UDISE Plus माहिती अद्ययावत करण्याचा संदर्भीय दिनांक
30 सप्टेंबर 2020 या दिनांकानुसार UDISE Plus प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने शाळांची माहिती संगणकीकृत करण्याबाबत कळविले आहे. या वर्षी कोरोना महामारी मुळे शाळांची माहिती यु-डायस प्लस वर भरण्यास विलंब झाला आहे. संपूर्ण देशामध्ये कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊनची परिस्थिती ओढवली आहे.
UDISE Plus माहिती चा उपयोग
त्यामुळे राज्यातील शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. सन 2021-22 समग्र शिक्षा (SSA) या योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक (SSA BUDGET) तयार करण्याकरिता शाळांची माहिती अद्ययावत करणे आवश्यक असते.
त्यानुसार पुढील वर्षी चे समग्र शिक्षा (SSA BUDGET) केंद्र शासनाच्या नियमाच्या अधिन राहून मंजूर केले जाते. कोव्हीड 19 चा विचार करता भारत सरकारकडून सन 2019-20 या वर्षांमध्ये विकसित केलेल्या प्रपत्रानुसार सन 2020-21 च्या प्रपत्रामध्ये काहीही बदल न करता शाळांमध्ये उपलब्ध झालेल्या सोयी सुविधांची शिक्षक , विद्यार्थी , मोफत पाठ्यपुस्तक , गणवेश ,दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलेल्या सहाय्यभूत सेवा सुविधांची माहिती ऑनलाईन पध्दतीने UDISE Plus वर संगणकीकृत करायचे आहे.
समावेशित शिक्षणसमग्र शिक्षा Samagra Shiksha (सर्व शिक्षा अभियान) या केंद्रपूरस्कृत योजने अंतर्गत समावेशित शिक्षण हा एक महत्वकांक्षी उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. वर्गातील प्रत्येक मुलाला गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याची हमी शिक्षण हक्क कायद्याने प्राप्त झाली आहे. शाळेमध्ये विविध घटकातील विद्यार्थी एकसमान पातळीवर शिक्षण घेत आहे. त्यामध्ये वंचित घटकातील एक म्हणजे विशेष गरजा असणारी बालके Children With Special Needs CWSN त्यांनाच 'दिव्यांग' म्हणून ओळखले जाते.
हे ही वाचा
> समावेशित शिक्षण म्हणजे काय?बदलत्या काळानुसार शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल होत आहे. त्यामध्ये समावेशित शिक्षण या संकल्पना देखील बदल होताना दिसत आहे. पूर्वी विशेषतः दिव्यांग (Divyang) विद्यार्थ्यांवर फोकस करून या मुलांच्या अध्ययनातील अडथळे सोडवण्याबाबत येणाऱ्या आव्हानावर उपाय योजना करण्यात आल्या. ये आहे. आता वर्गातील विविध अध्ययन शैली ने शिकणारे विद्यार्थी यांना अध्ययन शैली निहाय सपोर्ट देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
'दिव्यांग' (cwsn) मूलांना शैक्षणिक सहाय्यभूत सेवा सुविधा शासनामार्फत दिल्या जातात. त्यामध्ये मदतनीस ,प्रवास भत्ता ,वाचक , लेखनिक भत्ता , साहित्य साधने , प्रोत्साहन भत्ता असे विविध सुविधा Divyang मुलांच्या शिक्षणासाठी शासनामार्फत दिल्या जातात. यासाठी दरवर्षी UDISE Plus मध्ये शाळांची माहिती एकूण 11 भागामध्ये संकलित करून संगणकीकृत करण्यात येते. आणि केंद्र व राज्य 60:40 या प्रमाणात समग्र शिक्षा योजनेची अंमलबजावणी व अंदाजपत्रक केंद्र शासनामार्फत मंजूर करण्यात येते. तर आता आपण दिव्यांग मुलांना सोयी सवलती चा लाभ मिळवून देण्यासाठी योग्य अचूक माहिती यु-डायस मध्ये भरणे आवश्यक आहे.
UDISE Plus 2021 मध्ये दिव्यांग मुलांची माहिती अचुक भरण्यासाठी दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 नुसार दिव्यांगत्वाचे 21 प्रकाराची माहिती खालील प्रमाणे.
दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 नुसार दिव्यांगत्वाचे 21 प्रकार types of disability
त्यानुसार खालीलप्रमाणे पूर्वतयारी केल्यास दिव्यांग मुलांची अचूक माहिती भरण्यास मदत होईल.
1. सर्वप्रथम आपल्या शाळा , कॉलेज ,महाविद्यालयात शिकणारे 'दिव्यांग' मुलांची यादी तयार करावी.
2. दिव्यांग मुलांची यादी तयार करताना दिव्यांगत्व प्रमाणपत्र असेल तर त्यावरील दिव्यांग प्रकार नमूद करावा.
3. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र नसेल तरीदेखील 21 प्रकारातील कोणता प्रकार लागू होतो. त्याची खात्री करून तो प्रकार नमूद करावा. (उदा. अंशतः अंध , वाचादोष , अध्ययन अक्षम इ.)
4. शालेय आरोग्य तपासणी कार्ड वर देखील आपणास याबाबत माहिती मिळू शकेल. किंवा वर्गशिक्षकांना मुलांच्या मधील विकनेस म्हणजेच 21 प्रकारातील दिव्यांगत्व असण्याची शक्यता याबाबत खात्री करून नोंद करावी.
