DIKSHA APP कसे वापरावे ? How to use DIKSHA APP?

 नमस्कार मित्रांनो , आज आपण या ब्लॉग मध्ये DIKSHA APP बाबत माहिती घेणार आहोत. DIKSHA APP काय आहे? Diksha App चा वापर कसा करायचा? याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत.

DIKSHA APP

DIKSHA हे National Council for Education Research and Training (NCERT) द्वारा विकसित केलेले  DIKSHA (Digital Infrastructure for Knowledge Sharing) is a national platform for school education आहे. DIKSHA APP च्या माध्यमातून इयत्ता 1 ली ते 1२ वी सर्व बोर्ड व सर्व माध्यमाचा अभ्यासक्रम ऑनलाईन स्वरूपात या app च्या माध्यमातून करता येतो. भारतातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थी , शिक्षक , पालक किंवा लीडर याचा वापर करू शकतो. 


DIKSHA PLATFORM

DIKSHA APP कसे वापरावे ? How to use DIKSHA APP?

आपण बघत आहोत की, 21 व्या शतकामध्ये तंत्रज्ञान किती झपाट्याने विकसित होत आहे. प्रत्येक क्षेत्रात नवनवीन आधुनिक बदल होताना दिसतायत , शिक्षण क्षेत्रात देखील आता शिक्षण पद्धती ही डिजिटल स्वरूपात शिक्षण याकडे हळूहळू जात आहे. कोरोनाच्या काळात तर शिक्षण पद्धती मध्ये ऑनलाईन शिक्षण हा पर्याय पुढे आला.

 आणि याबाबत नव नविन प्रयोग राबविण्यात आले. त्यामध्ये सध्या सुरू असलेला SCERT SWADHYA हा एक आधुनिक तंत्रज्ञानाचा ऑनलाईन शिक्षणाचा भाग आहे. त्यासोबत विद्यार्थी youtube चॅनेल , व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून व्हर्च्युअल क्लासेस द्वारे शिकत आहे. 

ऑनलाईन शिक्षण पद्धतीतील एक भाग म्हणजे संपूर्ण देशातील सर्व बोर्ड व माध्यमांच्या इयत्ता 1ली ते 12 वी चा अभ्यासक्रम डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे काम NCERT व संबंधित राज्य शासन SCERT यांच्या संयोगातून डिजिटल कंटेंट विकसित करून DIKSHA APP वर अपलोड करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून पाठ्यपुस्तकांमध्ये संबंधित घटक निहाय धड्याच्या शेवटी , QR कोड छापले आहे. QR कोड च्या माध्यमातून विद्यार्थी संबंधित घटकांशी (धडा, कविता, संकल्पना,) QR कोड स्कॅन केल्यावर दिक्षा app वरील ई-साहित्य उपलब्ध होते.

इयत्ता 1 ली ते 12 वी सर्व बोर्ड व माध्यम निहाय विषयांचे संबंधित घटक निहाय ई-कंटेंट व्हिडिओ ,ऑडिओ ,PDF ,PPT फॉरमॅट मध्ये ई-साहित्य उपलब्ध आहे. याचा उपयोग विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम करण्यासाठी विशेषतः कठीण संकल्पना समजून घेण्यासाठी , विशेष करून या कोरोनाच्या काळात DIKSHA APP ची मदत होत आहे. याचा विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. SCERT SWADHYAY मध्ये सुद्धा सराव करताना काही प्रश्न चुकले असतील तर DIKSHA वरील लिंक उपलब्ध होतात. त्यावर क्लीक करून आपण अभ्यास करू शकतो.

DIKSHA APP कसे वापरावे?

