शिक्षण हक्क कायदा (RTE Act 2009) नुसार राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणाऱ्या RTE 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. यंदाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. व 1 मार्च ते 17 मार्च या कालावधीमध्ये पालकांना RTE २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठी RTE 25 टक्के अंतर्गत प्रवेश निवड होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागतात RTE योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी? त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखात दिलेली आहे.
आर.टी.ई.२५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२३-२०२४
- सन २०२३-२०२४ या वर्षाकरिता आर.टी.ई. २५% ऑनलाईन प्रवेश अर्ज 1 मार्च ते 17 मार्च या कालावधीत अर्ज भरता येणार आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी घाई करू नये, संपूर्ण माहिती व्यवस्थित व काळजीपूर्वक आणि अचूक भरावी जेणेकरून शेवटी कागदपत्राची पडताळणी होईल त्यामध्ये काही त्रुटी येणार नाही याची काळजी घ्या
- एका बालकाकरिता एकच अर्ज भरण्यात यावा
- एकाच बालकाचे २ किंवा त्याहून अधिक अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील
- प्रवेश अर्ज भरताना चुकल्यास, तो रद्द [Delete Application) करून पुन्हा भरावा.
- कोणत्याही परिस्थितीत Duplicate अर्ज भरू नयेत.
- प्रवेश अर्जात घराचा पत्ता लिहिताना रहिवासी पुरावा म्हणून कोणते कागदपत्र देणार आहे त्या वरील पत्ता अचूक भरावा.
- पालकांनी प्रवेश अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट काढून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत जपून ठेवावी.
- उत्पन्नाचा दाखला आणि जातीचे प्रमाणपत्र परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
- यापूर्वी आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रवेश अर्ज भरू नये.
- पालकांनी अर्ज भरण्यापूर्वी होम पेज वरील आवश्यक कागदपत्रे आणि FAQ यावर क्लिक करून त्या मधील सर्व सूचना वाचणे आवश्यक आहे.
RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे - ऑनलाईन अर्ज ते लॉटरी पद्धतीने निवड संपूर्ण माहिती
RTE 25 टक्के आवश्यक कागदपत्रे आणि FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
RTE 25 टक्के आवश्यक कागदपत्रे आणि FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
हे सुद्धा वाचा
RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 संपूर्ण माहिती (RTE Admission Maharashtra) येथे वाचा
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे व वयोमर्यादा 2023-24 (RTE Admission Documents List) येथे वाचा
RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 संपूर्ण माहिती (RTE Admission Maharashtra) येथे वाचा
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे व वयोमर्यादा 2023-24 (RTE Admission Documents List) येथे वाचा
नवनविन अपडेट साठी समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.