फक्त बोला आपोआप टायपिंग होईल audio to text converter online free

फक्त बोला आपोआप टायपिंग होईल audio to text converter online free 

Audio to text converter online free

नमस्कार मित्रांनो तंत्रज्ञान विषयक ब्लॉग मध्ये आज आपण गुगल ची मोफत सेवा audio to text converter online free कसे करायचे? मोबाईल मध्ये टायपिंग करत असताना voice typing चा वापर कसा करायचा? translate audio to text online कसे वापरायचे? त्याचबरोबर laptop किंवा computer वर audio to text converter google चा वापर करून बोलून टायपिंग कशी करावी? याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

२१ व्या शतकामध्ये तंत्रज्ञान खूप झपाट्याने विकसित होत आहे. आज प्रत्येकाकडे android smartphones आलेत प्रत्येकजण एका क्लिक वर संपूर्ण जगासोबत जोडला गेला. 

कोरोनाच्या महामारी मध्ये लॉकडाऊन काळात प्रत्येक जण घरबसल्या तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ conferance मिटींग्स , ऑनलाईन class , online व्यवहार, online shopping याचा सरासपणे खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला. 

अशातच यापुढे आता online education ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना पुढे आली. प्रत्येकाला online च्या युगात जगत असताना laptop , android smartphones मध्ये टायपिंग करण्याची गरज भासत आहे. 

मग ते प्रोजेक्ट तयार करण्यासाठी , परीक्षा देण्यासाठी, आपले विचार व्यक्त करण्यासाठी, ppt प्रेझेन्टेशन तयार करण्यासाठी अशा विविध कामानिमित्त आपल्याला टायपिंग करणे आवश्यक बनले आहे. त्यातच हाताने टायपिंग साठी काही जणांना खूप वेळ लागतो.

आपल्याच मोबाईल, laptop मध्ये online असलेली google ची audio to text converter online free सेवा उपलब्ध आहे. हे बऱ्याच जणांना माहित नसते. ते आज आपण माहित करून घेणार आहोत. आणि टायपिंग चा स्मार्ट वापर करूया.

 {tocify} $title={अनुक्रमणिका}

फक्त बोला आपोआप टायपिंग होईल audio to text converter online free 

सर्वप्रथम गुगल चे voice typing चे कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते पाहूया.

मोबाईलमध्ये असलेले

1. Google Indic Keyboard App

2. Google translatevoice typing App Or Online

3. Google Docs online voice typing

असे बहुतेक पर्याय बोलून टायपिंग करण्याचे उपलब्ध आहेत. या ब्लॉग मध्ये आपण आपल्याला दैनंदिन वापरामध्ये अगदी सहज सोपे पर्याय पाहणार आहोत.

1. Google Indic Keyboard App

  • Google Indic Keyboard हे मोबाईल साठी टायपिंग चे android app आहे. आपल्या मोबाईल मध्ये हे install असते. जर install नसेल तर आपण play store मधून Google Indic Keyboard असे सर्च करून डाउनलोड करून घेवू शकता.

  • त्यानंतर आपल्याला apps open करून परमिशन देऊन सुरु करायचे आहे. 
  • keyboard सुरु केल्यानंतर डाव्या बाजूला abc असे दिसेल आणि त्या बाजूला ळ किंवा इतर भाषेतील अक्षर दिसेल त्यावर क्लीक करून आपल्याला जी भाषा निवडायची आहे. ती सिलेक्ट करावी.

  • ळ किंवा इतर भाषेतील अक्षर त्यावर डबल tap केल्यास डाव्या बाजूला eng to marathi किंवा आपण जी भाषा सिलेक्ट केली असेल ती दिसेल. 
  • उजव्या बाजूला आपण निवडलेली भाषा keyboard दिसेल. आपल्याला जे keyboard हवे आहे ते आपण निवडावे.

