कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या वर्षभरापासून शाळा काही दिवस बंद होत्या, आणि आता देखील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी (Break the chain) लॉकडाऊन सुरू आहे.
अशातच विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे, यासाठी ऑनलाइन / ऑफलाइन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न गेले त्यातच आता परीक्षा देखील रद्द झालेल्या आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने गतवर्षी कोणत्याही प्रकारच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या नव्हत्या मात्र यावर्षी उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी शिक्षकाकडून होत होती.
हे ही वाचा
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता रहावी यासाठी शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्या निश्चित करण्यात येते. त्यानुसार चालू शैक्षणिक वर्षांमध्ये दिनांक 1 मे 2021 शनिवार पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्याबाबत शिक्षण संचालनालयामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. सदर सुट्टीचा कालावधी 13 जून 2021 पर्यंत ग्राह्य धरण्यात यावा व पुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये सोमवार दिनांक 14 जून 2021 रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार दिनांक 28 जून 2021 रोजी शाळा सुरु होतील.
सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक, माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय हे सध्या बंद आहेत. सबब 2021-22 या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत covid-19 प्रादुर्भावाची तत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन शासन स्तरावरून वेळोवेळी जे आदेश निर्गमित करण्यात येतील.