मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये सन २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीमध्ये राबवण्यात आला होता. मध्यंतरी 'मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम' हा बंद करण्यात आला होता. परंतु 'मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम' पुन्हा सुरू करण्याबाबत होत असलेली आग्रही मागणी लक्षात घेता सदर कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याची तसेच फेलोना भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल या दृष्टीने सदर कार्यक्रमास शैक्षणिक कार्यक्रमाची जोड देण्यासाठी देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांना सहभागी करून घेण्याबाबत नियोजन विभाग महाराष्ट्र राज्य चा शासन निर्णय २० जानेवारी २०२३ नुसार 'मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम' पुन्हा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत निवड होणाऱ्या फेलोना दरमहा ७५००० रुपये विद्यावेतन (मानधन) देण्यात येणार असून, फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असणार आहे.
{tocify} $title={ठळक मुद्दे}
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2023 | राज्य शासनासोबत काम करा व दरमहा मिळवा ७५ हजार सोबत गट अ चा दर्जा
'मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम' |
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबविण्याचा मुख्य उद्देश
राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता यावेत व ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज त्यातील घटकांचा ताळमेळ निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांना यावा, त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक ध्येयवादी सुजाण नागरिक तयार व्हावेत, याकरिता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबविण्यात आला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळाला व त्यासोबत त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत झाली. युवकांमधील कल्पकता, वेगळा विचार मांडण्याची क्षमता याचा उपयोग प्रशासनास झाला आणि तरुणांमधील तंत्रज्ञानाची आवड या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियेला गती मिळाली.
महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम काय आहे?
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम युवकांना शासनाचा भाग बनून काम करण्याची संधी देतो. फेलोंच्या नाविन्यपूर्ण कल्पनांची प्रशासनास मदत होते. फेलोंचा उत्साह व तंत्रज्ञानाची समज यामुळे प्रशासकीय प्रक्रियांना गती मिळते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणारे ज्ञान व अनुभव यामुळे तरुण फेलोंचा दृष्टिकोन विस्तारतो.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत निवड होणाऱ्या फेलोना विद्यावेतन दरमहा मानधन किती असेल?
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोना दरमहा मानधन रुपये ७० हजार व प्रवास खर्च रुपये ५००० असे एकत्रित ७५००० रुपये विद्यावेतन स्वरूपात देण्यात येइल.
'मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम' - आवश्यक पात्रता
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, २०२३ करिता अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे
- उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ ते कमाल २६ वर्ष या दरम्यान असावे. म्हणजे त्यांची जन्मतारीख ०३/०३/१९९७ ते ०३/०३/२००२ दरम्यान येते. अशी व्यक्ती (दोन्ही दिवस अंतर्भूत)
- उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण) असावा. तथापि, उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल.
- उमेदवाराकडे किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप / आर्टीकलशिप अनुभवाच्या कार्यकाळात गणली जाईल. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल.
- मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.
निवड होणाऱ्या फेलोना मिळणारे लाभ
- फेलोंना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याच्या समकक्ष दर्जा राहील.
- फेलोशिपच्या कार्यकाळात कार्यालयीन वापराकरिता तात्पुरते ओळखपत्र व इमेल आयडी दिले जाईल.
- दरमहा रु. ७०,०००/- विद्यावेतन तसेच प्रवास व अनुषंगिक खर्चासाठी दरमहा ठोक रु. ५,०००/- असे एकूण रु. ७५,०००/- छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.
- फेलोशिपच्या कार्यकाळात एकूण ८ दिवसांची रजा अनुज्ञेय राहील.
- फेलोशिपच्या कार्यकाळासाठी अपघात विम्याचे संरक्षण देण्यात येईल.
- आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाच्या पूर्ततेचे स्वतंत्र प्रमाणपत्र संबंधित संस्थेमार्फत देण्यात येईल.
- १२ महिन्यांचे फिल्डवर्क व आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांच्या मार्फत राबविला जाणारा विशेष अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या फेलोंना शासनामार्फत फेलोशिप पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.