जागतिक दिव्यांग (अपंग) दिन दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये ३ डिसेंबर रोजी जगभरात जागतिक दिव्यांग (अपंग) दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सन 1992 पासून जागतिक (अपंग) दिव्यांग दिन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून 3 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो.
यंदा महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी दिव्यांग कल्याण विभाग - दिव्यांग मंत्रालय ३ डिसेंबरपासून कार्यान्वित होईल अशी घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य हे दिव्यान्गांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाच्या योजना लाभार्थी पर्यंत सहज व सुलभ पणे पोहचवण्यासाठी या विभागाची मदत होणार आहे.
समाजाला आपल्या या कर्तव्यांची आणि अपंग व्यक्तींच्या हक्कांची आठवण करून देणारा हा दिवस होय. आपण जे करू शकतो ते सर्व काही दिव्यांग बांधव देखील करू शकतात. म्हणूनच त्यांना सहानभूती नाही तर आपुलकीची गरज आहे. अपंग व्यक्तींच्या रोजच्या जीवनातील अडथळे दूर करणे, आपल्या क्षमतांचा योग्य वापर करून प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे अतिशय महत्वाचे आहे.
३ डिसेंबर रोजी जगभरामध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यासाठी आजच्या आर्टिकल मध्ये जागतिक दिव्यांग (अपंग) दिन घोषवाक्य (Divyang Day Slogan) पुढे दिलेली आहे.
➡️ दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध अपंग कर्ज योजना
➡️ अस्थिव्यंग म्हणजे काय? सुविधा व सवलती संपूर्ण माहिती (Locomotor Disability Meaning)
➡️ जागतिक दिव्यांग (अपंग) दिन 3 डिसेंबर रोजी का साजरा केला जातो? - जागतिक दिव्यांग दिन विशेष
जागतिक दिव्यांग (अपंग) दिन घोषवाक्य - Divyang Day Slogan
समाजातील अंध, मुके, बहिरे, किंवा इतर व्यंग असलेल्या व्यक्तींना सहानुभूती नको तर विश्वास दाखवा. त्यांना परावलंबी जीवन नको तर स्वावलंबी बनवायचे आहे. चला तर मग मदतीचा हात व साथ देऊ या.{alertSuccess}समावेशित शिक्षणसमावेशनशाळेत जाता नाते जडते।पुस्तकावीण सारेच घडते ।ज्ञानाचे, प्रगतीचे, भांडार उघडते ।।विद्यादानाचे समाधान मिळते ।सर्व समावेशनाने दिव्यांगाचे शिक्षण होते ।।त्यामुळे भावापिढीचे भविष्य घडते ।म्हणूनची सर्व समावेशाचेच महत्व कळते ।नव्या युगाला नव्या पिढीलानव्या शतकाचे व्दार उघडते ।सर्वांच्या उत्तम सहकार्यानेशिक्षणाचे नवे पर्व सुरू होते ।सर्व दिव्यांगाचे उत्तम शिक्षणात समावेशन होते।।
➡️ दिव्यांग प्रमाणपत्र (UDID कार्ड) कसे काढावे? त्याचे फायदे
➡️ स्वावलंबन कार्डचे (UDID) फायदे
➡️ संजय गांधी निराधार पेन्शन योजना
➡️ अपंग पेन्शन योजना | इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
➡️ दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम RPWD ACT 2016 नुसार दिव्यांग २१ प्रकार PDF
नवनविन अपडेट साठी समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.