RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023
शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीई अंतर्गत आर्थिक दुर्बल घटक व वंचित घटकातील बालकांसाठी दरवर्षी RTE 25% प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.
आरटीई प्रवेश प्रक्रिया शाळांच्या नोंदणीसाठी आता 10 फेब्रुवारी पर्यंत मुदवाढ
आर टी ई प्रवेश कोट्यातून खाजगी शाळांमध्ये 25% प्रवेश मोफत घेण्यासाठी राज्य शासनातर्फे ही प्रक्रिया राबवली जाते. यावर्षी आर टी ई ची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली असून, पहिल्या टप्प्यांमध्ये शाळांच्या नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत शाळांच्या नोंदणीसाठी कालावधी निश्चित केला होता, मात्र अद्याप पर्यंत राज्यातील एक हजारापेक्षा अधिक शाळांची नोंदणी बाकी असल्याने या शाळांची नोंदणी करण्यासाठी आता दिनांक 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदवाढ देऊन शाळांची नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित जिल्ह्यांना दिले आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत आतापर्यंत 8 हजार 46 शाळांची नोंदणी पूर्ण
शिक्षण हक्क कायद्यानुसार आर टी ई प्रवेश प्रक्रिया 2023 यंदा लवकर सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये आर टी ई शाळांची नोंदणी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, आत्तापर्यंत 8 हजार 46 शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. तर अजून पर्यंत 1 हजार 209 शाळांची नोंदणी करणे बाकी आहे व या शाळांची नोंदणी 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे संबंधित जिल्ह्यांना कळविले आहे.
आरटीई अंतर्गत 93921 मुलांना मिळणार मोफत प्रवेश
महाराष्ट्र राज्यातील आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी आज पर्यंत 8 हजार 46 शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, 93 हजार 921 मुलांना खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. तर अजून 1हजार 209 शाळांची नोंदणी बाकी आहे व ती 10 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होऊन आर टी 25% प्रवेशाची संख्या मध्ये वाढ होईल. राज्यातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या शाळा नोंदणीचे काम 100 टक्के पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. तर पुणे जिल्ह्याचे काम 76.48% एवढे झाले आहे.
RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 संपूर्ण माहिती (RTE Admission Maharashtra) येथे वाचा
हे सुद्धा वाचा
नवनविन अपडेट साठी समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.