कोरोना कालावधीतील मानसिक स्वास्थ व ताण तणाव व्यवस्थापन mental health during covid 19 and stress management
एक वेगळ्या विषयाची आपण
आज चर्चा करत आहोत तसं पाहिलं तर ताणतणाव हा एक आपल्या आजच्या आयुष्यातील अविभाज्य
भाग झाला आहे. त्यामुळे त्याला दूर सारून कस चालणार ? नियोजन
करण्याची कला आपल्याला जाणून घ्यावी लागेल. सर्वात पहिली गोष्ट जाणून घेऊया
आपल्याला तणाव खरंच आवश्यक आहे का? बऱ्याच लोकांना असे
वाटते की आपल्या आयुष्यात ताणतणाव नको आहे, तर या शब्दाची फोड
केली तर ताण - तणाव असा शब्द आहे.
आयुष्यात ताण आवश्यक आहे , मात्र तणाव आवश्यक नाही. याचं साधं उदाहरण म्हणजे जर एखाद्या वीणेच्या तारेमध्ये जर ताण असेल तरच वीणा उत्तम वाजणार आहे. गिटारच्या तारांमध्ये ताण असेल तरच ती गिटार उत्तम वाजणार आहे, धनुष्याच्या दोरीमध्ये ताण असेल तरच बाण पुढे जाणार आहे. आपल्या पण आयुष्यामध्ये काही ध्येय साध्य करायचे असेल तर तिथेसुद्धा जगण्यासाठी सकारात्मक ताण stress आवश्यक आहे, मग आपण जे म्हणतोय मला नकोय मला नको आहे हे काय आहे?
तर हा आहे तणाव., आपल्याला तणाव नको आहे. जो अतिरिक्त तणाव आपल्याला आयुष्यामध्ये निर्माण होतो तो कशामुळे होतो.तर आयुष्यामध्ये कुठलीही परिस्थिती निर्माण होते त्यावेळी भावनिक आणि शारीरिक अशा दोन वेगवेगळ्या पातळीवर हा तणाव निर्माण होतो. कुठलीही Action ला Reaction म्हणून आणि एखादी Challening किंवा Demanding परिस्थिती जर निर्माण झाली तर असे प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये तणावाचे प्रसंग निर्माण होतात.
आपल्या रोजच्या जगण्यामधील साधे उदाहरण घ्या. मार्केटमध्ये कांद्याचे आवक कमी झाली तर काय होणार? कांद्याचे भाव वाढणार, कोणीतरी बातमी करत कांद्याचे भाव वाढले गृहिणीच्या डोळ्यांना पाणी आणि मग तणावाची परिस्थिती निर्माण होते.
दुसरी गोष्ट कधीकधी खूप जास्त प्रमाणात कांदा येतो आणि कांद्याचे भाव एकदम कमी होतात. मग शेतकरी तणावामध्ये येतात रास्तारोको होतो., तेव्हा देखील तणावाची परिस्थिती निर्माण होते. आपल्या आयुष्यातील साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपला अभ्यास केलेला आहे. कधी कधी आपला अभ्यास झालेला नसतो आणि अचानक परीक्षेची तारीख येते तेव्हा देखील तणाव निर्माण होते. त्यामुळे ज्या ज्या वेळी मागणी आणि पुरवठा यामध्ये गल्लत होते त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होते. आता आपण समाज म्हणून आणि व्यक्ती म्हणून एका वेगळ्या तणावाच्या प्रसंगाला सामोरे जात आहोत.
वर्षभरापासून कोरोना सोबत आपण जगत आहोत . त्यामुळे गेल्या वर्षभर आपण एक व्यक्ती म्हणून व समाज म्हणून एका वेगळ्या तणाव मधून
आपण जात आहोत., मग
आपण हे जाणून घेतले पाहीजे कि जेव्हा जेव्हा हे तणावाचे
प्रसंग निर्माण होतात त्यावेळी नेमके काय घडत असतं? आपण व्यक्ती म्हणून मानसिक पातळीवर याचा वेगवेगळ्या प्रकारे सामना करत असतो, मानसिक वेगवेगळ्या
अवस्थामधून आपण जात असतो ते कोणते कुठलीही आपत्ती अचानक आपल्याला जेव्हा मिळते
तेव्हा आपली प्रतिक्रिया ही Deny असते. आपलं मन ती परिस्थिती
स्वीकारायला तयारच नसते.
