परीक्षा पे चर्चा २०२१ Pariksha Pe Charcha 2021

मार्च / एप्रिल महिना हा परीक्षांचा महिना या कालावधीत वार्षिक परीक्षांचे आयोजन करण्यात येते. यासंदर्भात विद्यार्थी , पालक , शिक्षक यांना परीक्षेपूर्वी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी 'परीक्षा पे चर्चा २०२१' कार्यक्रम यावर्षी प्रथमच कोरोनाचे सावट असल्याकारणाने प्रथमच व्हर्च्युअल पद्घतीने झाला. 'परीक्षा पे चर्चा' : Pariksha Pe Charcha कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी ताण तणाव कमी करण्याचे व्यवस्थापनाचे धडे दिले. यादरम्यान व्हर्च्युअल पद्धतीने विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी सवांद साधला. 

Pariksha par charcha 2021

परीक्षा पे चर्चा २०२१  Pariksha Pe Charcha 2021

परीक्षेच्या तयारीच्या वेळेस मनात येणाऱ्या भीती आणि ताणावावर कशी मात करावी? 
(चांगले गुण आणि चांगले कॉलेज मिळाले नाही तर काय होईल याची भीती वाटते.)
जेव्हा आपण भीती विषयी बोलतो तेव्हा आपणा सर्वाना त्याविषयी भीती वाटत असते. आपण पहिल्यांदाच परीक्षा देणार आहोत का? यापूर्वी कधी परीक्षा दिली नाही का? आपल्याला माहितीय की मार्च एप्रिल मध्ये परीक्षा असते. हे आधीपासूनच आपल्याला माहीत असते.
तुम्ही परीक्षेला नाही घाबरत तर दुसरंच कशाला तरी घाबरताय ,  ते तुमच्या आजूबाजूला असे वातावरण तयार झाले की , परीक्षाच सर्वस्व आहे. हेच आयुष्य आहे. आणि यासाठी संपूर्ण सामाजिक वातावरण , शालेय , कुटुंब ,नातेवाईक असे वातावरण तयार करतात. की तुम्हाला खूप मोठ्या संकटातून जायचं आहे. यामुळे खरतर भीती निर्माण होते. यासाठी  
पालकांना संदेश
आपण हे मुलांना परिक्षे बाबत अशी भीती घालायला नको. परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही. आयुष्यातला हा काही शेवटचा टप्पा नाही. आयुष्यात खूप टप्पे आहे. आयुष्य खूप मोठे आहे. हा तर एक छोटा टप्पा आहे. आपण मुलांच्या बाबत परीक्षेबाबत दबाव आणू नये. तुम्ही शिक्षक असाल ,कुटुंबातील सदस्य ,मित्र ,नातेवाईक यांनी मुलांच्या बाबत दबाव निर्माण करू नका.  तणाव आला नाही तर परीक्षेची कधीच भीती वाटणार नाही

मुलांनी तणावमुक्त हसत खेळत राहायचं. कुटुंबामध्ये मिळून मिसळून राहायचं.  मुलांच्या आवड , गरजा समजून घेऊन सपोर्ट दिला तर निश्चित मुलांना कसलीच भीती वाटणार नाही. पालकांनी मुलांचे विकनेस लक्षात ठेवून त्यातून आत्मविश्वास वाढेल अशा गोष्टी मुलांसोबत चर्चा करायला हवी.
परीक्षेसाठी एक शब्द आहे. कसोटी ,म्हणजे स्वतः ची कस लावण्याची संधी म्हणजे परीक्षा आहे. खरंतर परीक्षा ही जीवनाला घडवण्याची संधी आहे. असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


अवघड वाटणाऱ्या विषय आणि घटक (चापट्टर) यांची भिती वाटते. यावर मात कशी करावी? 
जगात असा एकही माणूस असा मिळणार नाही, की त्याला वरील प्रश्नासारखी गोष्ट भेडसावत नसेल. प्रत्येकाला वेगवेगळ्या विषयांची भीती मनामध्ये असतेच.
एक उदा. असं समजा की, तुमच्याकडे 5 ते 6 शर्ट आहे. त्यातले 2 ते 3  शर्ट आपल्याला खूप आवडत असतील. आणि आपण हेच शर्ट जास्त घालत असाल. पण बाकीचे शर्ट चांगले नाही किंवा आवडतच नाही असे नाहीये. ते 2 शर्ट तुम्हाला इतके आवडतात की, तुम्ही ते परत परत घालतात. 
आवड आणि नावड हा माणसाचा स्वभाव आहे. कधीकधी एखादी आवड पक्की  होऊन जाते. 

