महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. समाजातील दुर्बल व दुर्लक्षित दिव्यांगांच्या जीवनातील अंध:कार दूर करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे शिक्षण व प्रशिक्षण संदर्भात असलेल्या योजना, शिष्यवृत्ती योजना, दिव्यांग कर्ज योजना, मोफत कृत्रिम साहित्य साधने, दिव्यांग राज्य शासन पुरस्कृत योजना, दिव्यांग पेन्शन योजना, ग्राम पंचायत दिव्यांग योजना, दिव्यांगांसाठी असणारे दिव्यांग पोर्टल तसेच दिव्यांग सुविधा विषयी आजच्या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. दिव्यांग व्यक्ती मध्ये असलेल्या सामर्थ्याकडे पाहून त्यांच्यामधील असलेले गुणसामर्थ्य विकसित करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासन वेगवेगळ्या स्तरावर शासकीय योजना राबवीत आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध योजनांविषयीची माहिती आजच्या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.
{tocify} $title={Table of Contents}
दिव्यांग (अपंगांसाठी) असणाऱ्या कल्याणकारी योजना महाराष्ट्र 2023
दिव्यांग कल्याण व पुनर्वसन - सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
१९९५ मध्ये कलम ६० अन्वये दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता १९ ऑगस्ट २००० च्या शासन निर्णयान्वये अपंग आयुक्तालयांना विभाग प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिव्यांग व्यक्तीसाठी शिक्षण व प्रशिक्षण व पुनर्वसनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम आयुक्तालयाकडून केले जाते. सामाजिक न्याय विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या अपंग कल्याण व पुनर्वसन योजनांसाठी अनुदान वितरण करणे. योजनांवर नियंत्रण ठेवणे, योजनांमध्ये सुधारणा करणे व योजनेच्या अमलबजावणीची कामे आयुक्तालयाकडून केली जातात.
दिव्यांग योजना महाराष्ट्र |
➡️ दिव्यांग (अपंग) म्हणजे काय? दिव्यांग प्रकार
दिनांक 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिना निमित्त स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय घोषणा उद्घाटन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. आता यापुढे स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय या विभागाच्या मार्फत दिव्यांगांच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल.{alertInfo}
ऐतिहासिक निर्णय ! राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन- 2 हजारहून अधिक पदं भरणार
दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना
दिव्यांग शाळेतील अनिवासी विद्यार्थी तसेच सामान्य शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट न लावता शालेय शिक्षणासाठी शालान्त पूर्व शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांग शिष्यवृत्ती देण्यात येते.
- इयत्ता 1 ली ते 4 थी (अंध, अंशत: अंध, अस्थिव्यंग, कुष्ठरोगमुक्त तसेच कर्णबधिरांसाठी पायरी वर्गापासून) - दरमहा १०० रुपये
- इयत्ता 5 वी ते 7 वी - दरमहा १५० रुपये
- इयत्ता 5 वी ते 10 वी दरमहा २०० रुपये (मतिमंद व मानसिक विकलांग विद्यार्थी)
- (नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त विशेष शाळांतील) दरमहा १५० रुपये, दिव्यांगांच्या कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी दरमहा 300 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.
दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शालान्त परिक्षोत्तर (मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती)
- वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी शिक्षण, ॲग्रिकल्चर, व्हीटरनरीमधील पदवी व पदव्युत्तर शिक्षण वसतिगृहात राहणारे दरमहा १२०० रुपये, वसतिगृहात न राहणारे ५५० रुपये देण्यात येतात.
- अभियांत्रिकी, तांत्रिक स्थापत्य, वैद्यकशास्त्र, पदविका अभ्यासक्रम वसतिगृहात राहणारे दरमहा ८२० रुपये, वसतिगृहात न राहणारे ५३० रुपये देण्यात येतात.
- कला, विज्ञान, वाणिज्य मधील पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच व्यवसायिक पदविका अभ्यासक्रम शिकत असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना वसतिगृहात राहणारे ८२० रुपये आणि वसतिगृहात न राहणारे दरमहा ५३० रुपये देण्यात येतात.
- द्वितीय वर्षे व त्यानंतर पदवीपर्यंतचा शिकणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना वसतिगृहात राहणारे ५७० रुपये आणि वसतिगृहात न राहणारे दरमहा ३०० रुपये दिले जातात.
- ११वी, १२वी व पदवी प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम वसतिगृहात राहणारे ३८० रुपये आणि वसतिगृहात न राहणारे दरमहा २३० रुपये देण्यात येतात.
- दिव्यांग व्यक्तींना वाचक भत्ता मासिक रुपये १००, ७५, ५०/- देण्यात येतो. शैक्षणिक शुल्क : मान्यताप्राप्त संस्थेचे / विद्यापिठाचे सक्तीच्या शैक्षणिक शुल्काची रक्कम, टंकलेखन खर्च- रु. ६००/- (वार्षिक) इ.) अभ्यास दौरा खर्च : रु. ५००/- इतके देण्यात येते.
दिव्यांग आर्थिक सहाय्य योजना - स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल
दिव्यांग विद्यार्थ्यांना पारितोषिके योजना
दिव्यांग क्रीडा स्पर्धा योजना
दिव्यांगाना मोफत कृत्रिम अवयव व साधने योजना
दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी अर्थसहाय्य योजना
राज्य शासन पुरस्कृत योजना
दिव्यांग कल्याण राज्य पुरस्कार योजना
जागतिक दिव्यांग दिन
दिव्यांग मार्गदर्शन व सल्ला केंद्र
दिव्यांग व्यक्ती विवाह प्रोत्साहन योजना
दिव्यांग प्रवास सवलत
दिव्यांग मोफत प्रमाणपत्र
वाहन भत्ता व व्यवसाय कर सवलत
दिव्यांग नोकरी आरक्षण
दिव्यांग शिक्षण आरक्षण
➡️ दिव्यांग प्रमाणपत्र (UDID कार्ड) कसे काढावे? त्याचे फायदे
➡️ अस्थिव्यंग म्हणजे काय? सुविधा व सवलती संपूर्ण माहिती | Locomotor Disability Meaning
➡️ संजय गांधी निराधार पेन्शन योजना
➡️ अपंग पेन्शन योजना | इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
➡️ दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध अपंग कर्ज योजना
➡️ स्वावलंबन कार्डचे (UDID) फायदे
➡️ सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय? | Cerebral Palsy Meaning
नवनविन अपडेट साठी समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.