बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम , शिक्षण हक्क (RTE Act 2009) कायद्यानुसार प्रत्येक बालकाला आपल्या घराजवळच्या शाळेमध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता सर्वांना शाळेत प्रवेश देण्यात येतो. सामान्य विद्यार्थी व विशेष गरजा असणारी विद्यार्थी म्हणजेच दिव्यांग विद्यार्थी यांच्या मूल्यांकन व परीक्षा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार व क्षमतेनुसार थोड्याफार प्रमाणात बदल करावे लागतात. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 (RPWD Act 2016) अन्वये आता दिव्यांगांचे 21 प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.
त्यानुसार शासन स्तरावरून विशेष गरजा असणाऱ्या (CWSN) दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनातील अध्ययन शैली नुसार करावयाच्या दिव्यांग 21 प्रकार निहाय मूल्यांकन व शैक्षणिक सवलती म्हणजेच परीक्षा पद्धतीमध्ये दिल्या जाणाऱ्या सोई सवलती यासंबंधीचा शासन निर्णय दिनांक 16 ऑक्टोबर 2018 रोजी शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे.
'समावेशित शिक्षण' शासन निर्णय | Inclusive Education GR
'समावेशित शिक्षण' शासन निर्णय |
समावेशित शिक्षण अंतर्गत महत्वाच्या संकल्पना
⇒ RPWD Act 2016 नुसार दिव्यांग व्याख्या व दिव्यांग 21 प्रकार येथे पहा
⇒ अध्ययन शैली म्हणजे काय? व अध्ययन शैलीचे प्रकार कोणते? येथे सविस्तर वाचा
⇒ समावेशित शिक्षण - दिव्यांग योजना सुविधा व सवलती (Inclusive Education)
⇒ समावेशित शिक्षण संकल्पना येथे वाचा
⇒ समावेशित शाळेतील विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे आव्हाने व उपाययोजना
⇒ समता म्हणजे काय? समता व समानता यामधील फरक येथे वाचा
⇒ अध्ययन अक्षमता व प्रकार येथे वाचा
⇒ समावेशित शिक्षणामध्ये कर्णबधीर मुलांचे शिक्षण
इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग (CWSN) विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैलीनुसार मूल्यांकना बाबत व शैक्षणिक सवलती देण्यासंदर्भात दिनांक 16 ऑक्टोबर 2018 चा शासन निर्णय
दिनांक 16 ऑक्टोबर 2018 चा शासन निर्णय
समावेशित शिक्षण शासन निर्णय
अ.क्र. | विषय | |
---|---|---|
1. | इयत्ता 1 ली ते 12 वीच्या दिव्यांग विद्यार्थी परीक्षा सवलती - 16 ऑक्टोबर 201 | Download |
2. | दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक देणेबाबत | Download |
3. | समावेशित शिक्षण दिव्यांग योजना सोयी व सवलती | Download |
4. | दिव्यांग विद्यार्थी विषय योजना परिपत्रक | Download |
5. | सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन | Download |