सेरेब्रल पाल्सी दिव्यांग 'ऋषिकेश 'चे दिव्य यश | Success stories in inclusive education
"राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!" या सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्या 'रंग माझा वेगळा' या गझलेतील ओळी इयत्ता बारावीत ऋषिकेश अनुभवातून शिकला व यशस्वी झाला.
यंदा कोरोना मुळे 12 वी ची परिक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी इयत्ता 12 वीत केलेली मेहनत झाकोळून गेली. सेरेब्रल पाल्सी (डायप्लेजीक) म्हणजे मेंदूचा पक्षाघात तसेच स्पास्टीसीटी (शरीरात सतत वाढणारा कडकपणा ) त्यात कोरोना लॉकडाऊन मुळे घरात , शरीराला मोकळा व्यायाम होऊ शकला नाही.
शारिरीक हालचाली मंदावल्या, चार वेळा पडून डोक्यावर आघात, डोळा थोडक्यात बचावला. पण जीद्द न हारता अंजुमन इस्लाम जंजिरा ज्यूनीअर काँलेज म्हसळा ता. म्हसळा जि. रायगड या काँलेज मधील प्राध्यापक यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे व प्रेरणेमुळेच ऋषिकेश शितल सुदाम माळी या दिव्यांग विद्यार्थ्यांने नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाण पत्र परिक्षेत शासनाच्या, बोर्डाच्या मूल्यमापन निकषानुसार विज्ञान शाखेत (600 पैकी 497 गुण) 82.83% टक्के मिळवून सेरेब्रल पाल्सी दिव्यांग 'ऋषिकेश 'ने दिव्य असे घवघवीत यश संपादन केले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाही शाळा/कॉलेज बंद मात्र शिक्षण सुरु अंतर्गत कॉलेज कडून आयोजित नियमित ऑनलाईन क्लास, प्राध्यापक वर्गा कडून मिळालेले वैयक्तिक मार्गदर्शन, आई व बाबांनी घरी करून घेतलेला नियमित सराव, समावेशित शिक्षण टीम म्हसळा यांच्याकडील मार्गदर्शन यामुळे बारावी विज्ञान शाखेचा अभ्यास ऋषिकेश ने चांगल्या पद्धतीने पूर्ण केला होता.
ऋषिकेश च्या शारीरिक जडणघडणी मुळे व विशिष्ट प्रकारच्या हालचाली व सवयी यांच्या वर मात करण्यासाठी व कॉलेज सुलभ व सुरळीतपणे करण्यासाठी ए.आय.जे.कॉलेज, म्हसळा चे चेअरमन श्री नासिर मिठागरे व सेक्रेटरी श्री फजल हलदे यांनी त्याला योग्य भौतिक सुविधा उपलब्ध करून देवून अमूल्य सहकार्य केले.
कॉलेज चे प्राचार्य श्री एम्.एम्. तांबे सर व प्राध्यापक श्री क्यू.एन. बांगी सर ,श्रीमती अन्वरी बंदरकर चिलवान मँडम, श्रीमती शिरीन शहा, श्रीमती शबाना जलगावकर, श्रीमती रूमाना सरखोत, श्रीमती रिझवाना सय्यद, श्रीमती शायिस्ता मेमन, श्री मुद्दसीर सर , श्री देशपांडे सर यांनी शैक्षणिक , शारीरिक व मानसिक या तीन्ही बाबतीत वैयक्तिक लक्ष देऊन, मार्गदर्शन करून प्रेरणा दिली.
आम्हा विद्यार्थ्यांसाठी कॉलेज ने कोरोना व इतर काळातही ऑनलाईन व ऑफलाईन तासिकांचे व परीक्षांचे सुयोग्य नियोजन व आयोजन केल्याचे ऋषिकेश ने सांगितले.
कॉलेज मधील श्री एस्.जी. गोरेगावकर , श्री असलम सरखोत, श्री सलीम घरटकर, श्री जंजिरकर , श्री अकबर , श्री सर्फराज, श्री डावरे, श्री दळवी, श्री कोदरे , श्री शकील हुर्जुक यांनी प्रत्येक अडीअडचणीत सहकार्य केल्याबद्दल ऋषिकेश ने "ए.आय. जे. काँलेज म्हसळा " मधील सर्वांचे मनापासून विशेष आभार मानले.
सेरेब्रल पाल्सी (दिव्यांग) ऋषिकेश ला मिळालेल्या या उत्तुंग यशाबद्दल म्हसळा तालुका गटविकासअधिकारी वाय.एम.प्रभे, सहाय्यक गट विकासअधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी श्री. राजेश कदम , वरीष्ठ विस्तार अधिकारी संतोष शेडगे , सर्व समावेशित शिक्षण टीम म्हसळा तालुका पंचायत समिती सदस्य सौ छाया म्हात्रे, म्हसळा नगराध्यक्षा सौ जयश्री कापरे, PNP एज्युकेशन सोसायटी ,अलिबाग, च्या कार्यवाह सौ चित्रलेखा पाटील, दिव्यांग संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री साईनाथ पवार, रायगड जिल्हा डाएट चे जेष्ठ अधिव्याख्याता श्री सुभाष महाजन , विद्या प्रधीकरण पुणे च्या पल्लवी देव , स्वयंम फाउंडेशन नाशिक च्या अध्यक्षा श्रीमती विद्या पाटील, पँराआँलिंपिक स्विमिंग चे कोच श्री अर्जुन सोनकांबळे, तसेच ऋषिकेश चे आदर्श तहसीलदार श्री हंसराज पाटील तसेच समीर बनकर , रमेश शेठ जैन, बाबूशेठ बनकर यांनी ऋषिकेश चे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
इयत्ता दहावी ला ८६.६०टक्के गुण मिळवलेल्या ऋषिकेश च्या यशाला कोरोना ची किनार असली तरी प्रयत्न करताना आम्ही सामान्य मुलांपेक्षा कुठेही कमी पडलो नाही , आमच्या साठी यशासारखे यशदायी काही नाही , यापुढेही आम्ही असेच विविध प्रयत्न करून, स्पर्धा परीक्षा देऊन दिव्यांग, खासकरून " सेरेब्रल पाल्सी" मुलांसाठी विशेष काम करणार असल्याचे त्याची आई शितल माळी यांनी सांगितले .
I carry my old delicious burdens , wherever I go .
I swear it is impossible for me.. to get rid of them ,
I filled with them , and I will fill them in return.
या बारावी इंग्रजी पुस्तकातील SONG OF THE OPEN ROAD या 'वाल्ट व्हिटमन' या सुप्रसिद्ध अमेरिकन कविच्या ओळी त्याला तंतोतंत लागू पडतात. या दिव्य यशाबद्दल 'ऋषिकेश' च्या जिद्दीला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या!
> दिव्यांग प्रेरणादायी वाचनीय मराठी पुस्तके
> समावेशित शिक्षण: दिव्यांग प्रेरणादायी पुस्तके
> दिव्यांग म्हणजे काय? दिव्यांग प्रकार Divyang meaning in marathi