दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध अपंग कर्ज योजना

दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार दिव्यांग व्यक्तींचे एकुण २१ प्रकारात विभागणी केली आहे. समाजातील दिव्यांग व्यक्तींच्या सबलीकरणासाठी शासन स्तरावरून सातत्याने प्रयत्न होत आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी तसेच समाजातील दुर्बल, दुर्लक्षित दिव्यांगांच्या जीवनातील अंधःकार दूर करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. दिव्यांग बांधवाना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी या महामंडळाकडून अपंग व्यक्तींना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. त्यामध्ये प्रामुख्याने वैयक्तिक कर्ज योजना, मुदत कर्ज योजना,दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, दिव्यांग कर्मचारी / उद्योजक यांचेसाठी सहाय्यक साधनांसाठी कर्ज योजना अशा विविध कर्ज योजनांचा समावेश आहे. आज आपण महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिव्यांग (अपंग) बांधवांसाठी देण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांची माहिती पाहूया.

{tocify} $title={Table of Contents}

दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध अपंग कर्ज योजना

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास ही महामंडळाची प्रमुख उद्दिष्टे

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी अशाप्रकारे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. ३ डिसेंबर २०२२ जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी महाराष्ट्र राज्य शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय विभाग कार्यन्वित केला आहे.

राज्यातील बेरोजगार दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे. तसेच दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविणे ही महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास ही महामंडळाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.

apang loan yojana

दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध अपंग कर्ज योजना

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या मार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध अपंग कर्ज योजना

  • वैयक्तिक थेट दिव्यांग कर्ज योजना
  • शैक्षणिक दिव्यांग कर्ज योजना
  • मुदत दिव्यांग कर्ज योजना (लहान व मध्यम व्यवसायासाठी)
  • दिव्यांग महिला समृद्धी योजना
  • मानसिक विकलांग (मनोरुग्ण), सेरेब्रल पाल्सी आणि आत्ममग्न (ऑटीझम) अशा दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार कर्ज योजना
  • मुदती दिव्यांग कर्ज योजना (पशुसंवर्धन)
  • सूक्ष्म पतपुरवठा दिव्यांग कर्ज योजना
  • युवा स्वावलंबन दिव्यांग कर्ज योजना
  • मतिमंद व्यक्तींच्या पालकांच्या संस्थांसाठी आर्थिक सहाय्य कर्ज योजना
  • दिव्यांग शेतकऱ्यासाठी कृषी संजीवनी / हॉर्टीकल्चर कर्ज योजना
  • दिव्यांग कर्मचारी / उद्योजक यांचेसाठी सहाय्यक साधनांसाठी कर्ज योजना
  • कौशल्य विकास / व्यवसाय शिक्षण यासाठी दिव्यांग कर्ज योजना
  • दिव्यांग व्यावसायिकांना दुकानाचे बांधकामासाठी कर्ज योजना
  • दिव्यांग व्यक्तींना इंडस्ट्रीयल युनिट स्थापन करणेसाठी कर्ज योजना

वैयक्तिक थेट दिव्यांग कर्ज योजना

मुख्य उद्देश

वैयक्तिक दिव्यांग थेट कर्ज योजना या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना मदत करणे. 

वैयक्तिक दिव्यांग थेट कर्ज योजनेत किती कर्ज मिळते?

वैयक्तिक थेट कर्ज योजने मध्ये जास्तीत जास्त रुपये 20 हजारापर्यंत कर्ज मिळू शकते.

वैयक्तिक दिव्यांग थेट कर्ज योजना व्याजदर व परतफेड मुदत

या योजनेचा व्याजदर हा दरसाल दरशेकडा २% इतका असतो. परत फेडीचा कालावधी हा ३ वर्ष असते. मासिक किंवा त्रैमासिक पद्धतीने कर्जफेड करता येते.

वैयक्तिक थेट कर्ज योजनेसाठी पात्रता

वैयक्तिक थेट दिव्यांग कर्ज योजनेमध्ये लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न १ लाखापर्यंत असायला हवे. तसेच वय वर्ष १८ ते 55 वर्षे वयोगटातील दिव्यांग व्यक्ती या कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकतात.
दिव्यांग व्यक्ती या वैयक्तिक थेट कर्ज योजना मध्ये योग्य तो कोणत्याही प्रकारचा व्यवसाय निवडू शकतो.

वैयक्तिक थेट दिव्यांग कर्ज योजना संदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.

दिव्यांग शैक्षणिक कर्ज योजना

दिव्यांग शैक्षणिक कर्ज योजना यामध्ये दहावीनंतर स्वतः दिव्यांग शिक्षणार्थी किंवा प्रशिक्षणार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. दहावी नंतर नोकरी मिळवण्यायोग्य असलेला शासन मान्य पाठ्यक्रम (कोर्स) साठी दिव्यांग विद्यार्थ्यांना  शैक्षणिक कर्ज मिळते.

शैक्षणिक कर्ज मर्यादा 

दिव्यांग शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये देशांतर्गत असणाऱ्या पाठ्यक्रमासाठी किंवा कोर्स साठी रुपये १० लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. तर परदेशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी रुपये २० लाखापर्यंत हे शैक्षणिक कर्ज दिव्यांगांना मिळते.

