How to register covid 19 vaccine I Covid 19 लसीकरणासाठी नोंदणी कशी करावी?

कोव्हीड १९ लसीकरण आतापर्यंत आरोग्यसेवक , फ्रंटलाईन वर्कर्स , 50 वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असणारे 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे नागरिक यांना लस देण्यात आली व लसीकरण सुरू आहे. आता राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी याची घोषणा केली. लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Covid 19 vaccine


How to register covid 19 vaccine Covid 19 लसीकरणासाठी नोंदणी कशी करावी?

  •  कोरोना लस घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट जा. https://selfregistration.cowin.gov.in/


  • आता आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा.

  • मोबाईल नंबर टाकल्यानंतर  आपल्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो Verify करा.

  • त्यानंतर Register for vaccination  मधील सर्व माहिती भरा.

  • Photo ID proof आधार कार्ड सिलेक्ट करा. (किंवा इतर कागदपत्रे देखील सिलेक्ट करु शकता.)

  • आधार क्रमांक , नाव , जन्मतारीख , जेंडर इतर सर्व डॅशबोर्ड मधील सर्व माहिती भरा. आणि register करा..

  • रजिस्टर पूर्ण झाल्यानंतर आपणास एक msg येईल तो save करून ठेवा. आपण ज्या दिवशी लस घेण्यास जाल त्यादिवशी लसीकरण सेंटर वर रजिस्टर केलेला msg दाखवावा लागेल.

  • पिन कोड टाका आणि त्यानुसार आलेल्या तारखेला लसीकरण schedule करा.

  • आता पुन्हा आपणास schedule चा msg येईल हे दोन्ही msg जतन करून ठेवा.

  • यासोबतच आपण एका रजिस्टर अकाउंट मधून तुमच्यासह कुटुंबातील चार जणांची लसीकरण करून घेण्यासाठी नोंदणी करू शकता.

लसीकरण नोंदणी ऑनलाईन पोर्टल वर होत आहे. कधी कधी सर्वर डाऊन होऊ शकते , आवश्यक तो बदल पोर्टल मध्ये केला जाऊ शकतो किंवा लसीकरण करण्यासंदर्भात नविन अद्ययावत सूचना येऊ शकतात. यासाठी आपण वेळोवेळी Aarogya Setu App , आरोग्य खात्याची अधिकृत वेबसाईट किंवा जवळच्या आरोग्य केंद्रास भेट देऊन आपण अपडेट माहिती घेऊ शकता.


घरीच रहा , सुरक्षित रहा.



Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now