5. तालुका / केंद्र स्तरावरून आपणास याबाबत अधिक मार्गदर्शन घेता येईल.
6. तालुका / केंद्र स्तरावरून आपणास cwsn मुलांची यादी प्राप्त झाल्यास यादी निहाय मुलांची खात्री करावी.
दिव्यांग 21 प्रकार निहाय सविस्तर माहिती घेण्यासाठी येथे क्लीक करा.
UDISE Plus मध्ये दिव्यांग cwsn मुलांची माहिती कोठे भरावी ?
१. भाग-४ मधील , ४.६ चालू शैक्षणिक वर्षातील दिव्यांग / विशेष गरजा असणाऱ्या cwsn मुलांची संख्या:-
२. भाग- ५ मध्ये ५.३ मागील शैक्षणिक वर्षात (अपंग) दिव्यांग समावेशित शिक्षण अंतर्गत पुरवठा केलेले साहित्य साधने , सेवा सुविधांची माहिती भरावयाची आहे. त्यामध्ये खालील सुविधा प्रकार आहे.
१. UDISE मधील भाग-4 मध्ये 4.6
UDISE Plus मध्ये ऑनलाईन माहिती भरण्यापूर्वी ऑफलाईन फॉर्म मध्ये माहिती भरून घ्यावी. UDISE मधील भाग-4 मध्ये 4.6 या कॉलम मध्ये आपणास विशेष गरजा असणारी बालके Cwsn म्हणजेच दिव्यांग मुलांची माहिती भरायची आहे.
4.6 चालू शैक्षणिक वर्षातील दिव्यांग / विशेष गरजा असणाऱ्या cwsn मुलांची संख्या:-
असा मुद्दा दिसेल त्यामध्ये दिव्यांगत्वाचे 21 प्रकार आहे.
पूर्व प्राथमिक ते इयत्ता 12 वी पर्यंत कॉलम आहे.
या कॉलम मध्ये आपणास दिव्यांग व इयत्ता निहाय अचूक माहिती इथे भरायची आहे.
यासाठी आपण सर्वप्रथम मुलांची यादी तयार करून दिव्यांग 21 प्रकार ची सविस्तर माहिती वाचून घ्या. आणि मग नंतर आपण आपल्या शाळेतील ,कॉलेज ,महाविद्यालयात शिकणाऱ्या दिव्यांग मुलांची अचूक माहिती भरता येईल.
२. भाग- ५ मध्ये ५.३ मागील शैक्षणिक वर्षात (अपंग) दिव्यांग समावेशित शिक्षण अंतर्गत पुरवठा केलेले साहित्य साधने , सेवा सुविधांची माहिती भरावयाची आहे. त्यामध्ये खालील सुविधा प्रकार आहे.
1. Brail Books
ब्रेल बुक्स म्हणजे अंध मुलांना पुरविण्यात आलेले ब्रेल ची पुस्तके मिळाली असतील तर याबाबतीत ची माहिती या कॉलम मध्ये भरण्याची आहे.2. Brail Kit
ब्रेल किट म्हणजे अंध विद्यार्थ्यांना लिहण्यासाठी ब्रेल पाटीचे साहित्य किट मिळाले असेल तर याची नोंद इथे करावी.3. Low Vision Kit
अंशतः अंध म्हणजेच ज्यांना कमी दिसते किंवा एकाच डोळ्याने दिसते. अशा मुलांना मिळालेल्या लो व्हिजन किट ची माहिती येथे अपडेट करावी.4. Hearing Aid
कर्णबधिर Hearing Impairment मुलांना कानाने ऐकू येण्यासाठी कानाचे मशीन दिले जाते. याची माहिती येथे भरावी.5. Braces
ब्रसेस हे सांध्यांना आधार देणारे पट्टे असतात.6. Crutches
क्रचेस म्हणजेच कुबड्या उभं राहण्यासाठी , चालण्यासाठी चे सपोर्टटिव्ह साधन7. Wheel Chair
व्हीलचेयर ही दोनचाकी सायकल असते. सेरेब्रल पालसी , बहुविकलांग मुलांच्या साठी व्हीलचेयर अधिक फायदेशीर असते.8.Tri-Cycle
तीनचाकी सायकल विद्यार्थी स्वतः ही सायकल चालवतो.9. Caliper
कॅलिपर हे पायाला सपोर्ट करणारे बूट आहे.10. Escort
मदतनीस भत्ता11. Stipend
प्रोत्साहन भत्ताअशा पद्धतीने विशेष गरजा असणारी बालके (cwsn) म्हणजेच दिव्यांग मुलांना दिलेल्या सेवासुविधांची माहिती भाग ५ मधील ५.३ मध्ये नमूद करावी.
सारांश
UDISE Plus 2021-22 मध्ये शाळांची अचूक माहिती भरण्यासाठी फॉर्म मधील दिव्यांग मुलांची माहिती अचूक कशी भरावी? दिव्यांग २१ प्रकार माहिती त्याचबरोबर दिव्यांग मुलांना दिलेल्या सेवा सवलती , सुविधांची माहिती बाबत सविस्तर माहिती घेतली आहे. दिव्यांग प्रकार सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
दिव्यांग प्रमाणपत्र UDID कार्ड