शैक्षणिक कर्ज व्याजदर व परतफेड मुदत

दिव्यांग शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये 4% चा वार्षिक व्याजदर आकारण्यात येतो तर हा व्याजदर महिलांसाठी 3.5% असा असतो. शैक्षणिक कर्जाची परतफेड कालावधी हा७ वर्ष असतो.

लहान व मध्यम व्यवसायासाठी मुदत दिव्यांग कर्ज योजना 

लहान व मध्यम व्यवसायासाठी कर्ज योजना

मुदत दिव्यांग कर्ज योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्ती कोणताही लघु उद्योग, प्रक्रिया उद्योग, वस्तू उत्पादन उद्योग, गृह उद्योग करू शकतो. मात्र हे कर्ज लहान व मध्यम व्यवसायासाठीच दिले जाते.

कर्ज मर्यादा

दिव्यांगासाठी असणाऱ्या या योजनेमध्ये व्यवसायाची प्रकल्प मर्यादा म्हणजेच कर्ज मर्यादा ही ५ लाखापर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येते.

व्याजदर व परतफेड मुदत

या व्यवसायासाठी वार्षिक रुपये ५०,००० पर्यंत 5% टक्के व्याजदर आकारण्यात येतो. तर 50 हजारावरील रकमेवर 6% व्याजदर आकारण्यात येतो. यामध्ये महिलांना 1% तर  अंध, मूकबधिर व मतिमंद प्रवर्गातील दिव्यांगांसाठी व्याजदरांमध्ये 0.5% म्हणजेच अर्धा टक्‍क्‍यांपर्यंत सूट देण्यात येते. 5 वर्षापर्यंत कर्ज परतफेड करता येते.

दिव्यांग महिला समृद्धी कर्ज योजना

महिला समृद्धी कर्ज योजना ही दिव्यांग महिलांसाठी आर्थिक सहाय्य करणारी विशेष अशी कर्ज योजना आहे. दिव्यांग महिलांचे स्वावलंबनाकरीता या योजनेमध्ये लक्ष देण्यात आले आहे. या कर्ज योजनेमध्ये दिव्यांग महिलांना व्याजदरांमध्ये 1% टक्‍क्‍यापर्यंतची सूट दिली जाते. तसेच या योजनेमध्ये महिला कोणताही लघु उद्योग, सेवा उद्योग, प्रक्रिया उद्योग, वस्तू उत्पादन उद्योग व गृह उद्योग करू शकतात.

कर्ज मर्यादा 

दिव्यांग महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांच्या उद्योगासाठी 5 लाखापर्यंतचे कर्ज देण्यात येते. 

व्याजदर व परतफेड मुदत

या कर्ज योजनेचा वार्षिक व्याजदर हा पुढील प्रमाणे
रु. ५०,०००/- पर्यंत - ४%
रु. ५०,०००/- ते रुपये ५ लाख पर्यंत- ५%
रु.५ लाखापेक्षा जास्त - ७%
परत फेडीचा कालावधी हा ५ वर्षे असतो.

मानसिक विकलांग (मनोरुग्ण), सेरेब्रल पाल्सी आणि आत्ममग्न (ऑटीझम) अशा दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार योजना

या कर्ज योजनेअंतर्गत रु. १० लाखापर्यंत कर्ज देण्यात येते. कर्ज देताना त्यासाठी करावा लागणारा कायदेशीर करार हा मनोरुग्ण व्यक्तीबरोबर करता येत नसल्यामुळे त्यांना मनोरुग्णाचे आई-वडील, मनोरुग्णाचे सहचर (पती अथवा पत्नी) अथवा कायदेशीर पालक  यांच्याद्वारे करावा लागतो.

दिव्यांग (अपंग) कर्ज योजना अर्जदार लाभार्थींची अहर्ता

  • अर्जदाराकडे किमान ४०% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • अर्जदार किमान १५ वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
  • अर्जदारचे वय १८ ते ६० वर्षे असावे.
  • अर्जदार कोणत्याही बॅंकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असायला हवे.
  • कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.
  • कर्ज-वितरणाचे-धोरण. PDF

दिव्यांगांसाठी असणाऱ्या इतर कर्ज योजना

  • मुदती दिव्यांग कर्ज योजना (पशुसंवर्धन)
  • सूक्ष्म पतपुरवठा दिव्यांग कर्ज योजना
  • युवा स्वावलंबन दिव्यांग कर्ज योजना
  • मतिमंद व्यक्तींच्या पालकांच्या संस्थांसाठी आर्थिक सहाय्य कर्ज योजना
  • दिव्यांग शेतकऱ्यासाठी कृषी संजीवनी / हॉर्टीकल्चर कर्ज योजना
  • दिव्यांग कर्मचारी / उद्योजक यांचेसाठी सहाय्यक साधनांसाठी कर्ज योजना
  • कौशल्य विकास / व्यवसाय शिक्षण यासाठी दिव्यांग कर्ज योजना
  • दिव्यांग व्यावसायिकांना दुकानाचे बांधकामासाठी कर्ज योजना
  • दिव्यांग व्यक्तींना इंडस्ट्रीयल युनिट स्थापन करणेसाठी कर्ज योजना

हे सुद्धा वाचा

➡️ अस्थिव्यंग म्हणजे काय? सुविधा व सवलती संपूर्ण माहिती (Locomotor Disability Meaning)

➡️ समाज कल्याण दिव्यांग विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना

➡️ संजय गांधी निराधार पेन्शन योजना 

➡️ अपंग पेन्शन योजना | इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                        

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now