  • सर्वप्रथम प्ले स्टोर वरून DIKSHA APP डाऊनलोड करून घ्यावे.
  • दीक्षा ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • दीक्षा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर सर्व परमिशन द्या.
  • त्यानंतर आपली भाषा निवडा.
  • आणि पुढे जा यावर क्लीक करा.
  • तुम्ही शिक्षक ,विद्यार्थी ,लीडर , पालक यापैकी एक योग्य पर्याय निवडा.
  • बोर्ड निवडा. यावर क्लीक करून  आपल्यासमोर संपूर्ण राज्यातील बोर्ड ची यादी दिसेल त्यातून आपले योग्य बोर्ड निवडा.
  • आता आपल्याला माध्यम यावर क्लीक करून आपल्या शाळेचे माध्यम निवडायचे आहे.
  • त्यांनतर वर्ग निवडा.

DIKSHA APP वर आता तुम्ही अभ्यास करण्यासाठी तयार आहात.  आपल्याला ज्या विषयाचे ई-कंटेंट शोधायचे आहे. ते शोधून अभ्यास करू शकता.

खालच्या बाजूला मधोमध QR कोड स्कॅन करण्यासाठी क्लीक करावे. याद्वारे आपल्या पाठ्यपुस्तकातील QR कोड स्कॅन करून डायरेक्ट त्या घटकांशी संबंधित ई कंटेंट उपलब्ध होईल.

DIKSHA APP INFO IN MARATHI


Diksha app डॅशबोर्ड 

  • खालच्या बाजूच्या उजवीकडून एक नंबरला आपल्या प्रोफाइल विषयी माहिती आहे. त्यावर क्लीक करा.
  • याठिकाणी आपण प्रोफाईल तपशील , भूमिका बदलणे , लोकेशन या गोष्टी याठिकाणी अपडेट करू शकतो.
  • त्यानंतर प्रोफाईल च्या बाजूला डाउनलोड चा आयकॉन दिसेल  , म्हणजे दिक्षा app वर आपण जेवढे ई कंटेंट डाउनलोड केले असतील ते सर्व इथे आपण पाहू शकता. सध्या 68.35GB पर्यंत जागा उपलब्ध आहे. त्याचा तपशील आपल्याला वरच्या बाजूस बघता येईल.
  • डाउनलोड च्या बाजूला QR कोड स्कॅनर आहे. थेऊन आपण पाठ्यपुस्तकातील क्यू आर कोड स्कॅन करू शकता.
  • QR कोड च्या बाजूला कोर्सेस तपशील पाहता. येईल नुकतेच मागील 6 महिन्यापासून ऑनलाईन NISHTHA प्रशिक्षण करण्याबाबत उर्दू शिक्षकांना सांगितले होते. त्यासोबत इतर कोर्सेस इथून आपण पाहू शकता.
  • कोर्सेस च्या बाजूला DIKSHA APP चा मेन डॅशबोर्ड आपणास दिसेल, येथून आपण इयत्ता ,माध्यम निवडून ई कंटेंट शोधून अभ्यास करू शकता.
  • वरच्या डाव्या बाजूला तीन रेषा आहे. त्याठिकाणी काही सेटिंग आहे. त्यामध्ये आपण app ची भाषा , थीम , अभ्यास ग्रुप तयार करणे, मदत याविषयी येथून माहिती घेऊ शकता.
  • वरच्या डाव्या बाजूला नोटिफिकेशन आणि सर्च बॉक्स आहे.
सारांश
इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व बोर्ड व माध्यम निहाय ई-कंटेंट अभ्यासक्रम DIKSHA APP वर उपलब्ध असून याचा आपण जास्तीत जास्त अभ्यास करून संधीचा लाभ घेवू शकतो. विशेष म्हणजे दिक्षा APP हे शासनाचे अधिकृत शैक्षणिक APP आहे. पाठ्यपुस्तकातील QR कोड स्कॅन करून सहजरीत्या ई-कंटेंट शोधू शकतो. त्याबरोबर सध्या सुरु असलेला SCERT SWADHYAY उपक्रमातील चुकीच्या प्रश्नानंतर लिंक पाठवली जाते. ती लिंक DIKSHA APP अधून आपण  लिंक ओपन करून ऑनलाईन अभ्यास करू शकतो.
शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now