने ३० दिवस
इयत्ता १ ली १ जुलै २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ ७ वर्ष ५ महिने ३० दिवस

RTE योजनेंतर्गत प्ले ग्रुप/नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनियर केजी साठी प्रवेश अर्ज भरता येतो का?

RTE योजनेंतर्गत प्ले ग्रुप/नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनियर केजी चे वर्ग असणारी शाळा जर आपल्या घरापासून १ किमी अंतरावर असेल, आणि त्या शाळेने RTE योजनेसाठी नोंदणी केलेली असेल तर ऑनलाईन अर्ज भरता येतो.

RTE प्रवेशासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा संदर्भ - २८ फेब्रुवारी २०२२ चे परिपत्रक महाराष्ट्र शासन 

नविन परिपत्रक जारी होताच अपडेट माहिती समावेशित शिक्षण या वेबसाईटवर देण्यात येईल.

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                             

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now