1) म्हणजेच सुरुवातीला
अगदी चिनच्या बातम्या येत होत्या त्यावेळी आपल्या देशात ही परिस्थिती येणारच नाही, आपल्याकडे होणारच नाही
ही परिस्थिती आपल्याकडे येणारच नाही. त्यामुळे बरेचदा आपण Deny mode मध्ये होतो. त्यानंतर जसा जसा
प्रभाव वाढत गेला तसे आपण
2) दुस-रा stage गेलो त्याला आपण म्हणतो anger तिथे माणसाला किंवा समाजाला त्याबद्दल राग
यायला लागतो. यामुळे झाले, त्यामुळे झाले., आपण असं केलं पाहिजे
तसं केला पाहिजे असे वेगवेगळ्या पद्धतीने React होत असतो.
3) तिसऱ्या stage मध्ये येते त्यामध्ये माणसं तडजोड करायला लागतात. म्हणजे तो भाव तडजोड करायला लागतो उन्हाळा असल्यामुळे आपल्याकडे त्याचा प्रभाव जास्त वाढणार नाही, आपल्याकडे प्रतिकारशक्ती जास्त आहे त्यामुळे आपल्याकडे रुग्ण वाढणार नाही. त्यामध्ये जास्त त्रास होणार नाही. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने जर, तर, असं झालं तर काय होईल? तसं झालं तर कस होईल? या पद्धतीने आपण विचार करत असतो. आणि एका तडजोडीच्या अवस्थेत गेलेलो असतो.
४) चौथी अवस्था असते
नैराश्याची त्यावेळेस आपल्याला वाटते की आता परिस्थिती हाताबाहेर जात आहे., आपल्याकडून कंट्रोल
होत नाही, त्यावेळी
माणसांमध्ये निराशेचे उदासीनतेचे, चिंतेचेही लक्षणे दिसायला लागतात. एक समाज म्हणून एक मानसोपचारतज्ञ म्हणून
आम्ही जेव्हा बघतो त्यावेळी आम्हाला असं जाणवायला लागले की एकूणच चिंता विकारांचे, या तणावाच्या
प्रसंगामुळे नैराश्याच्या पेशंटची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
५) त्यामुळे बहुतांश लोक आता चौथ्या स्टेज मध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो., आणि सर्वात महत्वाची आणि शेवटची जी आहे Acceptance भरदिवसा पासून आपल्यातले काही तज्ञ मंडळी म्हणायला लागलेली आहे की आपल्याला living with corona या कोरोना व्हायरस आजारावरती, प्रसारवरती नियंत्रण मिळवायचा आहे. पण हा विषाणू लगेच समाजातून नाहीसा होईल किवा त्याचे समूळ उच्चाटन होईल अशी काही परिस्थिती नाही. आपल्याला आपल्या जीवन शैलीमध्ये असे काही बदल करून घ्यावे लागणार आहेत, जेणेकरून आपल्याला या कोरोना जरी आजूबाजूला असला तरी आपल्याला आपले दैनंदिन नॉर्मल आयुष्य जगता आले पाहिजे आणि यामध्ये मग आपण ज्या नवीन गोष्टी आत्मसात करत आहोत त्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होतो आहे. आपण नेहमी बघतो की ही जी शेवटची step ला म्हणजे स्विकार या टप्प्यावर पोहोचतात, ती या परिस्थितीतून बाहेर पडतात आणि एकदा स्वीकार झाला की मग माणूस स्वतःमध्ये त्या प्रमाणे बदल करायला सुरुवात करतो जोपर्यंत आपण परिस्थिती स्वीकारतच नाही तोपर्यंत आपण स्वतःमध्ये बदल करून घेऊ शकत नाही.
जोपर्यत मी माझा, स्वतः च्या
परिस्थितीचा स्वीकार करत नाही तोपर्यत प्रगतीचा मार्ग सापडत नाही. म्हणून हा स्वीकार
आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. विचार, वर्तणूक आणि भावना या
तीन पिल्लरसवरती मनाचं आरोग्य टिकून राहिलेला असते आणि म्हणूनच आपण
कुठल्याही एका घटकांमध्ये गडबड झाली, जर आपले विचार गडबडले तर त्याचा परिणाम
भावनांवर होते आणि मग वर्तणूक बिघडते.
काही
लोकांच्या मध्ये आधीच भावनांमध्ये गडबड होते चिंता वाटते आणि चिंता
वाढल्यानंतर त्याचा परिणाम विचारांवरती होतो आणि मग वर्तणुकीत बदल होतात आणि काही
लोकांमध्ये पहिली वर्तणुकीमुळे गडबड होते नियम आणि चित्त सोडून आपण जर खूप जास्त
वागलो तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो., आणि हे सगळे होत असतांना हीच गोष्ट आपण कधीच
विसरून चालत नाही ती म्हणजे आपल्या शरीरात आणि आपलं मन या दोन्ही भिन्न गोष्टी नाही या
गोष्टींचा एकत्रित चालतात आणि म्हणूनच आपल्या या दोघांना सोबत घेऊनच काम करावे
लागते आणि म्हणूनच आरोग्याची जी व्याख्या आहे ती संपूर्ण आरोग्य, आणखी एका छोट्या
उदाहरणातून आपण समजून घेऊया.
