जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 29 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. त्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे. व इयत्ता सहावी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2023 साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 08 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
{tocify} $title={Table of Contents}
जवाहर नवोदय विद्यालय ऑनलाइन फॉर्म
जवाहर नवोदय विद्यालय हे केंद्र सरकारचे १००% अनुदान मिळणारे विद्यालय असून, ६ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण या विद्यालयात मोफत दिले जाते. विशेषतः ग्रामीण भागातील गुणवंत, प्रतिभावंत विद्यार्थ्यांना अधिकचे प्राधान्य दिले जाते. ७५% जागा ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. तसेच दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५% जागा राखीव असतात. जवाहर नवोदय विद्यालय दरवर्षी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते.
javahar navoday vidhyalay online form |
सर्व इच्छुक विद्यार्थी 2023 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. जवाहर नवोदय विद्यालय ऑनलाइन फॉर्म 2023 सत्रासाठी अर्ज भरण्यासाठी, ज्या पालकांना त्यांच्या मुलांचा प्रवेश घ्यायचा आहे.
$ads={1}
त्यांनी नवोदय विद्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करावा. किंवा आपल्या मुलाच्या शाळेतील शिक्षक , मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा. नवोदय विद्यालयाच्या अधिकृत वेबसाइट लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे.
जिंका ७५ हजार रुपयांचे बक्षीस ! समृद्धी महामार्गावर निबंध लेखन स्पर्धा
नवोदय विद्यालय प्रवेश माहितीपत्रक २०२३ येथे डाउनलोड करा.
जवाहर नवोदय विद्यालयाची वैशिष्टे
- प्रत्येक जिल्ह्यात निवासी नवोदय विद्यालय उपलब्ध
- मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
- जवाहर नवोदय विद्यालयात मोफत शिक्षण दिले जाते. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.
- मोफत बोर्डिंग निवास व्यवस्था
- NCC, Scouts & Guides and NSS उपलब्ध
- विद्यार्थ्यांच्या आवड व छंद (कौशल्य) नुसार शैक्षणिक तसेच सांस्कृतिक, खेळ इतर उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
- Promotion of Sports & Games
- Wide Cultural exchange through Migration Scheme
जवाहर नवोदय विद्यालयाची खास वैशिष्टे
- JEE MAIN 2022 मध्ये 4296 students qualified
- JEE Advanced –2022 मध्ये 1010 students qualified
- NEET – 2022 मध्ये 19352 students qualified
- दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा सर्वोत्तम निकाल (२०२१-२२)
- इयत्ता १० वी- ९९.७१%
- इयत्ता १२ वी - ९८.९३%