शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांनी जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय, शासकीय / महानगर पालिका वैद्यकीय महाविद्यालय, महानगरपालिका रुग्णालय, केंद्र शासनाच्या दिव्यांग संस्था अलीयावरजंग नॅशनल इन्स्टिटयूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ हिअरींग डिसअॅबिलीटीज बांद्रा, ऑल इंडिया इन्स्टिटयुट फॉर फिजिकल मेडिसिन अॅण्ड रिहॅबिलिटेशन हाजीअली मुंबई बंदार वाला लेप्रसि हॉस्पिटल पुणे, आर्मड फोर्स मंडिकल कॉलेज पुणे यांना UDID Card या संगणक प्रणालीद्वारे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याकरिता मान्यता दिलेली असुन त्यानुसार या आरोग्य यंत्रणा कडुन दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येत आहेत.
अपंग व्यक्तींना अपंग प्रमाणपत्र देण्यासाठी भारत सरकारने संपूर्ण देशासाठी एक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे संपूर्ण देशातील दिव्यांग (अपंग) व्यक्तींसाठी ऑनलाइन अपंग प्रमाणपत्र देण्यात येते. अपंग प्रमाणपत्र या नवीन प्रणालीचे नाव आहे. 'स्वावलंबन कार्ड' त्यालाच 'UDID Card' , 'अपंग युनिक कार्ड' म्हणून देखील ओळखले जाते. 'UDID Card' म्हणजेच 'वैश्विक दिव्यांग ओळख पत्र' Unique Disability ID Card होय.
स्वावलंबन (UDID CARD) कार्डचे फायदे | UDID Card benefits in marathi
- UDID कार्ड (अपंग प्रमाणपत्रासाठी) घरबसल्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी दिव्यांग व्यक्ती अर्ज करू शकतात.
- या प्रणालीमध्ये प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला नोंदणीकृत असा युनिक क्रमांक मिळतो, सदर स्वावलंबन कार्ड दिव्यांगत्वाचे लाभ मिळण्यासाठी संपूर्ण देशामध्ये ग्राहय धरण्यात येते.
- एक कार्ड संपूर्ण देशभरातील सर्व प्रकारच्या योजना लागू होण्यासाठी UDID कार्ड स्वावलंबन कार्ड ची मदत होते.
- UDID कार्ड हे संपूर्ण देशभर वैध असेल केंद्रीय UDID या संगणक प्रणाली मध्ये दिव्यांग व्यक्तीची माहिती ही युनिक व खोटी आढळणार नाही.
- UDID कार्ड मध्ये दिव्यांग व्यक्तीची संपूर्ण माहिती असेल त्याची रचना ही एटीएम कार्ड सारखी आहे.
- आकाराने छोटे आहे. त्यामुळे अगदी सहज खिशात ठेवता येईल. व कोठेही घेऊन जाण्यास सोपे आहे. व ते लवकर खराब देखील होणार नाही.
- केंद्रीयकृत वेब पोर्टलद्वारे संपूर्ण देशभरात दिव्यांग व्यक्तींच्या डेटाची ऑनलाइन जनगणना द्वारे सरकारच्या विविध नियोजन प्रक्रियेस मदत.
- शासकीय रुग्णालये/ वैद्यकीय मंडळाद्वारे दिव्यांगत्वाच्या टक्केवारीची गणना करण्यासाठी त्वरीत मूल्यांकन प्रक्रिया उपलब्ध आहे.
- दिव्यांग व्यक्तीद्वारे किंवा त्यांच्या वतीने दिव्यांग प्रमाणपत्राचे ऑनलाईन नूतनीकरण आणि माहिती अद्ययावत करणे सोपे होते.
- दिव्यांग व्यक्तीकरिता सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांच्या कार्यक्षमतेसह प्रभावी व्यवस्थापन करणे सोपे होते.
- अतितीव्र प्रकारच्या दिव्यांग व्यक्तिकरिता सहज दिव्यांग प्रमाणपत्र मिळेल.
- अध्ययन अक्षम, ऑटिझम यासारख्या दिव्यांग बालकांना या कार्यक्रमाचा लाभ मिळेल.
- यूडीआयडी सिस्टम विविध श्रेण्यांनुसार डेटाची देखभाल करते. प्राप्त झालेला डेटा शासनाच्या विविध नियोजन प्रक्रियेस मदत करेल.
दिव्यांग प्रमाणपत्र मिळाल्याचे दिव्यांग व्यक्तींना मिळणारे लाभ
- दिव्यांग व्यक्तींकरिता विविध वैयक्तिक तसेच सामुहिक लाभाच्या योजनाचा लाभ मिळणे.
- दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक सक्षमीकरण करून पुनर्वसन करणे.
- दिव्यांग व्यक्तींना विविध प्रकारचे साहित्य साधने आणि उपकरणे पुरवठा करणे.
- दिव्यांग व्यक्तींना अनेक रोजगार आणि स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे.
- दिव्यांग व्यक्तींकरीता विवाह प्रोत्साहनपर योजना राबविणे,
- दिव्यांगाचे २१ प्रकार निहाय योजना आणि माहिती उपलब्ध करणे.
- मतदार यादीत दिव्यांग मतदारांची नोंद करून त्यांना मतदानाचा समान हक्क देणे.
- दिव्यांग विद्यार्थ्याना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि परिक्षेतील सवलती मिळवून देणे.
- दिव्यांग व्यक्ति, विद्यार्थी आणि खेळाडू यानां अर्थ सहाय्य करणे.
- दिव्यांग व्यक्ती, बालक आणि त्यांच्या पालकांना विविध करांमध्ये सवलती देणे.
- राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाची काटेकोरपणे अमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात माहिती संकलन करणे.
- केंद्र / राज्य / स्थानिक स्वराज्य संस्था/ महामंडळे इ. विविध विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकरितांच्या योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्तींना देणे.
- हेमोफिलिया (Hemophilla), थैलेसिमिया (Thalassemia), सिकल सेल (Sickle Cell Disease) या रक्त संबंधित आजाराच्या रुग्णांना औषधे आणि रक्ताचा पुरवठा करणे.
- जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत यांच्या स्वउत्त्पनाच्या ५% टक्के निधीतून विविध कल्याणकारी योजना आखणे.
नवनविन अपडेट साठी समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp लोगो का क्लिक करा.