जेव्हा
तणावाचे प्रसंग येतो त्यावेळेस नेमके काय होते. अशी कल्पना करा की
तुम्ही तुम्हाला कुत्र्याची प्रचंड भीती वाटते आणि समोर रस्त्यामध्ये कुत्रा उभा
आहे आता माझ्या शरीरामध्ये पण बदल होणार कारण केवळ समोर कुत्रा बघितल्यानंतर माझ्या
मनामध्ये भीतीची भावना निर्माण झाली आणि हे निर्माण झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये
मेंदूमध्ये Autonomic nervous system activate केली जाते.
आपला मेंदू आपल्या शरीराच्या इतर
भागांकडे हे सगळे संदेश पोहोचवतो की आता ही तणावाचे प्रसंग
आपल्यासमोर आहे आणि आता आपल्यासमोर दोनच मार्ग आहेत एक लढा किवा पळा हा प्रसंग आपल्या
आयुष्यामध्ये वारंवार येतात व आताची परिस्थिती माझ्यासमोर उभी आहे या
परिस्थितीमध्ये जर पळायच असेल किंवा लढायचं असेल. माझ्या संपूर्ण
स्नायूमध्ये ताकद आवश्यक आहे. म्हणून माझ्या हृदयाची
गती वाढते त्यानंतर रक्तदाब वाढतो, मला ऑक्सिजनचा पुरवठा
आवश्यक आहे म्हणून माझ्या श्वासाची गती वाढते आणि हे सगळं होत असताना मला चार
रस्ते लवकर दिसावे केव्हा लढाई करताना मला चार हात लवकर
दिसावे म्हणून माझ्या बाहुल्या सुद्धा विस्फारल्या जातात इतके सगळे शारीरिक बदल
माझ्याबरोबर घडतात ज्या वेळेला माझ्यासमोर एक तणावाचे प्रसंग उभा राहतो पण गडबड
अशी होते आहे ती बऱ्याचदा प्रत्यक्षामध्ये फिजिकली आपण कुठे
रस्त्यात उभे नसतो आणि ती फिजीकली कुठलाही कुत्रा, एखादा प्रसंग
आपल्यासमोर नसतो आणि हे सगळं आपल्या मेंदूमध्ये वैचारिक पातळीवरची आणि
भावनाच्या पातळीवर या सगळ्या गोष्टी घडत असतात हे आपल्या मेंदूला हे
समजत नाही की हा माणूस बसलेला आहे आणि त्यांना तणावाचा प्रसंग हा फक्त
विचारांमध्ये आहे.
ऑफिस मधून फोन आला तर मला पहिला विचार , अरे बापरे आता
काय मागितले असेल त्यांना काय हवं असेल ही जी भीती आणि एक चिंता
मनामध्ये निर्माण होते. त्यामुळे शरीरामध्ये धडधड वाढणे श्वासाची गती वाढणे व त्याचे
शरीरावर इतर ठिकाणी परिणाम होणे हे सगळं होत चालतं आणि आपलं शरीर
सुद्धा आपल्या तणावाच्या प्रसंगाला सामोरे जात असत म्हणूनच ज्यावेळेस
तणाव खूप जास्त आयुष्यामध्ये वाढतो आहे त्याचे जर आपण निराकरण नियोजन
व्यवस्थित केलं नाही तर मग आपल्याला भविष्यामध्ये त्याच्या अनुषंगाने येणारे जे शारीरिक आजार आहेत
त्यांचा सामना करावा लागू शकतो.
ज्याला
आपण हायपर टेन्शन, बीपी, डायबिटीज, निद्रा नाश या सगळ्या
प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात. सतत चिंतेला सामोरे
गेल्यानंतर डिप्रेशन आपल्याला येऊ शकते आणि म्हणून या सगळ्या
गोष्टींचे नियोजन करणे खूप आवश्यक आहे.
mental health आरोग्य चांगले राहण्यासाठी या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. covid 19 मध्ये stress management व्यवस्थित करू शकू तर आरोग्य उत्तम राखण्यास मदत होईल.