  • आता यानंतर google voice to text online टायपिंग साठी keyboard वरील उजव्या बाजूच्या mic चिन्हावर क्लिक करून डाव्या बाजूला सेटिंग गेर आयकॉन दिसेल त्याला सिलेक्ट करायचे.
  • त्यानंतर voice typing language निवडायची आहे.

  • आता आपला Google Indic Keyboard बोलून टायपिंग करण्यासाठी सज्ज आहे.
  • उजव्या बाजूच्या mic चिन्हावर क्लिक करून मध्ये दिसणाऱ्या mic वर क्लिक करा आणि बोलायला सुरुवात करा. टायपिंग आपोआप होताना दिसेल. google voice to text online

कितीही मोठे उतारे असूद्यात किंवा कितीही बोला आपोआप टायपिंग होईल. टायपिंग झाल्यानंतर आपल्याला हवे ते बदल आपण करू शकता.

टीप- बोलताना हळू सावकाश व स्पष्ट उच्चार असूद्यात टायपिंग जसेच्या तसे होईल.{alertInfo}

 

2. Google translatevoice typing App Or Online

आपल्या मोबाईल मध्ये आपण वापरत असाल किंवा वापरलेले असेल , माहित असणारे  google चे translate app किंवा हे टूल्स आपण गुगल वर देखील वापरू शकता.

बऱ्याचदा आपल्याला marathi to english आणि english to marathi किंवा इतर भाषेत translate करताना अडचणी येतात. 

अशा वेळी कामा येते ते म्हणजे google चे translate app हे app देखील Google Indic Keyboard सारखे Google translate voice typing करण्याचे काम करते. 

आपण सर्वप्रथम आपल्याला हवी ती भाषा निवडून ज्या भाषेत आपण बोलणार आहात ती भाषा निवडा आणि बोलायला सुरुवात करा. 

आपण बोलतो तेव्हा दुसरया बाजूला आपण निवडलेल्या भाषेत translate देखील होते. 

आपण नक्कीच या google translate voice typing चा वापर करुन बघा. विशेषतः मुलांना इंग्रजी किंवा इतर भाषा शिकण्यासाठी हे app मदत करते.

गुगल चे हे Google Indic Keyboard  व translate voice typing हे पूर्णपणे free असून वापरण्यास एकदम सोपे आहे.

3. Google Docs online voice typing

Google Docs मध्ये देखील आपण free voice to text हे tools वापरू शकता. यासाठी आपल्याला आपल्याला laptop किंवा dekstop computer वर वेब ब्राउझर मध्ये google login करावे लागेल.

  • त्यानंतर google apps मधील Docs हे ओपन करावे. 
  • त्यांनतर टायपिंग साठी आपल्याला फंक्शन की लाईन मध्ये डाव्या बाजुला तीन डॉट आहे त्यावर क्लीक करा. 
  • आपल्याला भाषा सिलेक्ट दिसेल. तेथून आपण टायपिंग करू शकता.

  • google voice to text online टायपिंग साठी Tools या मेन्यू ला सिलेक्ट करा.
  •  या मेन्यू बार मध्ये voice typing चा पर्याय दिसेल. 

  • त्यानंतरआपोआप त्यावर क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला आपोआप popup ओपन दिसेल.
  • voice typing सुरु करण्यासाठी mic ला सिलेक्ट करा. वरच्या बाजूला use your microphone ला परमिशन द्या  allow करा. टायपिंग सुरु होईल. 

 

अशा पद्धतीने आपण  Google Indic Keyboard App , Google translatevoice typing App Or Online आणि Google Docs online voice typing सहजरीत्या करू शकतो. टायपिंग साठी सर्वात प्रभावी असणारे tools म्हणजे गुगल चे google input tools याचा आपण निच्छितच जास्तीत जास्त स्मार्ट वापर करून दिलेल्या फ्री सर्व्हिस चा उपयोग करूया.

आशा करतो आपल्याला हा तंत्रज्ञान विषयक ब्लॉग आवडला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन तंत्रज्ञान विषयक ब्लॉग सोबत.

धन्यवाद!

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now