राजीव गांधी अपघात विमा योजना (Rajiv Gandhi Accident Insurance Scheme) ही राज्यातील इयत्ता पहिली ते दहावी बारावी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या संदर्भात काही अपघाती घटना घडल्यास त्यावेळी राज्य सरकार मार्फत राजीव गांधी अपघात विमा योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत अपघाताच्या वेळी हॉस्पिटलमध्ये लागणारा खर्च तसेच आकस्मित घटना घडून मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद राजीव गांधी अपघात विमा योजना मध्ये आहे. या योजनेची संपूर्ण माहिती आजच्या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.
राजीव गांधी अपघात विमा योजना संपूर्ण माहिती | Rajiv Gandhi Accident Insurance Scheme In Marathi
राजीव गांधी अपघात विमा योजना |
राजीव गांधी अपघात विमा योजना पार्श्वभूमी
राजीव गांधी अपघात विमा योजना ही सन 2003 पासून राबविण्यात येत आहे. ही योजना इयत्ता पहिली ते बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सानुग्रह अनुदान स्वरुपात रक्कम देण्यात येते.
सुरुवातीला ही योजना विमा कंपन्या मार्फत राबवण्यात येत होती, मात्र विमा कंपन्या विविध कारणे सांगून विद्यार्थ्यांना भरपाई देण्याबद्दल टाळाटाळ करीत होत्या बऱ्याच वेळा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कंपन्याकडून उशीर देखील होत होता. विद्यार्थ्यांचा अपघाताचे गावे लवकर निकाली लागत नसल्यामुळे विमा कंपन्या मार्फत ही योजना बंद करून त्याऐवजी आता शासनामार्फत सामग्रह अनुदान योजना म्हणून राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
मधल्या कालावधीत ही योजना प्रायोगिक तत्त्वावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत राबविण्यात आली. या योजनेची प्रभावीरित्या अंमलबजावणी झाली असून, मोठ्या प्रमाणावर विदयार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दिलासा मिळालेला आहे. या योजनेची फलश्रुती लक्षात घेता राजीव गांधी सुधारित अपघात विमा योजना राज्यामध्ये सध्या राबविण्यात येत आहे. राजीव गांधी अपघात विमा योजनेंतर्गत एकुण सहा प्रकारचे सानुग्रह अनुदान देण्यात येते.
राजीव गांधी अपघात विमा योजना कोणासाठी आहे?
राजीव गांधी अपघात विमा योजना सानुग्रह अनुदान किती मिळते?
- विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू - रु.१,५०,०००/-
- अपघातामुळे कायमचे अपंगत्व - रू.१,००,०००/- (२ अवयव / दोन डोळे किंवा १ अवयव व १ डोळा निकामी)
- अपघातामुळे कायमचे अपंगत्व रू.७५,०००/- (१ अवयव किंवा १ डोळा कायम निकामी)
- विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त - रू.१,००,०००/-
- विद्यार्थी आजारी पडून, सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास - रू.१,५०,०००/-
- विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास (क्रीडा स्पर्धेत खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेचा धक्का, वीज अंगावर पडून ) प्रत्यक्ष हॉस्पिटलचा किंवा जास्तीत जास्त - रु १०००००
राजीव गांधी अपघात विमा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ?
राजीव गांधी अपघात विमा योजनेंतर्गत एकुण सहा प्रकारचे सानुग्रह अनुदान देण्यात येते. राजीव गांधी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी घडलेल्या घटनेच्या संबंधी आवश्यक कागदपत्रे एकुण तीन प्रती मध्ये पंचायत समिती कार्यालय येथे सादर करावी लागतात.
विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू अनुदान व कागदपत्रे
विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सानुग्रह अनुदान स्वरुपात रक्कम देण्यात येते. विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाना - रु.१,५०,०००/- रुपयाचा आर्थिक लाभ या योजनेंतर्गत देण्यात येतो. यासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे
- आधार कार्ड
- शाळेचे प्रमाणपत्र
- प्रथम खबरी अहवाल
- स्थळ पंचनामा
- इन्क्वेस्ट पंचनामा
- सिव्हील सर्जन यांनी प्रति स्वाक्षरीत केलेले मयत विद्यार्थ्यांच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल, किंवा मृत्यू दाखला (सिव्हील सर्जन यांनी प्रति स्वाक्षरीत केलेले)
अपघातामुळे कायमचे अपंगत्व अनुदान व कागदपत्रे
- आधार कार्ड
- शाळेचे प्रमाणपत्र
- अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र सिव्हील सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह ( कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र)
अपघातामुळे कायमचे अपंगत्व अनुदान व कागदपत्रे
- आधार कार्ड
- शाळेचे प्रमाणपत्र
- अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र सिव्हील सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह ( कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र)
अपघातामुळे शस्त्रक्रिया प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च व कागदपत्रे
- आधार कार्ड
- शाळेचे प्रमाणपत्र
- शस्त्रक्रियेबाबतचे हॉस्पिटलचे प्रमाणपत्र सिव्हील सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह
विद्यार्थी आजारी पडून, सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू अनुदान व कागदपत्रे
- आधार कार्ड
- शाळेचे प्रमाणपत्र
- मृत्यू दाखला
- सिव्हील सर्जन यांनी प्रति स्वाक्षरीत केलेले मयत विद्यार्थ्याच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल.
विद्यार्थी अपघातामुळे जखमी झाल्यास अनुदान व कागदपत्रे
- आधार कार्ड
- शाळेचे प्रमाणपत्र
- हॉस्पिटलचे उपचारा बाबतचे प्रमाणपत्र सिव्हील सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह
राजीव गांधी अपघात विमा फॉर्म PDF
राजीव गांधी अपघात विमा शासन निर्णय
महत्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट साठी Whatsapp Group ला जॉईन व्हा.