आनंदी व निरोगी दीर्घ आयुष्यसाठी दररोज 10 मिनिटं तरी चालायलाच हवं

सध्याच्या या डिजिटल युगात शारीरिक हालचाली कमी झालेल्या आहेत. मोबाईल, लॅपटॉप, टिव्ही स्क्रीन समोर आपण तासनतास एका जागेवर बसून राहतो. त्यामुळे शारीरिक हालचाली होत नाही. त्याचा परिणाम एकदम आपल्याला जाणवत नाही तर थोड्याच दिवसात त्रास जाणवायला लागतो. सदृढ व निरोगी शरीर ठेवण्यासाठी आपल्या शरीराची हालचाल होणे आवश्यक आहे. अन्यथा आपण आपले आयुष्य कमी करत आहोत. आणि त्याला जबाबदार देखील स्वतःच राहणार आहोत. 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हा महान विचार आपल्याला खूप काही सांगून जातो. गंजण्यापेक्षा झिजणं कधीही चांगलं. शरीराचे देखील तसेच आहे. शरीराला जशी आहाराची आवश्यकता असते. तशी व्यायामाची देखील आवश्यकता असते. तेव्हा निरोगी दिर्घआयुष्यासाठी आपल्याला दररोज किमान 10 मिनिटे तरी चालायलाच हवं.  व्यायामाचा विषय निघाल्यानंतर अनेकजण वेळच मिळत नाही. हे कारण सांगून मोकळे होतात. उत्तम आरोग्यासाठी चालणं हा एक चांगला व्यायाम असल्याचं संशोधनाने सिद्ध केले आहे. दररोज जलदगतीने किमान 10 मिनिटे चालण्याच्या व्यायामाचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात त्याबद्दल.

आनंदी व निरोगी दीर्घ आयुष्यसाठी दररोज 10 मिनिटं तरी चालायलाच हवं

amazing-health-benefit-everyday-walking

दररोज 10 मिनिटं जलदगतीने चालण्याचे फायदे

उत्तम आरोग्यासाठी चालणं हा एक चांगला व्यायाम असल्याचं संशोधनाने सिद्ध केले आहे. दररोज जलदगतीने किमान 10 मिनिटे चालण्याच्या व्यायामाचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात त्याबद्दल.

निरोगी हृदय

दररोजच्या जलद गतीने दहा मिनिटं चालल्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य हे चांगले राहते. या पायी चालण्याच्या व्यायामामुळे रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणामध्ये राहण्यास मदत मिळते, तर कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील यामुळे कमी होतं. रक्त प्रवाह चांगल्या प्रकारे होतो ज्यामुळे ट्राइग्लिसराईड्सची लेवल कमी होऊन हृदयावर पडणारा अनावश्यक ताण देखील कमी होतो. म्हणून दररोज किमान दहा मिनिटे तरी जलद गतीने चालणे आवश्यक आहे. 

फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते

जोरात चालल्यामुळे आपल्या शरीराला अधिक ऑक्सिजनची आवश्यकता भासते. आणि हा ऑक्सिजन मिळवण्यासाठी आपल्या फुफ्फुसांना अधिक मेहनत करावी लागते. आपण आपल्या मास पेशींचा जितका अधिक उपयोग करू तितक्या त्या अधिक मजबूत होत जातात. त्यामुळे नियमित चालल्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता ही सुधारते.

संधिवताचे दुखणे कमी

शारीरिक हालचाली कमी झाल्या की शरीरामध्ये विविध प्रकारच्या आजारांचा शिरकाव होतो. त्यामध्ये स्नायू, लिंगामेट, टेंडर यांचा वापर केला नाही तर ते आखडतात आणि त्याचा जेवढा वापर कमी तितके त्यांचे आखडणे मोठ्या प्रमाणात होते. या आखडण्यामुळे पाठीच्या खालच्या भागात आणि जॉईंटच्या ठिकाणी दुखण्याचे प्रमाण वाढतं मात्र पायी चालण्याच्या सवयीमुळे शरीर लवचिक राहतं.
पचनक्रिया चांगली राहते

आहार पचवण्यासाठी आपली पचनक्रिया व्यवस्थित असणे आवश्यक असते. यासाठी आपली पचनसंस्था कार्य करत असते. या पचन संस्थेचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी चालण्याच्या व्यायामाने पचनसंस्थेचे कार्य चांगले राहते. चालण्यामुळे आपल्या आतड्यांची हालचाल होते. शिवाय चालताना पोटाच्या मास पेशींचा देखील वापर होतो. परिणामी आपल्याला बुद्धकोष्ठतेच्या समस्या निर्माण होत नाहीत.

झोपेचे चक्र सुधारते

चालण्याच्या व्यायामामुळे डोकं शांत राहण्यास व शरिरात ऊर्जा संचय होण्यास मदत होते. जलदगतीने चालल्यामुळे शरीर दिवसभर सक्रिय राहतं. या नियमितपणाच्या व्यायामामुळे रात्री झोप चांगली लागते. कारण शारीरिक हालचालीमुळे झोपेसाठी कारणीभूत ठरणारं मेलाटोनिन नावाचे हार्मोन नैसर्गिक रित्या शरीरात स्रवते.

एकाग्रता वाढते

जलद गतीने चालण्याच्या व्यायामामुळे एकाग्रतेत सुधारणा होते. ब्रेन डिराइव्ह न्यूरोट्रॅफिक फॅक्टरच्या पातळीत वाढ होते. शिवाय दहा मिनिटे चालण्याचे व्यायामामुळे मूडमध्ये देखील सुधारणा होते.

एंडोर्फिनची पातळी वाढते

चालण्यामुळे शरीरातील फील गुड रसायन अर्थात एंडोर्फिन स्रवते. या रसायनाची निर्मिती आपल्या शरीरात जेव्हा नैसर्गिकरित्या होणे बंद होते, तेव्हा ते अनेक आजारांचे, तणावाचे कारण बनते. दररोज दहा मिनिटे चालण्यामुळे एंडोर्फिनची पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळे माणूस ऊर्जावान, सकारात्मक आणि आनंदी राहतो.

निरोगी व दिर्घआयुष्यासाठी 

'यूज इट और लूज इट' अशा अर्थाची एक म्हण आहे. वापर करा अथवा गमवा असा याचा अर्थ आहे. थोडक्यात काय, तर शरीराच्या एखाद्या अवयवाचा व्यवस्थित वापर केला नाही तर तो अवयव निकामी होत जातो. अगदी त्याचप्रमाणे नियमित चालण्यामुळे पायांचे स्नायू बळकट होतात. चालण्याच्या गतीमध्ये संतुलन साधलेले राहते. त्यामुळे पाच मिनिटांपासून सुरूवात करून प्रत्येक आठवडयात किमान ७५ मिनिटे चालण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवा.

आणखी वाचा
नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                          

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now