नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील पूर्वप्राथमिक तसेच इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गासाठी NCERT यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचा अभ्यासक्रम हा SCERT ठरवणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये १० वी व १२ वी बोर्डाच्या परीक्षेचे महत्त्व कमी करण्यात आले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रम कसा असेल? (New Education Policy Syllabus) मूल्यांकन कशा पद्धतीने करण्यात येणार आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये घेणार आहोत.
{tocify} $title={ठळक मुद्दे}
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असा असेल अभ्यासक्रम - बोर्डाच्या परीक्षांचं महत्त्व होणार कमी
SCERT ठरवणार अभ्यासक्रम
शिक्षण व्यवस्थेत पहिल्यांदाच पूर्व प्राथमिक शाळेसाठी अभ्यासक्रम ठरवला जाणार आहे. देशातील सर्व पूर्व प्राथमिक तसेच इयत्ता १ ली ते १२ वी इयत्तेसाठी NCERT यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा अभ्यासक्रम SCERT हा आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - अभ्यासक्रम
अभ्यासक्रमातील ओझे कमी करून खेळ, कृती व शोध आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संबोध, आकलन, उपयोजनावर भर, गणिती दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशील विचार, चिंतनशिल विचार, सहसंबंधात्मक अध्ययन, संवाद कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. केवळ पाठांतर करून परीक्षेत मिळणाऱ्या गुणांचे अवास्तव महत्त्व कमी करून कौशल्य व क्षमता विकसनावर भर देण्यात येणार आहे. अध्ययन निष्पत्तीच्या आधारे मुलांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. केवळ गुण न नोंदविता क्षमता / कौशल्य विकसनाची स्थिती प्रगती पुस्तकात नोंदवून सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेला चालना दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमाची निर्मिती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वतंत्र्य दिले जाणार आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2023 - (5+3+3+4) संरचना आणि वयोगट येथे वाचा
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - मुल्यांकन
मुल्यांकन हे बहुआयामी असणार आहे. विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनामधील गुणांचे महत्त्व कमी करून बहुआयामी मुल्यांकनाची संकल्पनेचा स्विकार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये केला आहे. ज्यात स्वयमुल्यांकन, सहाध्यायी मुल्यांकन, शिक्षण मुल्यांकनासोबतच विद्यार्थ्यांचे भावात्मक सामाजिक, बोधात्मक, क्रियात्मक प्रगतीच्या आधारे सातत्यपूर्ण मुल्यांकन करण्यात येणार आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - शिक्षक प्रशिक्षण
विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांच्या प्रगती व विकासाच्या अनुषंगाने त्यांना सक्षम बनविण्यासाठी नियतकालिक प्रशिक्षणाचे आयोजन करून गुणवत्ताधारित पदोन्नतीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे. बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमाचा समावेश केल्यामुळे त्यानुसार शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे. TET चाचणी चे बळकटीकरण करण्यात येणार आहे. याद्वारे शिक्षकांची निवड केली जाणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - पहिल्या 5 वर्षातील अभ्यासक्रम
शिक्षणाची पहिल्या ५ वर्षातील अंगणवाडी ३ वर्ष व इयत्ता १ ली व २ री चा समावेश असून या स्तरावरील अभ्यासक्रमामध्ये खेळ, शोध, कृती आधारीत शिक्षण देण्यात येणार आहे.
विद्यार्थी इयत्ता ३ रीत प्रवेशित होईपर्यंत त्यास समजपूर्वक वाचन व लेखन करण्यास सक्षम बनविण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रमाची रचना करण्यात येणार आहे. या प्रकारे अभ्यासक्रमामध्ये निर्मितीसाठी स्थानिक खेळणी, स्थानिक भाषांचा समावेश असून आनंददायी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पायाभूत साक्षरता अभ्यासक्रम (Happiness Curriculum) तयार करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - प्रारंभिक शाळा 3 वर्षातील अभ्यासक्रम
पुढील ३ वर्षामध्ये इयत्ता ३ री ते ५ वी या वर्गामध्ये कृती व खेळ आधारित परस्पर संवादी अभ्यासक्रम विकसित करून विद्यार्थ्यांचे बौध्दिक विकास साध्य करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - माध्यमिक शाळा 3 वर्ष अभ्यासक्रम
पुढील ३ वर्षामध्ये इयत्ता ६ वी ते ८ वी करिता कृती आधारित प्रायोगिक अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना व्यावसायीक हस्तकला व कौशल्य विकास करण्याच्या दृष्टीने शिक्षण देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - बोर्डाच्या परीक्षांचं महत्त्व होणार कमी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - शेवटची 4 वर्ष अभ्यासक्रम
पुढील ४ वर्षामध्ये म्हणजेच इयत्ता ९ वी ते १२ वी या ४ वर्षात ४० वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीप्रमाणे विषय घेण्याची मुभा देण्यात येणार आहे. इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी बोर्डाच्या परिक्षेचे अवास्तव महत्त्व कमी करण्यात येईल. उच्च माध्यमिक वर्गांमध्ये कला, विज्ञान व वाणिज्य हा शाखाभेद न ठेवता आवडीचे विषय निवडता येतील तसेच पुढे पदवी पातळीवरही आवडीचे विषय निवडता येतील.
विद्यार्थ्यांना श्रीहरिकोटा येथे विमानाने जाण्याची सुवर्ण संधी - निवडीसाठी तीन टप्पे