महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करण्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरीता आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रुणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात २०१४ पासून 'सुकन्या योजना' सुरु करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' या मुलींसाठी असणाऱ्या केंद्र शासनाच्या सरकारी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुकन्या योजना ही 'माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना' या योजनेत विलीन करून १ ऑगस्ट २०१७ पासून ही योजना सुरु आहे. या बद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये दिली आहे.
{tocify} $title={Table of Contents}
माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना संपूर्ण माहिती | Majhi Kanya Bhagyashree Yojana in Marathi
योजनेचे नाव | मिळणारे लाभ | प्रमुख अटी |
---|---|---|
'माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना' | 1.) एक मुलगी असल्यास - 18 वर्षे कालावधीसाठी रु. 50,000 2.) दोन मुली असल्यास - प्रत्येक मुलीचे नावे 25 हजार रुपये एकुण रु. 50,000 | 1.) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक. 2.) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 7.50 लाख. 3.) कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. |
माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा मुख्य उद्देश
- मुलींचा जन्मदर वाढविणे.
- लिंग निवडीस प्रतिबंध करणे.
- मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे.
- मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे.
- बालविवाहास प्रतिबंध करणे.
मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे आणि मुलांच्या इतका मुलींचा जन्मदर वाढविणे हा माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा मुख्य उद्देश आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अटी व शर्ती - कागदपत्रे
'माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना' बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत राबविण्यात येते. त्यासंबंधी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे.
- आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वी सादर करणे आवश्यक राहील.
- पहिले अपत्य मुलगा असल्यास व दुसरे अपत्य मुलगी झाल्यास किंवा पहिले अपत्य मुलगी असल्यास व दुसरे अपत्य मुलगा झाल्यास योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही.
- कुटुंबात पहिले अपत्य मुलगी आहे व दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास तीला हा लाभ देय असेल. मात्र तिसरे अपत्य जन्मल्यास त्यास हा लाभ अनुदेय नसेल.
- माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा लाभ १ ऑगस्ट २०१७ रोजी जन्मलेल्या व त्यांनतरच्या मुलींना अनुज्ञेय आहे.
- माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना १ ऑगस्ट २०१७ पासून सुरु आहे.
- ज्या कुटुंबाना दिनांक १ ऑगस्ट २०१७ पुर्वी १ मुलगी आहे व दिनांक १ ऑगस्ट २०१७ नंतर दुस-या मुलीचा जन्म झाल्यास व माता / पित्याने कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर फक्त दुस-या मुलीला रुपये २५,०००/- इतका योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
- मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतांना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- मुदत ठेवीत गुंतवण्यात आलेली मुळ मुद्दल रक्कम व त्यावरील १८ व्या वर्षी देय असणारे व्याज अनुज्ञेय होण्यासाठी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे व इयत्ता १० वी परिक्षा उत्तीर्ण असणे तसेच मुलगी अविवाहित असणे आवश्यक राहील.
- दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या, तर त्या मुली योजनेस पात्र असतील.
- बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना अनुज्ञेय राहील. (दत्तक पालकांनी मुलांचे अकाऊंट उघडुन हा लाभ त्या अकाऊंटला देण्यात येईल.) मात्र दत्तक पालकांवर योजनेच्या सर्व अटी / शर्ती लागू रहातील. सदर योजना आधार सोबत जोडण्यात येईल.
- विहित मुदतीपूर्वी (वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी) मुलीचा विवाह झाल्यास, किंवा दहावी पूर्वी शाळेतून गळती झाल्यास किंवा दहावी नापास झाल्यास या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नसून, मुलीच्या नांवे बँक खात्यात जमा असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाचे नांवे असणाऱ्या खात्यात जमा करण्यात येईल. मात्र नैसर्गिक कारणाने मुलीचा मुत्यु झाल्यास मुलीच्या नावे गुंतविण्यात आलेली रक्कम मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर पुर्ण रक्कम मुलीच्या पालकांना देय होईल.
- वार्षिक उत्पन्न रुपये ७.५० लाख पर्यंत असल्याचे स्थानिक तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला सादर केल्यानंतरच योजनेचा लाभ घेता येईल.
- मुद्द्लावर मिळणा-या व्याजाचा दर हा त्या त्यावेळी बँकेमार्फत लागु असलेल्या दरानुसार अनुज्ञेय राहील.
- एका मुलीच्या जन्मानंतर माता / पित्याने १ वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबधित बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण/नागरी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. (त्यांनतर सादर केलेल्या अर्जाचा विचार करता येणार नाही.)
- तसेच दोन मुलीनंतर ६ महिन्याच्या आत कुटुंबनियोजन केल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणा-या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ अनुज्ञेय असेल.
महत्वाचे - दिनांक १ जानेवारी २०१४ ते दिनांक ३१ मार्च २०१६ या कालावधीत सुकन्या योजना कार्यन्वीत होती. तसेच दिनांक १ एप्रिल २०१६ ते दिनांक ३१ जुलै २०१७ या कालावधीत जुनी माझी कन्या भाग्यश्री ही योजना कार्यन्वीत होती. सदर कालावधीत संबधित लाभार्थ्यांने अर्ज केला असेल व आजच्या निकषानुसार पात्र ठरत असेल तर त्यास या योजनेचा लाभ देय राहील. मात्र दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये नमुद असलेले लाभ मिळतील.{alertInfo}
विमा पॉलिसी म्हणजे काय? महत्व आणि विमा प्रकार
माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा लाभ - अर्ज कसा व कोठे करावा?
माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा फॉर्म हा पुढे दिलेला आहे. किंवा आपण आपल्या परिसरातील अंगणवाडी सेविका यांच्याकडून घेऊन सदरचा अर्ज भरून सादर करू शकता.
- माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण व नागरिक क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजेच ग्रामपंचायत किंवा नगरपालिका, महानगरपालिका मध्ये मुलीच्या जन्माची नोंद केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकाकडे अर्ज करावयाचा आहे. (माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा फॉर्म पुढे दिला आहे.)
- माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा संपूर्ण अर्ज भरल्यानंतर वर सांगितलेल्या अटी व शर्तीनुसार संबंधित कागदपत्रे अर्जासोबत जोडावयाचे आहे.
- संबंधित कागदपत्रे जोडून अर्ज हा अंगणवाडीत पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांच्याकडे सादर करावयाचा आहे.
माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा अर्ज
प्रधानमंत्री जनधन योजना खाते - अधिक लाभ
माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये मुलगी व तिची आई यांचे संयुक्त बचत खाते हे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात येतील, त्यामुळे रुपये 100000 अपघात विमा आणि रुपये 5000 ओव्हरड्राफ्ट व इतर अनुदेय लाभ संबंधित लाभार्थ्यास मिळतील.
महत्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण Whatsapp Group ला जॉईन व्हा.