शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023 - मतदार यादीत नाव येथे पहा | Padvidhar Matdar Yadi

Graduates’ and Teachers’ Constituencies Election 2023 : महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेतील ५ जागांसाठी शिक्षक-पदवीधर विधान परिषदेची निवडणूक 30 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण सदस्य संख्या ही 78 आहे. विधान परिषदेतील एकूण 5 जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये 2 पदवीधर आणि 3 शिक्षक मतदारसंघातील जागा रिक्त होणार आहे, त्यामध्ये पदवीधर मतदारसंघ नाशिक व अमरावती तर शिक्षक मतदारसंघ औरंगाबाद, कोकण आणि नागपूर या मतदारसंघांमध्ये पदवीधर व शिक्षक विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक सदस्य संख्या व कार्यकाल विषयी माहिती आणि 2023 मधील निवडणुकीसाठी पदवीधर व शिक्षक मतदार संघातील नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण मतदार संघातील मतदार यादी PDF या आर्टिकल मध्ये मिळणार आहे.  

📌शिक्षक पदवीधर निवडणुकीत मतदान कसे करावे? - असे करा योग्य पद्धतीने मतदान 

{tocify} $title={ठळक मुद्दे}

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023 - मतदार यादीत नाव येथे पहा | Padvidhar Matdar Yadi

Padvidhar Matdar Yadi


महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या निवड प्रक्रिया व कार्यकाळ

विधानपरिषदेची निवडणूक ही एका वेगळ्या पद्धतीने होत असते. महाराष्ट्रातील विधानपरिषदेचे एकूण 78 सदस्य संख्या पैकी ३१ सदस्य हे विधानसभेतील आमदार निवडून देतात. तर 21 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून येतात आणि 12 सदस्यांची निवड हे राज्यपाल करतात, तर 7 सदस्य शिक्षक मतदारसंघातून आणि 7 सदस्य पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात. 

विधान परिषदेच्या सदस्यांचा म्हणजेच आमदाराचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. दर 2 वर्षांनी एक तृतीयांश सदस्य हे निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नव्या आमदारांसाठी निवडणूक होत असते.{alertInfo}

शिक्षक मतदार संघासाठी मतदानाचा अधिकार कोणाला असतो?

शिक्षक मतदार संघासाठी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत माध्यमिक शाळेतील शिक्षक,  केंद्रीय शाळा, डिग्री कॉलेज, मेडिकल कॉलेज, पॉलीटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेजचे शिक्षक मतदान करू शकतात. आणि त्यांना कमीत कमी 3 वर्षे शिकवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच निवृत्त झालेले शिक्षकही निवृत्तीनंतर तीन वर्षापर्यंत मदत करू शकतात.

📌शिक्षक पदवीधर निवडणुकीत मतदान कसे करावे? - असे करा योग्य पद्धतीने मतदान 

पदवीधर मतदार संघात मतदान करण्याचा अधिकार कोणाला असतो?

पदवीधर मतदार संघामध्ये पदवी प्राप्त करून तीन वर्ष झालेले पदवीधर मतदान करू शकतात.

या वर्षी कोणत्या पदवीधर मतदार संघात निवडणूक होत आहे?

नाशिक व अमरावती या मतदारसंघात पदवीधर निवडणूक होत आहे.

या वर्षी कोणत्या शिक्षक मतदार संघात निवडणूक होत आहे?

औरंगाबाद, नागपूर व कोकण शिक्षक मतदारसंघात यावर्षी निवडणूक होत आहे.

नाशिक पदवीधर मतदार यादी | Nashik Padvidhar Matdar Yadi

नाशिक पदवीधर मतदारसंघातील मतदार यादी येथे पहा 

अमरावती पदवीधर मतदार यादी | Amravati Padvidhar Matdar Yadi

अमरावती पदवीधर मतदारसंघातील मतदार यादी येथे पहा 

औरंगाबाद शिक्षक मतदार यादी | Aurangabad Shikshak Matdar Yadi

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातील मतदार यादी येथे पहा 

नागपूर शिक्षक मतदार यादी | Nagpur Shikshak Matdar Yadi

नागपूर शिक्षक मतदारसंघातील मतदार यादी येथे पहा 

कोकण शिक्षक मतदार यादी | Kokan Shikshak Matdar Yadi

कोकण शिक्षक मतदारसंघातील मतदार यादी येथे पहा 


आणखी वाचा

📌शिक्षक पदवीधर निवडणुकीत मतदान कसे करावे? - असे करा योग्य पद्धतीने मतदान 



📌 RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 नियमातील बदल येथे वाचा 

📌 RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24

📌 नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० येथे वाचा 


नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now