आर्ट थेरेपी बद्दल आपण ऐकले असेलच, आर्ट थेरेपी ही एक प्रकारे भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे. वेगवेगळ्या कलाकृती च्या माध्यमातून व्यक्त होता येते.
आर्ट थेरेपीला वैज्ञानिक आधार असून आर्ट थेरेपी मध्ये नक्षी, रंगकाम, गाणी , गोष्टी, संगीत , नाट्य , शिल्प कला , नृत्य , मातीकाम, चित्रकला , पेंटिंग , कोलाज , कलर देणे , मंडल आर्ट , कलाकृती इ. समावेश आर्ट थेरेपी मध्ये होतो.
आर्ट थेरेपी ही मानासिक आरोग्यासाठी लाभकारक आहे. कलाकृती च्या माध्यमातून व्यक्ती दृश्य रुपात स्वतः ला अभिव्यक्त करत असतो. आर्ट थेरेपी ही लहान मुलांपासून ते वयोवृध्द व्यक्तींसाठी एक लाभदायक थेरेपी आहे.
एखाद्या केसेस मध्ये बालक किंवा व्यक्ती स्वतः सोबत घडलेली घटना बोलून सांगू शकत नाही, तर अशा वेळी तो आर्ट च्या माध्यमातून व्यक्त होतो.
> समावेशित शिक्षण: दिव्यांग प्रेरणादायी पुस्तके | divyang motivation book
मानसिक स्वास्थ्य सदृढ ठेवण्यासाठी , ताण तणावापासून मुक्ती मिळवण्याबरोबर , एकाग्रता वाढवण्यासाठी लाभदायक आहे.
{tocify} $title={Table of Contents}
दिव्यांग मुलांसाठी आर्ट थेरेपी (Art Therapy) चे महत्व
आर्ट थेरेपी ही दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी देखील प्रभावी आहे. यामध्ये दिव्यांग मुलांच्या आव्हाने कमी करण्यासाठी आर्ट थेरेपी चा प्रभावी वापर करता येईल. विशेष गरजा असणारी बालके यांच्यामध्ये वेगवेगळ्या समस्या आढळून येतात. त्यानुसार त्यावर उपाय म्हणून आर्ट थेरेपी द्वारे ही आव्हाने कमी करण्यासाठी दिव्यांग मुलांसाठी आर्ट थेरेपी चे महत्वपूर्ण आहे. यामध्ये खालील दिव्यांग मुलांसाठीच नाही तर इतर सर्व मुलांसाठी आवश्यक क्षमता विकसित करण्यास मदत होईल.
आर्ट थेरेपी (Art Therapy) चे फायदे
- डोळे आणि हाताचा समन्वय साधता येईल.
- दिव्यांग मुलांमध्ये असणारी अतिचंचलता कमी करता येऊ शकेल.
- संवेदी एकत्रीकरण (सर्व ज्ञानेद्रियांचा एकत्रित वापर आर्ट थेरेपी मध्ये करता येतो.) दिव्यांग मुलांचे जे ज्ञानेद्रीय निकामी आहे. त्याव्यतिरिक्त उर्वरित ज्ञानेद्रियांचा एकत्रित समन्वय साधता येईल.
- संभाषण कौशल्य विकसित करण्यास मदत होईल. यामध्ये ग्रुप कार्य द्वारे संभाषण साधता येऊ शकेल.
- एका जागेवर बसण्याची क्षमता वाढवण्यास मदत होईल. कलाकृती हे एका जागेवर बसून एकाग्रतेमुळे विशेषतः अतिचंचल दिव्यांग मुलांना कामात व्यस्त ठेवल्यामुळे आर्ट थेरेपी च्या माध्यमातून एका जागेवर बसण्याची क्षमता वाढेल.
- कलाकृती (art theraphy) मधून मुलांना न बोलता येणारा प्रसंग , भावना या माध्यामतून सांगण्यास मदत होईल.
- आर्ट थेरेपी मुळे लक्षात ठेवण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल.
- सूचनांचे पालन करण्याची क्षमता आर्ट थेरेपी च्या माध्यमातून विकसित होईल.
- एकाग्रता वाढण्यास मदत आर्ट थेरेपी मुळे होते.
आर्ट थेरेपी करण्याचे टप्पे Stages of implementation Art Theraphy
- मुलांच्या मध्ये जो बदल हवा आहे. त्या उद्दिष्ठानुसार जास्तीत जास्त Plan an activity कृतींचा शोध घेऊन एक यादी तयार करा. त्यासाठी लागणारे साहित्याची जुळवाजुळव करायला हवी.
- Activity करताना काय काळजी घ्यावी ? general discipline, materials to be used साहित्यांचा वापर कसा करावा ? याबाबत संपूर्ण माहिती सुरुवातीच्या १० मिनिटामध्ये मुलांना ओळख करून द्यायला हवी.
- प्रत्यक्ष activity करताना मुलांना instructions देताना छोटी वाक्य , हळू बोलणे , सोप्या शब्दांचा वापर करा. प्रोत्साहन देत रहा.
- Repeat your activity minimum 2 to 3 times मुलांना मध्येमध्ये आठवण करून द्यावी.
- participate मुलांना activity सुरु करण्यापूर्वी विशेषतः दिव्यांग मुलांना कृतीचा डेमो दाखवावा. आवश्यक असल्यास कृती करत करत activity मध्ये सहभाग घ्यावा.
- activity दरम्यान मुलांना छोटी छोटी प्रश्न विचारावे. ask questions
- मध्ये मध्ये प्रोत्साहन द्यावे.
- आवश्यक तिथे मदत करावी.
- केलेल्या कृतीचे कौतुक करावे.
- बक्षीस द्यावे.