महाराष्ट्रात आंतरजिल्हा प्रवासासाठी अशी काढा ई-पास E-Pass Maharashtra Online Apply

कोव्हीड 19 कोरोना व्हायरस ने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जनजीवन विस्कळीत आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरताच काही दिवसांनी दुसरी लाट आलेली आहे. अशातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी (break the chain) राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये लसीकरण , जनजागृती ,कोव्हीड 19 टेस्ट बरोबरच आता संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. 22 एप्रिल पासून ते 1 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामध्ये आता 'आंतर-राज्य,  महाराष्ट्रात आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास' काढणे बंधनकारक आहे. अत्यावश्यक सेवेसाठीच E-Pass Maharashtra Online Apply करावे असे आव्हान सरकारतर्फे करण्यात आले आहे. 
Epass maharashtra online apply



ई-पास महाराष्ट्र ही सेवा नागरिकांना आपत्कालीन (आणीबाणी) मध्ये प्रवास सुलभ व्हावा यासाठी ई-पास असणे आवश्यक आहे. प्रवासा दरम्यान पोलिसांनी कोठे अडवल्यास ई-पास सोबत इतर महत्वाचे अत्यावश्यक कागदपत्रे देखील सोबत ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून आपला प्रवास सुखाचा होईल.

E-pass ही अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशाप्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच फक्त प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. अशा अत्यावश्यक प्रवासासाठी ई-पास बंधनकारक आहे. यापूर्वीही मागील वर्षी लाॅकडाऊनच्यावेळी  ई-पास बंधनकारक करण्यात आला होती.  पोलीस विभागाने ई पास काढण्यासाठी  https://covid19.mhpolice.in/ ही लिंक दिली असून या संकेतस्थळावरून epass online काढण्यासाठी  अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र पोलीस विभागाने केले आहे.

हे ही वाचा

E-pass Maharashtra Online Apply ई-पास कसा काढायचा ?

  • सर्वप्रथम आपल्या ब्राउझर मध्ये https://covid19.mhpolice.in/ ही लिंक टाकून या अधिकृत संकेतस्थळावर जा.

  • त्यांनतर आपणास डॅशबॉर्ड वर COVID e-pass for inter-state and inter-district travel असे लिहलेले दिसेल त्याखाली Apply for new pass मधील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या.

  • त्यानंतर त्याखाली Apple for pass here या ऑप्शन ला क्लीक करा.

  • त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राबाहेर भेट देण्याची गरज आहे का? या प्रश्नाचे उत्तर yes किंवा no मध्ये जे असेल ते द्या.

  • त्यानंतर आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये प्रवास करायचा आहे. तो जिल्हा निवडा

  • त्यानंतर ऑनलाईन अर्जामधील नाव , पत्ता ,मोबाईल नंबर , गाडी नंबर , आवश्यक कागदपत्रे , प्रवासाचे कारण संपूर्ण माहिती अचूक भरा.

  • फोटो अपलोड करताना फोटो ची size 200kb च्या वर नसावी. तसेच सर्व कागदपत्रांची एकच Documents फाईल ची size 1mb च्या वर नसावी. (सदर फोटो व डॉक्युमेंटची size अगोदरच आपण करून ठेवावी.) किंवा online epass अर्ज भरताना फोटो अपलोड च्या वरच्या बाजूला ऑनलाइन पध्दतीने फोटो ची size कमी करण्याचे ऑप्शन आहे. तेथूनही आपण size कमी करू शकता.

  • अर्ज संपूर्ण भरल्यानंतर पुन्हा व्यवस्थित माहिती चेक करा. आणि submit या बटणावर क्लीक करा.

  • आपणास एक टोकन नंबर मिळेल. त्याचा स्क्रीन शॉट काढून ठेवा. किंवा लिहून ठेवा.

  • त्यानंतर आपल्या अर्जाची स्थिती epass status चेक करण्यासाठी टोकन आवश्यक आहे.

Maharashtra online E-pass status ई-पास स्टेटस कसे चेक करावे?

  • सर्वप्रथम https://covid19.mhpolice.in/ या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या. 

  • त्यानंतर ज्याप्रमाणे आपण ऑनलाईन पास साठी अर्ज केला. Apply for pass here च्या खाली Download pass मधील सर्व माहिती वाचून घ्या.

  • त्यांनतर check status /download pass या ऑप्शन ला क्लीक करा.

  • त्यांनतर enter token id here येथे आपला टोकन आयडी टाकून चेक करा.

  • आपला ई पास साठी संबंधित विभागाकडून पडताळणी व मान्यता मिळाल्यानंतर आपण टोकन आयडी वापरून आपला E-pass download करू शकता.

E-pass Maharashtra online Apply करण्यासंबंधी काही अडचणी येत असल्यास आपण आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन ला भेट देऊन ई-पास काढण्यासाठी मदत घेऊ शकता.

घरीच रहा , सुरक्षित रहा...
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now