आपल्याला प्रॉब्लेम तर लक्षात आला आहे आणि आपलाल्या stress तणाव आहे हा तणाव जर आयुष्यामध्ये राहिला तर आपल्याला पुढे या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की मला या तणावाचं stress management चे नियोजन करायचे आहे तर काय करायचं? गोष्टी खुप सोपी असतात, आपल्याला सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत असतात पण या गोष्टींची अंमलबजावणी करणं खूप दैनंदिन मध्ये शक्य होत नाही
उदा. सगळ्यांना माहिती आहे की ताण तणावाच्या नियोजनामध्ये आहार-विहार आणि विचार या तीन बाबींवर काम करणे खूप आवश्यक आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की आपण संतुलित आहार घेतला पाहिजे आपल्या आहारात सर्वं रंग जेवणामध्ये समाविष्ट पाहिजे सकाळचा नाष्टा चांगल्या प्रकारे घ्या, दुपारचे जेवण मध्यम घ्या व रात्रीचे जेवण हलके घ्या.
आहार, विहार आणि विचार, विहारा मध्ये आपण काय केले पाहिजे? व्यायाम केला पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे, सूर्यनमस्कार केले पाहिजे , आपले शारीरिक हालचाली भरपूर झाल्या पाहिजे तर आपली कॅलरी खर्च होणार.
आपण किती विचार करतो एका दिवसामध्ये याची आपण मोजदाद ठेवू शकत नाही पण आपल्या या मनाला एक खोड आहे, तिथे कुठल्याही प्रसंगी येणारा पहिला विचार आहे हा बहुतांशी वेळा नकारात्मकच विचार येतो आणि सकारात्मक विचार आणण्याची आपल्याला मनाला एक सवय लावून घ्यावी लागते मग बरेच लोक म्हणतात. मला माझे नकारात्मक विचार कमी करायचे आहे आणि सकारात्मक विचारांचे प्रमाण वाढवायची तर मी काय केले पाहिजे? सकारात्मक विचारांचे प्रमाण वाढवायचे तर मी काय केले पाहिजे मेडिटेशन करू का? मी छंद जोपासू का? सगळे उपाय आपापल्या परीने प्रत्येकाने आंमलात आणणे गरजेचे आहे.
कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे, मला म्युझिक आवडते म्हणून सगळ्यांना आवडेल असं नाही मला कविता वाचायला आवडतं म्हणून सगळ्यांनाच आवडते असंही नाही, मला साध फिरवून यायला आवडत म्हणून सगळ्यांना आवडेलच असे नाही. कोणाला गरम पाण्याने अंघोळ केली तरी बरं वाटतं. प्रत्येकाने आपले रिलॅक्स होण्यासाठी काय आवश्यक आहे हे जस शोधण आवश्यक आहे आवश्यक आहे असे काही छोट्या छोट्या बाबी आहेत का? ह्या युक्त्या जर आपण वापरल्या तर आपल्याला त्याचा आपल्या आयुष्यामध्ये फायदा करून घेता येईल.
आपले विचार खूप जास्त नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला त्यांना विरोध करायचा प्रयत्न केला तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो याचा कुठल्याही गोष्टीला विरोध केला तर त्याची ताकद वाढते. त्यामुळे कुठलीही गोष्ट आपल्याला सरळ सरळ विरोध करायचा नाही तर मग आपल्याला विचारांवर जर विजय मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी सोपा उपाय आहे.
आपल्याला आपल्या भावना नियंत्रण करता येते की आपण बघणे गरजेचे आहे. जाणवलं की आपण जेवतांना आनंदी असतो त्यावेळी आपल्या मनात सकारात्मक विचार जास्त येतात तुमच्या मुलांबरोबर खेळत असाल तर तुम्हाला त्याला नकारात्मक विचार जास्त मनात येत नाही आपल्याला जास्त ताण जाणवत नाही आपण तरी आपल्या मुलाबरोबर अनवाणी खेळत असू तर आपल्याला त्या वाळूच्या खड्यांच्या वेदना जास्त होत नाही.
कारण आपण आनंदी असतो आणि वेदना सहन करण्याची शरीराची क्षमता वाढून गेलेली असते., जर तुम्ही एखाद्या अंत्ययात्रेला जात असेल तर त्यावेळेस बारीक खडा टोचला तरी या काळात आपल्याला जास्त वेदना जाणवत असतात कारण आपण त्या वेळेला भावनिक पातळीवरची दुखी असतो. त्यामुळे शरीराची वेदना सहन करण्याची क्षमता ही कमी झालेली असते म्हणून शरीर आणि मन सोबत जातात हे आपल्याला कळालेलं आहे.
आपल्याला विचारांवर ती बदल करायचा असेल तर भावनांवरती काम करायचा आहे आणि भावनांवर ती जर काम करायचा आहे तर आपल्याला आपल्या शरीर सोबत घेणे आवश्यक आहे.