आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पाच मोठे निर्णय घेण्यात आले, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गाण्याला महाराष्ट्राचे राज्य म्हणुन मान्यता देण्यात आली, तर महिला व बाल विकास विभागाच्या बालसंगोपन योजना अंतर्गत परिपोषण अनुदानामध्ये 1 हजार 225 वरून 2500 रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत ५ मोठे निर्णय - जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याला महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून मान्यता
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय खालीलप्रमाणे
१) 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गाण्याला महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून मान्यता देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत अमलात येणार आहे.{alertInfo}
२) महिला व बाल विकास विभागाच्या बालसंगोपन योजनेंतर्गत परिपोषण अनुदानात १ हजार २२५ वरुन २५०० रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.{alertInfo}
३) सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली कायमस्वरुपी विनाअनुदान तत्त्वावर १२ नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे{alertInfo}
४) खाजगी कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये पात्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू असलेली शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीची योजना अभिमत विद्यापीठांकरिता लागू करणार.{alertInfo}
५) महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या ५० व्या बैठकीतील शिफारस क्र. ३४ अनुसार अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यास मान्यता मिळाली आली. यामुळे आदिवासी युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.{alertInfo}
६) सन २०२२ च्या तेंदू हंगामापासून पुढे तेंदूपाने संकलनाव्दारे जमा होणाऱ्या संपूर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम कोणत्याही प्रकारची वजाती न करता संबंधित तेंदू पाने संकलन करणाऱ्या मजुरांना प्रोत्साहनात्मक मजुरी म्हणून देण्यात येणार आहे{alertInfo}
७) राज्यात दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्याकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांमधील प्रति दुधाळ जनावराच्या खरेदी किंमतीत वाढ करण्यात आली आहे. आता गाईसाठी ७० हजार रुपये, म्हशीसाठी ८० हजार रुपये एवढी खरेदी किंमत निश्चित करण्यात आली आहे.{alertInfo}
८) फलटण ते पंढरपूर या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाकरिता राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे या परिसरातील रेल्वे जाळे अधिक सक्षम होणार आहे.{alertInfo}
९) ‘महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा २०२२’ या विधेयकाचा मसुदा सादर करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे परवानग्या सुलभ आणि अधिक वेगवान होणार आहेत. यादृष्टीने यंत्रणेची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.{alertInfo}
१०) महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय झाला. यात अग्निसुरक्षेच्या अनुषंगाने सुधारणा करण्यात आली. त्यात शैक्षणिक इमारतींची उंची ३० मी. वरुन ४५ मी. करणे, फायर ऑडिटर किंवा सल्लागार नेमणुकीची तरतूद समाविष्ट आहे.{alertInfo}
११) ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही योजना सामाजिक न्याय विभागाच्या वस्ती सुधारणा योजना व सामाजिक विकास योजनांप्रमाणे राज्यस्तर व जिल्हास्तर अशा दोन्ही स्तरांवर राबविण्यात येणार आहे.{alertInfo}
१२) नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक क्षेत्रातील जमिनीच्या वापर प्रयोजनाविषयी निर्णय घेण्यात आला. या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तसेच शैक्षणिक संस्था देखील येणार आहेत. यामुळे ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व १ लाख रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.{alertInfo}
१३) पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेस ४६० कोटी रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामुळे पुणे जिल्ह्यातील अवर्षण प्रवण भागातील ६३ गावात २५ हजार ४९८ हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार आहे.{alertInfo}
"जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा संपूर्ण गीत व माहिती येथे वाचा
आणखी वाचा
शिक्षक भरती 2023 ! ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात - TAIT परीक्षा संपूर्ण माहिती
शिक्षक भरती 2023 शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आणि निवड प्रक्रिया - महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय
राज्य शासनासोबत काम करा व दरमहा मिळवा ७५ हजार सोबत गट अ चा दर्जा | मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2023
भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास - पहिल्यांदाच जिंकला ICC वर्ड कप 2023
पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023 महाराष्ट्र - 10 वीच्या गुणांनुसार थेट निवड
RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 नियमातील बदल येथे वाचा RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24
परीक्षा पे चर्चा लाईव्ह कार्यक्रम 2023 येथे पहा
आणखी वाचा
शिक्षक भरती 2023 ! ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात - TAIT परीक्षा संपूर्ण माहिती
शिक्षक भरती 2023 शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आणि निवड प्रक्रिया - महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय
राज्य शासनासोबत काम करा व दरमहा मिळवा ७५ हजार सोबत गट अ चा दर्जा | मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2023
भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास - पहिल्यांदाच जिंकला ICC वर्ड कप 2023
पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023 महाराष्ट्र - 10 वीच्या गुणांनुसार थेट निवड
RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 नियमातील बदल येथे वाचा RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24
परीक्षा पे चर्चा लाईव्ह कार्यक्रम 2023 येथे पहा
नवनविन अपडेट साठी समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.