अभ्यासासाठी सर्व विषयांना सारखा वेळ दिला पाहिजे. अभ्यासाच्या बाबतीत जे अवघड आहे ते आधी करा. , परीक्षेत जे सोपे प्रश्न आहेत ते आधी सोडवा आणि नंतर कठीण वाटणारे प्रश्न सोडवा. ज्या गोष्टी अवघड असतात. त्या फ्रेश mind मध्ये कराव्यात. ज्या गोष्टी सोप्या आहेत. त्या नंतर करायच्या. म्हणजे मग अवघड वाटणारे विषय आपण सोपे कसे करता येईल यासाठी मदत होईल . आणि मग ताण देखील निर्माण होणार नाही. 

जे लोकं जीवनात यशस्वी आहे. ते सर्व विषयात पारंगत नाही. पण एका विषयात (क्षेत्रात) प्रसिद्ध आहे.
उदा. लता दीदी ,सचिन तेंडुलकर  यांचे एका विशिष्ट क्षेत्र विषयात प्रसिद्ध आहे. म्हणून च आपल्याला काही विषय अवघड जरी वाटत असले तरी आयुष्यात आपण एका विशिष्ट विषयात प्रसिद्ध व्हाल. शिक्षकांना असा सल्ला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळापत्रक बाबत तसेच अभ्यासक्रमा शिवाय इतर विषयाबाबत मार्गदर्शन करा. रागवू नका. प्रोत्साहन द्या. काही गोष्टी वर्गात सार्वजनिक सांगा. पण काही गोष्टी अशा असतात. त्या एकांतात प्रेमाने सांगा.

अवधड वाटणाऱ्या गोष्टीची यादी करून अवघड गोष्ट कशी साध्य केली तिचे आत्मपरीक्षण करा. 
आयुष्यातील अवघड वाटणाऱ्या गोष्टींची यादी करा. आणि आता त्या गोष्टी कशा आत्मसात केल्या ते पहा
उदा. सायकल चालवणे , पोहणे हे सुरुवातीला कठीण वाटत होते. मात्र नंतर आता ते सहज आपण करतो.
अगदी त्याच पद्धतीने कोणत्याही विषयाची भीती मनामध्ये न बाळगता धीराने त्याला सामोरे जा.

वर्षभर खूप अभ्यास केला पण परीक्षेच्या वेळी आठवत नाही काय करावे?

सर्वप्रथम मला आठवत नाही. लक्षात राहत नाही. असा विचार करूच नका. ही भावना मनामधून पूर्णपणे काढून टाका. अभ्यास करताना तो पाठांतर न करता , अभ्यास अनुभवा म्हणजे प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचा अनुभव घ्या. म्हणजे मग आठवत नाही हे आपण कदापि बोलणार नाही. प्रत्येक मुलांकडे चांगले सामर्थ्य आहे.
स्वप्न बघणे ही चांगली गोष्ट आहे. फक्त ती बघत बसणे आणि झोप काढणे हे चांगले नाही. आयुष्यातील माझे कोणते स्वप्न आहे ? ते ध्येय ठरवा.म्हणजे मग आपले स्वप्न आपण साकार करू शकू.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करावे?

विस्मरण हा शब्दच मनामधून काढून टाका. तुम्ही आयुष्यातील अनेक प्रसंग आठवून पाहा, तुम्हाला सहज आठवेल. कोणाचीही स्मरणशक्ती कमी जास्त नसते. गोष्टी सहजतेने लक्षात ठेवायला शिकता आले पाहिजे. तुम्ही ज्या क्षणात जगत आहात, त्याच क्षणात तुम्हाला जगता आले पाहिजे. तेथे एकाग्रतेने, मन एकवटून अभ्यास केला तर तो आठवण्यासाठी परिश्रम करावे लागत नाहीत.

परीक्षा हॉलमध्ये जाताना आपल्याला आलेला ताण हा सर्व परीक्षा हॉल बाहेर सोडून द्यायचा. आणि स्वतःला सकारात्मक सूचना द्यायच्या मी केलाय तो अभ्यास भरपूर झालेला आ.हे आणि मी पेपर लिहण्यासाठी सज्ज आहे. जेवढा कमी ताण तुम्ही घ्याल तेवढ्या आत्मविशासाने पेपर सोडवाल.

'परीक्षा पे चर्चा 2021' Pariksha Pe Charcha मराठी भाषेत अनुवाद केलेला संपूर्ण कार्यक्रम आपण DD Sahyadri News या YouTube Channel वर पाहू शकता.
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now