कर्णबधिर व्यक्तींचे प्रमाणपत्र कसे काढावे? | Hearing impairment disability certificate

 'दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016' RPWD Act 2016 नुसार दिव्यांग म्हणजेच अपंगाचे 21 प्रकार निहाय आता दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र मिळणार आहे. 

या 21 प्रकारातील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यासाठी सर्वप्रथम काही तपासण्या केल्या जातात. त्यानुसार योग्य व्यक्तींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले जाते. नवीन दिव्यांग प्रमाणपत्र प्रणालीनुसार आता UDID Card (स्वावलंबन कार्ड) मिळते. यासाठी स्वावलंबन कार्ड या वेबसाईट वर सर्वप्रथम आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक असते. त्यानंतर आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये जाऊन आपण तपासणी करुन आपले जर 40% दिव्यांगत्व/ अपंगत्व प्रमाण असेल तर त्यानुसार आपल्याला प्रमाणपत्र मिळते. 

>> UDID Card (अपंगत्व प्रमाणपत्र) साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा? UDID Card काय आहे? अधिक माहितीसाठी भेट द्या.

UDID Card  Hearing impairment



{tocify} $title={Table of Contents}


कर्णबधिर व्यक्तींचे प्रमाणपत्र कसे काढावे? | Hearing impairment disability certificate

कर्णबधिर व्यक्तींना प्रमाणपत्र कसे मिळेल? | Hearing impairment disability certificate

21 दिव्यांग प्रकारांमध्ये कर्णबधिर तत्व हे देखिले दिव्यांगा चा प्रकार आहे. कर्णबधिर व्यक्ती किंवा बालकांची तपासणी करण्यासाठी बेरा टेस्ट ही शक्यतो लहान वयोगटातील मुलांची केली जाते.

कर्णबधिर व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती की, एका कानाने किंवा दोन्ही कानाने ऐकण्याची क्षमता कमी असणे किंवा दोन्ही कानाने किंवा एका कानाने काहीच ऐकू न येणे असे साधारणपणे आपल्याला म्हणता येईल.

दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 नुसार कर्णबधिर या अपंगत्वाची व्याख्या अशी केली आहे.

ज्या व्यक्तीच्या चांगल्या कानाचा श्रवणऱ्हास हा 60 DB (डेसीबल) किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्या व्यक्तीला कर्णबधिर असे समजले जाते. अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.

कर्णबधिर व्यक्तींची तपासणी अशी केली जाते. | Audiometry Test 

कर्णबधिर व्यक्ती आहे किंवा नाही या संदर्भातली तपासणी करण्यासाठी Audiometry Test  म्हणजेच श्रवण तपासणी केली जाते. त्यालाच Audiometry Test असे म्हणतात. ऑडिओ मेट्री करण्यासाठी एक Soundproof Room असते. त्या रूम मध्ये कसल्याही प्रकारचा आवाज येत नाही. त्याठिकाणी Audiometer द्वारे संबंधित व्यक्तीच्या कानाला ऑडिओमीटर चे हेडफोन लावून वेगवेगळ्या प्रकारचे तीव्रता आणि वारंवारता नुसार आवाज ऐकवले जातात. आणि मग त्या व्यक्तीचा प्रतिसाद नोंदविला जातो. हा प्रतिसाद श्रवणआलेखावर नोंदवला जातो. आणि मग श्रवणाआलेख Audiogram काढला जातो.

श्रवणाआलेखावरून Audiologist सांगतात की, संबंधित कर्णबधिर व्यक्तीचा कानाच्या ऐकण्याची क्षमता किती आहे. आणि मग त्यानुसार जर 40 टक्के अपंगत्व किंवा दिव्यांगत्व किंवा कर्णबधिरत्वाचे प्रमाण असेल तर त्या व्यक्तीला श्रवणआलेखावरून अपंग प्रमाणपत्र देण्याची शिफारस करण्यात येते. त्याच बरोबर याच श्रवणा आलेखावरून ऐकण्यासाठी श्रवण यंत्र देखील शिफारस केली जाते.

बेरा टेस्ट कशासाठी केली जाते? | Brainstem Evoked Response Audiometry (BERA)

लहान वयोगटातील मुलांची श्रवण तपासणी करण्यासाठी कानाला हेडफोन लावणे किंवा आवाजाला प्रतिसाद देण्याची प्रक्रिया ही व्यवस्थित होऊ शकत नसल्यामुळे लहान वयोगटातील कर्णबधिर मुलांसाठी शक्यतो बेरा टेस्ट केली जाते. Brainstem Evoked Response Audiometry (BERA) या बेरा टेस्ट नुसार ऐकण्याची क्षमता किती आहे. त्यानुसार श्रवणाआलेख काढला जातो. व श्रवण आलेखावरून कर्णबधिर अपंगत्व प्रमाणपत्र किंवा श्रवण यंत्र शिफारस करण्यात येते.

बेरा टेस्ट कशासाठी करतात? आणि काय समजते? | BERA Test

लहान मुलांच्या दोन्ही कानाची ऐकण्याची क्षमता तपासण्यासाठी बेरा टेस्ट केली जाते. बेरा टेस्ट केल्यानंतर उजवा आणि डाव्या कानाची ऐकण्याची क्षमता किती आहे?  हे श्रवण आलेखाद्वारे समजते. श्रवण आलेखावरून कर्णबधिर व्यक्तींचं अपंगत्व किती आहे? हे ठरवले जाते. त्याचबरोबर श्रवण यंत्र देण्याची शिफारस केली जाते. श्रवण यंत्र मध्ये देखील वेगवेगळे प्रकार पडतात. तर योग्य श्रवण यंत्र कोणती द्यावी ?याबाबतची देखील माहिती बेरा टेस्ट केल्यानंतर समजते.

कर्णबधिर व्यक्तींसाठी अपंगत्व प्रमाणपत्र कसे मिळते? | UDID Card  Hearing impairment 

Audiometry Test  किंवा बेरा टेस्ट या काना संबंधित तपासण्या केल्यानंतर ऐकण्याच्या क्षमता किती आहे? त्यानुसार कर्णबधिर अपंगत्व प्रमाण किती आहे? हे Audiologist श्रवण आलेखावरून शिफारस करतात. आणि मग त्यानुसार 'दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016' च्या कर्णबधिर व्याख्येनुसार जर  व्यक्ती यामध्ये बसत असेल, तर UDID कार्ड साठी कर्णबधीर व्यक्तींचे अपंग प्रमाणपत्र (Hearing impairment disability certificate) काढण्यासाठी  स्वावलंबन कार्ड या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरता येतो. आणि त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये जाऊन प्रमाणपत्र काढता येते.

>> UDID कार्ड साठी येथे क्लिक करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now